agricultural stories in Marathi, agrowon, temparature problems in cattles | Agrowon

जनावरांतील उष्माघाताची कारणे, लक्षणे, उपचार
डॉ. गिरीश यादव, डॉ. अमोल यमगर
मंगळवार, 26 मार्च 2019

वाढते तापमान आणि प्रखर उन्हामुळे जनावरांमध्ये उष्माघात होतो. म्हशी, संकरीत गाई यांना हा आजार जास्त प्रमाणात होतो. उष्माघातामुळे जनावरांची उत्पादकता कमी होते, बऱ्याचदा हा आजार प्राणघातक होऊ शकतो.

उष्माघाताची कारणे

वाढते तापमान आणि प्रखर उन्हामुळे जनावरांमध्ये उष्माघात होतो. म्हशी, संकरीत गाई यांना हा आजार जास्त प्रमाणात होतो. उष्माघातामुळे जनावरांची उत्पादकता कमी होते, बऱ्याचदा हा आजार प्राणघातक होऊ शकतो.

उष्माघाताची कारणे

 • गोठ्याच्या परिसरातील तापमानात प्रचंड वाढ हे प्रमुख कारण आहे.
 • वातावरणात भरपूर आर्द्रता असणे.
 • जनावरे बांधण्याचा गोठा कोंदट असणे.
 • उन्हाच्या वेळेत जनावरे चारावयास सोडणे.
 • जनावरांची लांबवर वाहतूक.
 • पिण्याच्या पाण्याची कमरता.
 • दिवसा सावलीची सोय नसणे.
 • जास्त वयस्क व कमी वयाच्या जनावरांत उष्णता सहन करण्याची क्षमता कमी असते. अशी जनावरे उन्हाळ्यात उष्माघातास जास्त बळी पडतात.
 • लठ्ठ जनावरे, अंगावर भरपूर केस किंवा लोकर असणाऱ्या जनावरांना उष्माघाताचा जास्त त्रास होतो.

लक्षणे

 • शरीराचे तापमान १०३ ते १०७ अंश फॅरनहाईटपर्यंत वाढते.
 • श्वसनाचा वेग वाढतो.
 • हृदयाचे ठोके वाढतात.
 • जनावर जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करते.
 • जनावर लाळ गाळते.
 • नाकातून स्राव येतो.
 • जनावरास भरपूर तहान लागते.
 • जनावर अस्वस्थ होते.
 • जनावरांना शरीराचा तोल सांभाळता येत नाही.
 • जनावर चालताना अडखळते व कोसळते.
 • जनावराला झटके येतात.
 • जनावर बेशुद्ध पडून दगावते.

उपचार

 • जनावरांचा गोठा हवेशीर असावा.
 • जनावरांना हवेशीर ठिकाणी बांधावे किवा पंख्याची व्यवस्था करावी, जेणेकरून हवा खेळती राहील.
 • जनावराचे अंग थंड पाण्याने ओले करावे, जेणेकरून शरीराचे तापमान कमी होईल.
 • जनावरास पिण्यासाठी भरपूर प्रमाणात थंड पाणी द्यावे. चघळण्यास बर्फ   द्यावा.
 • जनावराच्या डोक्यावर बर्फाने शेकावे.
 • पशुवैद्यकाच्या सल्ल्याने थंड ग्लुकोज सलाईन, तापनाशक औषधे द्यावीत.
 • आजारी जनावरास सावलीत बांधावे, उन्हात अजिबात नेऊ नये.

प्रतिबंध

 • उन्हाच्या वेळेत जनावरे चरावयास सोडू नयेत.
 • उन्हाच्या वेळी जनावरांची लांब वाहतूक करू नये. जनावरांची वाहतूक सकाळी किंवा सायंकाळी करावी.
 • जनावराला पिण्यासाठी भरपूर पाणी द्यावे.
 • जनावरास बांधण्यास सावलीची सोय करावी.
 • अंगावर भरपूर केस, लोकर असणाऱ्या जनावरांच्या अंगावरील केस काढून टाकावेत.

 ः डॉ. गिरीश यादव, ७६६६८०८०६६
(मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, परळ, मुंबई)

 

इतर कृषिपूरक
विषारी वनस्पती, कीडनाशकांची जनावरांना...ॲस्परजीलस बुरशीची वाढ झालेला मका जनावरांच्या...
शेळ्यांसाठी गोठ्याची रचनागोठ्याचा आकार, शेळ्यांच्या संख्येनुसार ठरवावा. ऊन...
संगोपन रेशीम कीटकांचेएक एकर तुती लागवड क्षेत्रासाठी बाल्य अवस्थेसाठी...
फळे पिकवणे, धान्य साठवणुकीच्या पारंपरिक...शहादा तालुक्यात गेली तीसेक वर्षे आदिवासींसोबत काम...
परसबागेतील कोंबड्यांसाठी आरोग्य, खाद्य...केंद्रीय पक्षी संशोधन संस्था विकसित केलेल्या...
पट्टा पद्धतीनेच करा तुती लागवडतुती लागवडीसाठी सपाट, काळी, कसदार, तांबडी,...
शिंगांच्या कर्करोगाकडे नको दुर्लक्ष शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील...
आंत्रविषार,प्लेग आजारावर प्रतिबंधात्मक...आंत्रविषार आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना...
संसर्गजन्य आजारांबद्दल जागरूक रहापावसाळी वातावरणात जनावरांना साथीच्या आजारांचा...
पूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत...
दुभत्या गाई-म्हशींची जैवसुरक्षितता...दुभत्या गाई-म्हशींमधील रोगांचा प्रादुर्भाव...
जनावरांतील विषबाधा टाळाशेतात बियाणे प्रक्रिया करताना नजरचुकीने काही वेळा...
शेळ्यांचे आरोग्य, प्रजनन महत्त्वाचेशेळीपालनाद्वारे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...
गाई, म्हशींच्या प्रजननावर द्या लक्षवेगवेगळ्या ऋतूंमध्ये गाई, म्हशींच्या व्यवस्थापनात...
जनावरांतील पोटफुगीकडे नको दुर्लक्षपोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडते....
जनावरांना होते घाणेरीची विषबाधा मोकळ्या कुरणात जनावरे चरताना घाणेरी वनस्पती...
‘पोल्ट्री वेस्ट’ने भागवली विजेची...परभणी येथून पशुवैद्यकशास्त्राची पदवी, त्यानंतर...
गोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...
गाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....
जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...