agricultural stories in Marathi, agrowon, turmeric pest management | Agrowon

हळदीवरील किडीचे करा वेळीच नियंत्रण

डॉ. मनोज माळी, प्रतापसिंह पाटील
रविवार, 2 डिसेंबर 2018

हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर तापमान फारच कमी झाले तर हळद पिकावर विविध किडी-रोगांचा प्रादुर्भाव होतो. परिणामी गड्ड्यांची संख्या आणि आकार कमी होतो. किडींचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असते.

सध्या हळद लागवड होऊन पाच महिन्यांचा कालावधी (१५० दिवस) पूर्ण झाला आहे. या कालावधीमध्ये हळद पीक वाढीच्या दोन अवस्था जसे उगवण आणि शाकीय वाढ पूर्ण झालेल्या असतात. या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात तसेच हळदीच्या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या आणि उंची या अवस्थेमध्ये निश्‍चित होत असते.

हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर तापमान फारच कमी झाले तर हळद पिकावर विविध किडी-रोगांचा प्रादुर्भाव होतो. परिणामी गड्ड्यांची संख्या आणि आकार कमी होतो. किडींचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असते.

सध्या हळद लागवड होऊन पाच महिन्यांचा कालावधी (१५० दिवस) पूर्ण झाला आहे. या कालावधीमध्ये हळद पीक वाढीच्या दोन अवस्था जसे उगवण आणि शाकीय वाढ पूर्ण झालेल्या असतात. या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात तसेच हळदीच्या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या आणि उंची या अवस्थेमध्ये निश्‍चित होत असते.

 • उगवण आणि शाकीय वाढ यानंतर हळद पीक वाढीची पुढील दोन महिन्यांची (१५० ते २१० दिवस) अवस्था म्हणजे हळद पिकास हळकुंड फुटण्यास सुरवात होते. जे काही नव्याने फुटवे आले असतात त्या फुटव्यांपासून हळकुंड येण्याचा हा कालावधी असतो. या वेळी वातावरणातील तापमानात घट होत असते. साधारणतः २० ते २५ अंश सेल्सिअस तापमानाला हळकुंड फुटत असतात.  
 • हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर तापमान फारच कमी झाले तर हळद पिकावर विविध किडी-रोगांचा प्रादुर्भाव होतो. परिणामी गड्ड्यांची संख्या आणि आकार कमी होतो. योग्य व्यवस्थापनासाठी कीड व रोगाचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असते.

 कंदमाशी

 • लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक प्रमाणात अनुकूल असतो. कंदमाशीमुळे ४५ ते ५० टक्के नुकसान होते. ही कीड ऑक्‍टोबरपासून ते पिकाच्या काढणीपर्यंत नुकसान करते.
 • नियंत्रण ः
 • फवारणी प्रती लिटर पाणी
 • क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.ली किंवा
 • डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १ मि.ली. १५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार फवारावे.
 • उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी.
 • हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष सडके कंद नष्ट करावेत.
 • हेक्‍टरी ६ पसरट भांडी (माती अथवा प्लॅस्टिकची) वापरून प्रत्येक भांड्यात २०० ग्रॅम एरंडीचे बी घेऊन त्यात १.५ लिटर पाणी मिसळावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणाचा विशिष्ट असा वास येऊ लागल्यावर कंदमाशा आकर्षित होऊन मरू लागतात.

हुमणी

 • या किडीची अळी नुकसानकारक असते. अळ्या मुळे कुरतडतात. जास्त प्रादुर्भाव झालेल्या भागात कंदही कुरडतात.
 • मुळे कुरुतडल्यामुळे पीक पिवळे पडते, रोपे वाळू लागतात व उपटल्यास सहज उपटून येतात.
 • नियंत्रण :
 • संध्याकाळच्या वेळेला या किडीचे भुंगेरे बाहेर पडतात. ते गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत.  ४ मि.ली. क्‍लोरपायरीफॉस प्रती लिटर पाण्यात घेऊन आळवणी करावी.
 • जैविक नियंत्रणासाठी मेटॅरायझियम अॅनिसोप्ली ही हे बुरशीजन्य कीटकनाशक हेक्‍टरी ५ किलो या प्रमाणात शेणखतात मिसळून वापरावी.

 


इतर मसाला पिके
व्यवस्थापन हळद पिकाचेसध्या हळद लागवड होऊन सात महिन्यांचा कालावधी (२१०...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
आले पिकावरील कंदमाशीचे व्यवस्थापनआले पिकामध्ये कंदमाशी, खवले कीड, खोडकिडा, फुलकिडे...
ओळखा हळदीवरील किडींचा प्रादुर्भाव...सध्या हळद पीक फुटवे आणि गड्डे तयार होण्याच्या...
व्यवस्थापन मसाला पिकांचेनारळ, सुपारी बागेत अतिशय चांगल्या प्रकारे मसाला...
हळदीची पाने पिवळी पडण्याची समस्या अन्...सध्या काही भागात हळदीची पाने पिवळे पडण्याची...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
हळदीला द्या शिफारशीत खतमात्रापावसाच्या कालावधीत जमिनीतील ओलावा अभ्यासून पाणी...
तंत्र कारळा लागवडीचे...कारळ्याची पेरणी जूनच्या पहिल्या पंधरवड्यापासून ते...
काळीमिरीची लागवड मिरी लागवडीसाठी आधाराच्या झाडांपासून किमान ४५ सें...
साठवणूक हळद बेण्याची...निवडलेले बेणे जातिवंत आणि चांगले असेल तर उत्पादन...
कढीपत्त्याची व्यावसायिक लागवड फायदेशीरकढीपत्याचे शास्त्रीय नाव ‘मुर्रया कोइनिगी’ आहे....
काळी मिरी काढणी तंत्रज्ञानविविध पदार्थांच्या निर्मितीमध्ये मिरीचा वापर केला...
योग्य परिपक्वतेला करा पिकांची काढणीपिकांची योग्य परिपक्वतेला काढणी करण्यासाठी...
हळदीची पॉलिशिंग, प्रतवारी करणे...हळदीची विक्री उघड लिलाव पद्धतीने होत असल्याने...
व्यवस्थापन दालचिनीचे...वाढीच्या टप्यात असलेल्या दालचिनी कलमांना आधार...
व्यवस्थापन मसाला पिकांचे...मिरी वेल आणि जायफळास पुरेसे पाणी आणि खत...
सुधारित पद्धतीने करा हळद काढणीहळद लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीची पद्धत...
दालचिनीची वेळेवर काढणी महत्त्वाचीदालचिनी झाडाची साल ही मसाल्यात दालचिनी म्हणून...