agricultural stories in Marathi, agrowon, USE OF MICRONUTRIENTS | Page 2 ||| Agrowon

कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर महत्त्वाचा...

डॉ. पपिता गौरखेडे
शनिवार, 23 मार्च 2019

अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक प्रमाणात जमिनीत व पिकांत पाहावयास मिळत आहे. नत्र, स्फुरद व पालाशच्या वापराबाबत जागरूकता आहे; परंतु या मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापरसुद्धा अपरिहार्य ठरत आहे.

मराठवाड्यातील विविध माती परिक्षण व पिकांचे अन्नद्रव्ये स्थितीच्या सर्वेक्षणात आढळून आलेल्या एकापेक्षा जास्त सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता, त्यांचा परस्पर संबंध, विविध पिकांची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज आणि वापरानंतर मिळणारा प्रतिसाद या बाबींमुळे संतुलित पीक पोषणासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर ही संकल्पना तयार झाली.

अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक प्रमाणात जमिनीत व पिकांत पाहावयास मिळत आहे. नत्र, स्फुरद व पालाशच्या वापराबाबत जागरूकता आहे; परंतु या मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापरसुद्धा अपरिहार्य ठरत आहे.

मराठवाड्यातील विविध माती परिक्षण व पिकांचे अन्नद्रव्ये स्थितीच्या सर्वेक्षणात आढळून आलेल्या एकापेक्षा जास्त सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता, त्यांचा परस्पर संबंध, विविध पिकांची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज आणि वापरानंतर मिळणारा प्रतिसाद या बाबींमुळे संतुलित पीक पोषणासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर ही संकल्पना तयार झाली.

सर्वसाधारणपणे सूक्ष्म अन्नद्रव्याच्या वापराकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते. परंतु, सूक्ष्म अन्नद्रव्ये ही मुख्य तसेच दुय्यम अन्नद्रव्याशी संबंधित असल्याने त्यांच्या वापराकडे तितकेच लक्ष देणे आवश्यक आहे. या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या उपस्थितीच पीक नत्र, स्फुरद आणि पालाश व इतर अन्नद्रव्याचा कार्यक्षम वापर करतात. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या वापर न केल्यास होणारे दुष्परिणाम ताबडतोब दृश्‍य स्वरूपात नसतात; मात्र त्याची कमतरता खूपच नुकसानकारक ठरू शकते कारण अल्पप्रमाणात लागणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्याचे पीक पोषणातील कार्य मात्र मुख्य अन्नद्रव्याइतकेच महत्त्वाचे आहे. नत्र, स्फुरद व पालाश योग्य प्रमाणात वापरूनदेखील पिकापासून पूर्ण क्षमतेएवढे उत्पादन मिळत नाही. कारण, प्रत्येक अन्नद्रव्याचे कार्य हे विशिष्ट प्रकारचे असते. म्हणजेच एखादे अन्नद्रव्य हे दुसऱ्या अन्नद्रव्याची जागा घेऊ शकत नाही. योग्य प्रमाणात व कार्यक्षम स्वरूपात सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापरासाठी नियोजन करणे आवश्यक आहे.

सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्ये
१. लोह

 • हरितद्रव्य तयार करण्यासाठी.
 • विविध संप्रेरकांचा घटक असल्यामुळे श्वसन प्रक्रिया आणि प्रकाशसंश्लेषण या सर्व प्रक्रिया वाढ व पुन:रूत्पादनासाठी आवश्यक.
 • प्रथिने तयार होणा­च्या प्रक्रियेत आवश्यकता.
 • लोह हा वनस्पतीमध्ये अचल स्थितीत असतो. त्यामुळे लोहाची कमतरता ही कोवळ्या पानांवर प्रकर्षाने जाणवते.

कमतरतेची लक्षणे
नवीन पालवीतील हिरवेपणा नाहीसा होतो, शिरा हिरव्या राहतात, हरितलवकाची वाढ खुंटते, कोवळ्या पानांची वाढ थांबते, पाने पांढरी पडून पातळ होऊन वरच्या बाजूस वाळतात. प्रथिनांचे प्रमाण कमी होते.

२) मॅंगेनीज

 • लोहाचे वहन करण्यासाठी मदत.
 • हरीतद्रव्य तयार करण्यासाठी.
 • पेशींमध्ये ऑक्‍सिजनशी संयोग पावण्याच्या प्रक्रियेत सहायक म्हणून कार्य करते.
 • संप्रेरकाचा महत्त्वाचा घटक असल्यामुळे श्वसन क्रियेत आणि हरीतद्रव्यातील प्रथिने तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत करतो.
 • मॅंगेनीजचा चांगल्याप्रकारे पुरवठा केल्यास ऑक्‍सिजनच्या अन्न उपलब्धतेमुळे होणारे दुष्परिणाम टाळले जातात.

कमतरतेची लक्षणे
नवीन पानांच्या शिरामधील भाग पिवळा पडतो, पानांमध्ये हरितद्रव्य व हरितलवक कमी होते, पिवळ्या ठिपक्यांच्यानंतर पिवळ्या पट्टयात रूपांतर होते किंवा जाळीदार शिरांमध्ये करडे डाग पडतात.

३) जस्त

 • जस्त हे अनेक संप्रेरकाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे शरीरातील अनेक प्रक्रियेमध्ये उदा. ऑक्‍सिजनशी संयोग पावणे, हरितद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया इ. कार्ये व्यवस्थीतपणे पार पाडली जातात.
 • वाढीसाठी आवश्यक असणारे काही संजिवके तयार करण्याच्या प्रक्रियेत जस्ताची मदत होते.
 • ठरावीक वनस्पतींच्या पुनरूत्पादन प्रक्रियेत जस्ताची मदत होते.

कमतरतेची लक्षणे
पाने पिवळी पडून कमजोर होतात. पानांच्या शिरांच्या मधल्या भागातील उती मरतात. शेंड्याकडील पाने खुजी होतात. पालवीवर पांढरे चट्टे येतात, पालवी तपकिरी किंवा जांभळट तांबड्या रंगाची दिसते. खोड वाढते व पाने पक्व होण्यापूर्वी गळतात. साल खडबडीत व टणक होऊन चकाकते.

४) बोरॉन

 • बोरॉन सूक्ष्म मूलद्रव्याचे प्राथमिक आणि महत्त्वाचे कार्य कॅल्शियम या अन्नद्रव्याशी संबंधित आहे. कॅल्शियम या अन्नद्रव्याचे वनस्पतींच्या मुळाद्वारे शोषण आणि त्याचा वनस्पतीमध्ये योग्य उपयोग या बाबतीत बोरॉनचे कार्य महत्त्वाचे आहे.
 • वनस्पतीमध्ये कॅल्शियम विद्राव्य स्वरूपात ठेवून त्याची चलनक्षमता वाढविण्यास बोरॉन मदत करतो.
 • पोटॅश /कॅल्शियमचे प्रमाण योग्य ठेवण्यात बोरॉन हा नियामक म्हणून कार्य करतो.
 • नत्राच्या शोषण प्रक्रियेत बोरॉनची मदत होते. पेशीभित्तीकाचा बोरॉन हा महत्त्वाचा घटक आहे. त्याचप्रमाणे पेशीविभाजनामध्ये बोरॉन हा महत्त्वाचा घटक आहे. त्याचप्रमाणे पेशीविभाजनामध्ये बोरॉन आवश्यक आहे. बोरॉनची कमतरता असल्यास शेंड्याकडील भागास पेशींचे विभाजन थांबल्यामुळे वाढ खुंटते त्यामुळे बोरॉनच्या कमतरतेची लक्षण शेंड्यावर आणि मुळ्यांच्या टोकाशी ठळकपणे दिसून येतात.

बोरॉनच्या कमतरतेची लक्षणे
कळीचा रंग फिकट हिरवा होतो, पानांचा रंग निळसर होउन ती वेडीवाकडी, जाड व ठिसूळ होतात. नवीन पाने गुंडाळतात व सुकतात. कंद फळांचा गाभा काळा पडून त्यांना भेगा पडतात.

५) तांबे

 • हे मूलद्रव्य अमीनो अॅसिड आणि प्रथिनांशी संयोग पावून अनेक प्रकारची संयुगे तयार होतात.
 • वनस्पतीच्या शरीरात ऑक्‍सिजनशी संयोग पावण्याच्या प्रक्रियेत जी संप्रेरके मदत करतात त्या संप्रेरकामध्ये तांबे इलेक्ट्रॉन घटक म्हणून कार्य करते.
 • हरितद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेत लोह या मूलद्रव्याचा वापर अधिक कार्यक्षमपणे करण्यास तांबे मदत करते.

कमतरतेची लक्षणे
पानांचा आकार बारीक होऊन चुरगळतात, कडा करपतात. शेंडेमर झालेल्या फांदीवर अनेक फुटवे फूटून शेंड्यावर लहान पानांचा झुपका तयार होतो, मुळांवर गाठी तयार होण्याची क्रिया मंदावते.

६) मोलाब्द

 • वनस्पतीमधील ऑक्‍सिजनशी संयोग पावण्याच्या प्रक्रियेत संप्रेरक प्रणालीमध्ये मोलाब्द महत्त्वाचे कार्य करते. पेशीमध्ये अॅमिनो अॅसिड आणि प्रथिने तयार होण्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या नायट्रेट नत्राचे रूपांतर अमोनियामध्ये करण्यासाठी मोलाब्द या मूलद्रव्याची विशेष करून गरज आहे.
 • परस्परपूरक सहजीवक सूक्ष्म जिवाणूकडून वातावरणातील नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेत मोलाब्द आवश्यक आहे तसेच वनस्पतीमध्ये वातावरणातील नत्र स्थिरीकरणातील कार्यक्षमता मोलाब्दमुळे वाढते.

कमतरतेची लक्षणे
वाढ खुंटते, पाने पिवळसर व निस्तेज दिसतात, पानांच्या शिरांमधल्या जागेत प्रथम पिवळसर हिरवा किंवा थोडासा नारंगी रंग दिसतो व नंतर तो सर्व पानांवर पसरतो. झाडाची मोठी पाने पेल्याच्या आकाराची होतात. जास्त कमतरता असल्यास पानगळ होते, पानाच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव स्त्रवतो.

या सर्व कारणांमुळेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर जमिनीतून सूक्ष्म अन्नद्रव्ये लोह २ टक्के, मंगल १ टक्के, जस्त ५ टक्के, तांबे ०.५ टक्के आणि बोरॉन १ टक्के याचा वापर मातीपरीक्षणानुसार करावा. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोह २.५ टक्के, मंगल १ टक्के, जस्त ३ टक्के, तांबे १ टक्के, मॉल्ब्डिेनम ०.१ टक्के आणि बोरॉन ०.५ टक्के याचे मिश्रण ०.५ टक्के कमतरतेनुसार पानावर फवारणीद्वारे केल्यास उत्पादनात अधिक फायदा होतो.
महाराष्ट्रातील मातीचे नमुने गोळा करून सूक्ष्म अन्न्द्रव्यासाठी परीक्षण केले असता असे आढळून आले, की महाराष्ट्रातील जमिनीमध्ये ५६.४ टक्के जमिनीत उपलब्ध जस्त ,३९.८ टक्के जमिनीत उपलब्ध लोह व ५६.७ टक्के जमिनीत उपलब्ध बोरॉन या सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळून आली. मराठवाड्यातील माती परीक्षणाच्या अहवालानुसार ३६.४०, २६.०० आणि ३६.०० टक्के जमिनीत उपलब्ध जस्त, लोह आणि बोरॉनची कमतरता दिसून आली. मात्र उपलब्ध मॅंगेनीज, तांबे व मोलाब्द पुरेशा प्रमाणात पिकाना पुरविण्याची क्षमता मराठवाड्यातील जमिनीमध्ये आहे. एकंदरीत मराठवाड्यातील जमिनीमध्ये एकापेक्षा अधिक सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असून माती परीक्षण अहवालानुसार त्यांचा योग्य प्रमाणात वापर पीक उत्पादनाच्या व शेतमालाची प्रत वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.

संपर्क ः डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६
(मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
कमी दरात तूर घेऊन विकली हमीभावाने; दोन...यवतमाळ ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांकडून कमी दरात...
सेंद्रिय भाजीपाल्याला तयार केले ‘...झुलपेवाडी (जि. कोल्हापूर) येथील चिकोत्रा सेंद्रिय...
शेतकरीहितालाच हवे सर्वोच्च प्राधान्यसहकार क्षेत्रात पूर्वीपासूनच काँग्रेस,...
सोशल मीडिया आणि बॅंकिंग जगात आज कोट्यवधी लोक संवाद करणे आणि माहिती...
बीड जिल्ह्यातील चिंचवडगावमध्ये...बीड: थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे...
राज्यातील ५०० कार्यालयांत शेतकरी...मुंबई : शेतकरी बांधवांना अडचणी मांडण्यासाठी,...
ढगाळ हवामानामुळे गारठा कमीचपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव, ढगाळ...
राज्य खत समितीचा ‘रिमोट’ कोणाकडे?पुणे : शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी ‘...
महारेशीम अभियानांतर्गत पाच हजार एकरची...औरंगाबाद: रेशीम विभागाच्यावतीने राबविल्या जात...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी सामूहिक...नाशिक : देशातील कृषी व ऋषी संस्कृतीमध्ये काळ्या...
हार्वेस्टर मालकांकडून ऊस उत्पादकांची...सोलापूर ः ऊसतोडणीसाठी शेतकरी हार्वेस्टर मशिनला...
कुऱ्हा गावाने तयार केली भाजीपाला पिकांत...अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे तालुके संत्रा...
बदनापूर येथे कडधान्य पिकांचे आदर्श ‘...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत...
बोराच्या दोनशे झाडांची उत्कृष्ट बागढवळपुरी (जि. नगर) येथील सुखदेव कचरू चितळकर यांनी...
खानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा...जळगाव  : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर...
हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता. मालवण)...
बाजार समित्यांत शेतकऱ्यांना थेट मतदान...मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
नीरेपासून साखरनिर्मितीचा रत्नागिरीत...रत्नागिरी ः नारळाच्या झाडातून काढल्या जाणाऱ्या...
परवाना निलंबनातही बिनदिक्कत खतविक्रीपुणे : ‘नियमांची पायमल्ली करून विदेशातून...
शेतकरी प्रश्न सुटण्यासाठी...मुंबई : राज्यात तालुकास्तरावर उद्यापासून...