agricultural stories in Marathi, agrowon, Use of mulching, vermicompost to increase organic carbon in soil | Agrowon

आच्छादनासह गांडूळखत वापरातून वाढवा सेंद्रिय कर्ब
अंबादास मेहेत्रे, डॉ. एस. एच. पठाण
शनिवार, 8 डिसेंबर 2018

सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीवर आच्छादन, गांडूळखताची निर्मिती व वापर आणि सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन या तीन बाबी महत्त्वाच्या असतात. त्याविषयीची माहिती या लेखातून घेऊ.

सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीवर आच्छादन, गांडूळखताची निर्मिती व वापर आणि सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन या तीन बाबी महत्त्वाच्या असतात. त्याविषयीची माहिती या लेखातून घेऊ.

आच्छादनाचा वापर ः
काडीकचरा, धसकटे, गवत, साळीचा व गव्हाचा भुसा व तुरकाडी, उसाचे पाचट, कपाशीचे काड याचे आच्छादन करावे. नैसर्गिक घटक असलेल्या आच्छादनाचे कालांतराने सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होते. जिवाणूची वाढ होण्यासाठी सेंद्रिय अन्नघटक उपलब्ध होतात. प्लॅस्टिक आच्छादनामध्ये चंदेरी, काळ्या, पांढऱ्या, निळ्या, पिवळ्या, लाल, आकाशी व पारदर्शक रंगाचे प्लॅस्टिक उपलब्ध आहे. याचा वापरदेखील फायदेशीर दिसून आला आहे.

फायदे :

 • जमिनातील ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पाण्याची २० ते ३० टक्क्यांनी बचत होते.
 • पीक उत्पादनात वाढ होऊन ८० ते ९० टक्के तण नियंत्रण होते. जमिनीत हवा खेळती राहते. पाऊस व वारा यांपासून होणारी जमिनीची धूप थांबते.
 • जमिनीचे अंतर्गत तापमान संतुलित राहते. तापमान संतुलित राहिल्यामुळे जिवाणूची प्रक्रिया आणि जमिनीत जीवरासायनिक प्रक्रिया उत्तम प्रकारे चालण्यासाठी सूक्ष्म अनुकूल वातावरण तयार होते.
 • पिकांचे उत्पन्न, उत्पादन व दर्जा सुधारते.
 • खते आणि पाण्याचा योग्य वापर होतो.

गांडूळखत (Vermicompost):
जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी गांडूळ खताचा वापर करणे क्रमप्राप्त ठरते. गांडुळे पिकांचे अवशेष व अन्य घटकांना वेगाने कुजविण्यासाठी मदत करतात.

गांडूळ खत म्हणजे काय?
गांडूळखतामध्ये गांडूळाची विष्टा, नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ, गांडूळाचे अंडीपुंज, त्यांच्या बाल्यावस्था आणि अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असतो. गांडूळांना सेंद्रिय पदार्थ खावून, त्याच्या पचनसंस्थेतून बाहेर पडतात. या प्रक्रियेमध्ये सेंद्रिय पदार्थांमध्ये अनेक संजीवकांची भर पडते. त्याचा पिकांच्या वाढीसाठी फायदा होतो.

गांडूळखत निर्मितीसाठीच्या गांडूळ प्रजाती ः

 • आयसोनिया फोटिडा आणि युड्रिलस युजुनिया- पृष्ठभागावर कार्य करणाऱ्या गांडूळाच्या जाती.
 • पेरीओनिक्सस कॅव्हेटस
 • फेरिटामाईलो युगाटा – खालच्या थरात आढळणाऱ्या प्रजाती
 • ओक्टोबिटोनिया सिरिटा
 • गांडूळखताचे फायदे :
 • गांडूळखताच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढते.
 • जमिनीची जल धारणक्षमता, घडण, हवा सच्छिद्रता आणि पोत सुधारतो.
 • अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते.
 • कमी कालावधीत जास्त गांडूळखत मिळते.
 • जमीन भुसभशीत राहते.

गांडूळखत तयार करण्याची पद्धत :
गांडूळखत तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. शेतात किंवा गोठ्याच्या आवारात तात्पुरते छत उभारून जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचे गादीवाफे तयार केले जातात. यात गांडूळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार केले जाते.

गांडूळखत निर्मितीचे टप्पे -

 • गांडूळासाठी गादीवाफे तयार करावेत.
 • गांडूळासाठी खाद्य अशा सेंद्रिय पदार्थांचे मिश्रण तयार करावे. खाद्य पदार्थांचे मिश्रण गादी वाफ्यावर योग्य प्रमाणात पसरून घ्यावे.
 • खाद्य मिश्रणावर गांडूळे किंवा ताजे गांडूळ खत टाकावे. खाद्य मिश्रणावर गवत किंवा जुनाट पोत्याचे आच्छादन टाकावे.
 • आच्छादनावर पाणी शिंपडून ते ओलसर ठेवावे.
 • गांडूळखत तयार झाल्यानंतर त्यापासून गांडूळे वेगळी काढणे.

साधनसामग्री :
गांडूळाचे उन्हे आणि पावसापासून संरक्षणासाठी साध्या गवती किंवा बांबूच्या ताटापासून तात्पुरते छप्पर तयार करावे. पावसाळ्यात पावसाचे पाणी आत शिरू नये, यासाठी छप्पर व बाजूने प्लॅस्टिक / ताडपत्री लावून घ्यावी. गांडूळाचे खाद्य म्हणून गुरांचे शेण, शेळ्या- मेंढ्यांचे खत, घोडा-गाढवाची लिद, शेतातील निरुपयोगी सेंद्रिय पदार्थ, पालापाचोळा, भाज्या आणि फळांचे टाकाऊ भाग व उर्वरित अन्नपदार्थ यांचा वापर करता येतो.

सेंद्रिय खतांचे फायदे

 • सेंद्रिय खतांमुळे मातीवर सावली होऊन तापमान वाढत नाही.
 • सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरून ठेवतात.
 • उष्ण तापमानात जमिनीला थंड करणे व कमी तापमानात जमीन गरम ठेवणे सेंद्रिय खतामुळे शक्य आहे. थोडक्यात जमिनीच्या तापमान संतुलनासाठी मदत होते.
 • सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जीवाणूंची वाढ होते. त्यात रोगकारक जीवाणूंही वाढ होऊ शकते. ते रोखण्यासाठी ट्रायकोडर्मा जीवाणू जमिनीत सोडावेत. त्यांची वेगाने वाढ होते.

सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन

 • सेंद्रिय कर्ब हे जमिनीच्या बहुतेक गुणधर्माशी निगडित आहे. ते जमिनीचे गुणधर्म संतुलित आणि नियंत्रित ठेवण्याचे कार्य करते. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीत योग्य प्रमाणात हवा आणि पाणी यांची उपलब्धता होऊ शकते. हवा आणि पाण्यांच्या उपलब्धतेमुळे जमिनीत जीवाणूंची संख्याही वाढते. जीवाणूंच्या कार्य शक्तीत वाढ होते.
 • सेंद्रिय पदार्थांद्वारे सेंद्रिय कर्बाचा पुरवठा संतुलित करता येतो. सेंद्रिय पदार्थांमध्ये शेतीसाठी वापरात येणारी भरखते म्हणजे शेणखत, कंपोस्टखत, कोंबडी खत, शेळ्या–मेंढ्यांचे लेंडी खत, गव्हाचा भुसा, करडईचा भुसा, शेतातील पिकांचे अवशेष, हिरवळीचे खत अशा खतांचा समावेश होतो. एकूण सेंद्रिय पदार्थांमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण विघटनानंतर ५० ते ५८ टक्क्यांपर्यंत असते. सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारतात. तसेच जैविक गुणधर्मातही वाढ होते. वनस्पतींना अन्नद्रव्यांची उपलब्धता व कार्यक्षमता निश्चित वाढते.

नत्रपुरवठा : जमिनीत सेंद्रिय खत टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन ती चांगली वाढतात. शेणखताव्यतिरिक्त कोंबड्यांपासून मिळणारे खत (कोंबडीची विष्ठा), रेशीम उद्योगातील टाकावू पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात.

स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये : सेंद्रिय खतामुळे नत्र, स्फुरद व पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये झाडांना विविध अवस्थेत उपलब्ध होते. ती झाडांमध्ये मुळांद्वारे शोषली जातात.
जमिनीची जलधारण क्षमता वाढते : ०.५ % ते १.० % सेंद्रिय पदार्थ जमिनीला दिल्यास जलधारण क्षमता दुप्पट होते. एका एकरात ८ टन कुजलेले शेण खत घातल्यास त्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ ०.५ % ने वाढतात. जमिनीतील सेंद्रिय खतांचा वापर झाडांद्वारे केला जातो. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत जातात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता वाढते व जलधारण क्षमताही वाढते.

जमिनीचा सामू : सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही.क्षारांच्या कणांची अदला बदल करण्याची जमिनीची शक्ती : सेंद्रिय खतांमुळे कँशन एक्सचेंज कॅपॅसिटी २० ते ३० टक्केने वाढते. त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते. झाडांना संतुलित पोषक द्रव्ये मिळतात.

कर्बाचा पुरवठा : कर्ब किवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जीवाणूंच्या वाढीसाठी त्याचा फायदा होतो. हे जीवाणू जमिनीतून अन्नद्रव्ये झाडांना उपलब्ध करून देतात.

 : अंबादास मेहेत्रे, ९५४५३२३९०६ ,     
: डॉ. एस. एच. पठाण, ८१४९८३५९७०

(सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी)

इतर सेंद्रिय शेती
जमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचा अतूट...वॉक्समन यांच्या सॉईल अॅण्ड मायक्रोब्स या...
जमीन अन् सूक्ष्मजीवपूर्वीच्या रासायनिक शेतीमध्ये...
जमिनी सुपीकता, उत्पादकता वाढीसाठी शेणखत...कृषी विद्यापीठ किंवा संशोधन केंद्रांद्वारे सर्व...
आरोग्यकार्डानुसार शेतात, व्यवस्थापनात...केवळ आरोग्यकार्डाचे वाटप झाले म्हणून...
दृश्य जीवशास्त्रांचाही विचार महत्त्वाचा...गेल्या काही भागांतून आपण आपल्या दृष्टिआड असणाऱ्या...
समजावून घ्या सेंद्रिय कर्बाचे स्थिरीकरणशाश्‍वत सुपीकतेसाठी टिकून राहणारा सेंद्रिय कर्ब...
जमिनीतील ओलावा मोजण्याच्या पद्धतीओलाव्याचे प्रमाण नेमके असल्यास पिकांची वाढ योग्य...
वाढवूया जमिनीतील सेंद्रिय कर्बसेंद्रिय कर्बांचे प्रमाण जमिनीच्या आरोग्यासाठी...
सेंद्रिय कर्ब जमिनीत साठवण्याच्या...कर्बाची साठवण निसर्गामध्ये विविध पदार्थांमध्ये,...
हवामान बदलाचा जमिनीच्या गुणधर्मांवर...जमिनीची निर्मिती हजारो वर्षांमध्ये होते. ती...
शेतीतील कर्ब चक्र जपू यापर्यावरणातील विविध मूलद्रव्यांच्या चक्रानुसार...
सेंद्रिय कर्ब, नत्र पुरवठ्यासाठी...सध्या प्रत्येक कुटुंबामध्ये जनावरांची संख्या कमी...
सेंद्रिय निविष्ठांची घरगुती निर्मितीसेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त निविष्ठा या शेतीवरच...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
कडवंची : जमीन सुपीकतेसाठी बायोगॅस स्लरी कडवंचीमधील शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्राची उभारणी...
गांडूळ नेमके काय काम करतो ? गेल्या काही भागांतून आपण आपल्या दृष्टिआड असणाऱ्या...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
स्थानिक जातींची सेंद्रिय पद्धतीने लागवड...संकरीत जाती आणि रसायनांचा वापर यामुळे शेतकऱ्यांना...
बायोडायनॅमिक शेती पद्धतीचे महत्त्व,...बायोडायनामीक शेती पद्धतीचे उद्गाते डॉ. रुडॉल्फ...
बायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायोडायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...