हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध घेणे आवश्यक

हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध घेणे आवश्यक
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध घेणे आवश्यक

सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट, पाऊस, थंडी, तापमानवाढ अशा स्वरूपात दिसत आहे. जागतिक हवामान दिनाच्या निमित्ताने हवामान बदलाशी सुसंगत तंत्रज्ञानाचा शोध आवश्यक आहे.

जा गतिक हवामान संघटना (डब्ल्यूएमओ) या संस्थेची स्थापना २३ मार्च १९५० रोजी जिनिव्हा येथे झालेल्या सभेत झाल्यामुळे दर वर्षी हा दिवस “जागतिक हवामान दिन” म्हणून पूर्ण जगभर साजरा केला जातो. या सभेत आंतरराष्ट्रीय हवामान संघटनेचे (आयएमओ) रूपांतर जागतिक हवामान संघटनेमध्ये (डब्ल्यूएमओ) करण्यात आले. हवामानविषयक सर्व यंत्रसामग्रीच्या तांत्रिक बाबी हीच संघटना ठरवते, म्हणून या संघटनेला महत्त्व आहे. आज या संस्थेचे भारतासह सुमारे १९१ देश सदस्य आहेत. ही संस्था हवामानाविषयी सर्व बाबींवर विश्वव्यापी कार्य करत आहे. या विशेष दिवसासाठी दरवर्षी एक थिम निवडली जाते, या वर्षीच्या जागतिक हवामान दिनाचे ब्रीद ‘सूर्य, पृथ्वी आणि हवामान’ असे आहे.

जागतिक तापमानवाढ व परिणाम औद्योगिक क्रांतीनंतरच्या म्हणजेच मागील अडीचशे वर्षाच्या काळात मानवी हस्तक्षेपामुळे वातावरणात कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे (आयपीसीसी २०१८ च्या अहवालानुसार तापमानात १.५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे). हवामानामध्ये बदल होण्यामागे अनेक कारणे आहेत, उदा. हरितगृह वायूंचे वाढते प्रमाण, झाडांची तोड, वाढते प्रदूषण यामुळे ग्लोबल वार्मिंगसारख्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाढत्या तापमानाला नियंत्रित करण्यासाठी “संयुक्त राष्ट्र संघटना” जगभरामध्ये कार्यरत आहेत.   तापमानवाढीमुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होऊन अनेक जीव प्रजातींचा ऱ्हास होईल, हवेच्या वेगामध्ये वाढ होईल. बरेचसे समुद्रकिनारे आणि कमी उंचीवरील बेटे पाण्याखाली जातील. अनेक नैसर्गिक अधिवास नष्ट होतील. दुष्काळाची वारंवारता वाढेल. जलपुरवठ्यात घट होईल.

हवामान बदलाचे शेतीवरील दुष्परिणाम   तापमानवाढ, किमान व कमाल तापमानातील तफावत, हवेतील आर्द्रता, अनियमित पाऊस, गारपीट, वारंवार घडणा­ऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांवरील कीड-रोगांच्या प्रादुर्भावात मोठी भर, नवीन कीड-रोगांची उत्पत्ती इत्यादी. हवामान बदलामुळे पशुपक्ष्यांवरही विपरीत परिणाम होत आहेत, यामध्ये कोंबड्यांतील मरतूक वाढणे, गाय, म्हैस, शेळ्या मेंढ्या व कोंबड्या यांच्यात थंडीची लाट, उष्णतेची लाट, अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे आजारांचा प्रसार होतो. गारपिटीमुळे व अवकाळी पावसामुळे पिकांचे, भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान होते. पर्जन्यमानातील अनियमिततेमुळे भूजल पातळीत घट झाली असून, दुष्काळी स्थितीत वाढ होत आहे.

उपाययोजना भविष्यात हवामानाशी सुसंगत उपाययोजना व तंत्रज्ञानाचा शोध व त्याकडे वळणे गरजेचे झाले आहे.हवामानाचा अंदाज, त्याचा पिकांवर होणारा परिणाम व त्यावरील उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोचणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे बदलत्या हवामानाशी जुळवून घेत शेती करणे शक्य होईल. याच उद्देशाने १३२ केंद्रांमार्फत संपूर्ण देशामध्ये ग्रामीण कृषी मौसम सेवा ही योजना राबविली जात आहे. महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत चार केंद्रे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषिषी विद्यापीठ, दापोलीअंतर्गत दोन केंद्रे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाअंतर्गत दोन तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीअंतर्गत एका केंद्रामार्फत कृषी हवामान सल्ला सेवेचे काम चालते. यामधून दिल्या जाणाऱ्या­ हवामान सल्ल्याचा उपयोग शेतकऱ्यांबरोबरच पर्यटन, पाणी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापनासाठी होतो.  ः प्रमोद शिंदे, ७५८८५६६६१५ (शिंदे हे संशोधन सहयोगी तर डॉ. डाखोरे हे मुख्य प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com