agricultural stories in Marathi, agrowon, WEATHER FORECAST BY DR. SABALE SIR | Agrowon

थंड, ढगाळ अन् कोरड्या हवामानाची शक्यता

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा

महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा
दाब राहील. त्याचवेळी बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग आणि त्यालगत हिंदी महासागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. तेथे १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मध्य आणि उत्तर भारतावर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक, तर ईशान्य भारतावर १०१६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहिल्यामुळे वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. त्यामुळे थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने येतील. हवेच्या कमी दाबाचे बंगाल उपसागरातील क्षेत्र दिनांक ११ नोव्हेंबर रोजी उत्तर दिशेने बंगालचे उपसागरातच सरकल्याने महाराष्ट्रावरील हवेचा दाब कमी होतील. मात्र ते १०१२ हेप्टापास्कलच्या जवळपासच राहतील. दिनांक १२ नोव्हेंबर रोजी बंगालचे उपसागरातील हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र पूर्व किनारपट्टीचे दिशेने येईल आणि हवेच्या कमी दाबाचे क्षेत्रात १००६ हेप्टापास्कल इतका कमी दाब राहील.
     दिनांक १३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील आणि दक्षिण महाराष्ट्रावरील हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके कमी होतील. त्या वेळी पूर्वकिनाऱ्यालगत तयार झालेले लहान वादळ भारताच्या पूर्वकिनाऱ्यालगतच्या भागातून भूपृष्ठाकडे झेपावेल. दिनांक १४ नोव्हेंबर रोजी संपूर्ण पश्‍चिम किनारपट्टीवर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील, तसेच त्याच दिवशी पूर्व किनारपट्टीवरही तितकाच कमी हवेचा दाब राहील. दिनांक १५ नोव्हेंबर रोजी दक्षिण भारतातील आणि महाराष्ट्रातील हवेचे दाब समान राहतील. पूर्व किनारपट्टीवरील वादळी वारे तमिळनाडूपासून भूपृष्ठावर झेपावतील आणि तेथे प्रथम पाऊस सुरू होईल.    दिनांक १६ नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात पावसाची सुरवात होऊन ज्या भागात हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होतील तेथे पाऊस होईल. अरबी समुद्र आणि  बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत वाढले. त्यामुळे या आठवड्यात दिनांक १७ रोजी पावसाची शक्‍यता राहील.

 कोकण
 रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. ठाणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६८ टक्के राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ७७ टक्के राहील. ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ टक्के राहील. सिंधुदूर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ४५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. रत्नागिरी जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्‍यता असून उर्वरित जिल्ह्यात पावसाची शक्‍यता नाही.

उत्तर महाराष्ट्र
 धुळे जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ३९ टक्के तर जळगाव व नाशिक जिल्ह्यात ४१ ते ४९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता धुळे व नंदुरबार जिल्ह्यात २२ ते २३ टक्के राहील. नाशिक व जळगाव जिल्ह्यात २७ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. जळगाव जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

मराठवाडा
 मराठवाड्यात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा अाग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग हिंगोली व नांदेड जिल्ह्यात ३ ते ४ किलोमीटर राहील. उर्वरीत जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किलोमीटर राहील. परभणी व जालना जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील, तर लातूर जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. लातूर, बीड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. नांदेड व जालना जिल्ह्यात ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ५० ते ५६ टक्के राहील. उस्मानाबाद, नांदेड व बीड जिल्ह्यात ६० ते ६१ टक्के राहील. लातूर जिल्ह्यात ७३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ३१ ते ३७ टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील.

 पश्‍चिम विदर्भ
 कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे हवामान थंड राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ३७ ते ४० टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

मध्य विदर्भ
यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळीच सापेक्ष आर्द्रता ४० ते ४८ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. हवामान थंड व कोरडे राहील.

पूर्व विदर्भ
 गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. भंडारा जिल्ह्यात ते ३२ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ते ३३ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ते १८ अंश सेल्सिअस, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ते १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ५१ ते ५८ टक्के राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ४६ टक्के राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते २५ टक्के राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १८ ते १९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ टक्के राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

 दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र
 कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील, तर सांगली, सातारा, सोलापूर व नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. सांगली जिल्ह्यात ते २० अंश सेल्सिअस राहील. सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ७१ टक्के, नगर जिल्ह्यात ५९ टक्के तर सातारा, सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यात ६३ ते ६६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ३४ ते ३९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सातारा, पुणे व नगर जिल्ह्यात ५ ते ६ किलोमीटर राहील. तर कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यात ८ ते १० किलोमीटर राहील. कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा पूर्वेकडून तर सातारा जिल्ह्यात ईशान्येकडून व उर्वरीत जिल्ह्यात अग्नेयेकडून राहील.

कृषिसल्ला

  • ज्या क्षेत्रात पेरणी योग्य ओल आहे तेथे हरभऱ्याची पेरणी करावी. शक्यतो दोन पाणी देण्याची सोय असल्यास तेथे हरभरा पेरणी करून सारे व पाट पाडावेत.
  • बागायत क्षेत्रात जेथे पाच पाणी देणे शक्‍य आहे तेथे गव्हाची पेरणी करावी. पेरणीनंतर सारे व पाट पाडावेत.
  • ज्वारी एक महिन्याची झाली असल्यास कोळपणी करावी.
  • पूर्वहंगामी उसाची लागवड १५ नोव्हेंबर पूर्वी बागायत क्षेत्रात करावी.
  • बागायत क्षेत्रात तीन पाणी देणे शक्‍य असल्यास मोहरीची लागवड करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर ताज्या घडामोडी
माणसाचे प्राचीन पूर्वज खात झाडांचे कठीण...माणसांच्या प्राचीन पूर्वजांच्या आहारामध्ये...
प्लॅस्टिकच्या सूक्ष्मकणांचे खेकड्यांवर...सागरी किनाऱ्यावरील वाळूतील प्रौढ खेकड्यांच्या...
वस्तू खरेदीची बिले पंचायत समित्यांना...पुणे  : जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक लाभ...
जैवविविधता नोंदणीसाठी धावपळपुणे: राज्यातील खेडोपाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
नगर जिल्ह्यात कांदा दरात चढउतार; शेतकरी...नगर  ः जिल्ह्यात मागील महिन्यात कांद्याला...
नांदेड, परभणी, हिंगोलीत साडेबारा लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
सातारा जिल्ह्यातील शेतकरी सौर...सातारा  : महावितरण कंपनीकडून कृषी पंपाच्या...
मूर्तिजापूरमध्ये कृषी अधिकारी पोचले...अकोला  ः शेतकरी विविध प्रकारची पिके घेऊन...
औरंगाबाद जिल्ह्यात शेती आधारित उद्योग,...औरंगाबाद  : जिल्ह्याचा पालकमंत्री व...
नाशिक जिल्ह्यात रब्बीची एक लाख १५ हजार...नाशिक  : जिल्ह्यात रब्बी हंगामात एकूण १ लाख...
यवतमाळमध्ये ‘आधार’अभावी थकले कापूस...यवतमाळ  ः कापूस चुकाऱ्यासाठी बॅंक खाते आधार...
जळगाव जिल्ह्यात युरियाचा साठा संपला !जळगाव  ः खतांच्या वापरात आघाडीवर असलेल्या...
राजापुरात पावणेदोनशे क्विंटल भात खरेदीराजापूर, जि. रत्नागिरी  ः राजापूर तालुका...
पोल्ट्री सुरू करायचीय, नक्की वाचा......विमलताई या गावातील समाजकार्यास वाहून घेतलेल्या...
या आठवड्यात ढगाळ, थंड, कोरडे हवामान...महाराष्ट्राच्या मध्य भागावर पूर्व व पश्‍चिम...
सकस चाऱ्या‍साठी बीएचएन - १० संकरित...महाग खुराकातील काही भाग स्वस्त चाऱ्या‍मधून देणे...
माथाडी कामगारांच्या प्रश्‍नांसाठी लवकरच...पुणे  ः माथाडी आणि कामगार कायदा गुंतागुंतीचा...
नगर, नाशिकला पुढील वर्षी ऊसदरात फटका ?नगर ः नगर, नाशिकसह राज्याच्या अनेक भागांत उशिरा...
धरण कालवा सल्लागार समितीची आज नगरला बैठकनगर  : मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या...
परभणीत मूग, उडदाचा पीकविमा परतावा मंजूरपरभणी  ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...