agricultural stories in Marathi, agrowon, Wheat aphids, jassids management | Agrowon

गहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

डॉ. संजय पाटील, डॉ. बबनराव इल्हे, सुरेश दोडके
गुरुवार, 17 जानेवारी 2019

गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच उपाययोजना न केल्यास उत्पादनात २५ ते ३० टक्के नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रादुर्भावाची तीव्रता लक्षात घेऊन निरीक्षणे नोंदवून एकात्मिक व्यवस्थापन करावे.

गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच उपाययोजना न केल्यास उत्पादनात २५ ते ३० टक्के नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रादुर्भावाची तीव्रता लक्षात घेऊन निरीक्षणे नोंदवून एकात्मिक व्यवस्थापन करावे.

यंदा गहू पिकाच्या पेरणीला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरवात झाली. ज्या ठिकाणी उसाचे क्षेत्र होते त्या ठिकाणी डिसेंबरअखेर पर्यंत पेरणी पूर्ण झाली. सद्य परिस्थितीत रात्रीचे तापमान ३ ते ८ अंश सेल्सिअस आणि दिवसाचे तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस सातत्याने टिकून असल्याचे दिसून येत आहे. पेरणीपासून टिकून असणारी थंडी जशी गहू पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरत आहे, तशीच मावा आणि तुडतुडे या किडींच्या प्रादुर्भावासाठीही अनुकूल झालेली आहे. अशा वातावरणामुळे सध्या पिकावर तुडतुडे आणि मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.

१) मावा

  • पिले व प्रौढ पानांच्या पाठीमागच्या बाजूस, कोवळे शेंडे तसेच खोडावर समूहाने एकवटलेली दिसून येतात व त्यातील पेशीरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळसर रोगट होतात.
  • मधाप्रमाणे चिकट द्रव विष्ठेवाटे पांनांवर, खोडावर व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यांवर टाकते, त्यावर काळी बुरशी वाढुन पानाची प्रकाश संश्‍लेषण क्रिया बंद होते, परिणामी रोपे मरतात आणि पीक उत्पादनात मोठी घट येते.

२) तुडतुडे

तुडतुडे पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पानांचे शेंडे गळून पाने पिवळी पडू लागतात आणि रोपांची वाढ खुंटते.

एकात्मिक व्यवस्थापन

  • शेतामध्ये एकरी १०-१२ पिवळे चिकट सापळे लावावेत. त्यामुळे प्रादुर्भावाचे प्रमाण लक्षात येते आणि योग्य त्या उपाययोजना करता येतात.
  • मावा किडीची आर्थिक नुकसान पातळी म्हणजे साधारणपणे दहा मावा कीड (पिले/प्रौढ) प्रति झाड किंवा फुटवा दिसल्यानंतर त्वरित उपाययोजना कराव्यात.
  • जैविक उपायांमध्ये व्हर्टीसीलीअम लेकॅनी किंवा मेटॅऱ्हाझिअम अॅनिसोप्ली ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.

रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)
मावा किडीच्या नियंत्रणासाठी
थायोमिथोक्झाम (२५ टक्के) ०.१ ग्रॅम

तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी
डायमिथोएट (३० ईसी) १ मिली किंवा मावा किडीच्या नियंत्रणासाठी सुचविलेल्या उपाययोजना कराव्यात.

संपर्क ः डॉ. संजय पाटील, ०७५८८०३६४४८
(सहायक प्राध्यापक, कीटकशास्त्र, कृषी संशोधन केंद्र, निफाड)


फोटो गॅलरी

इतर तृणधान्ये
बाजरी मूल्यवर्धनातून वाढवा नफाबाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास...
आरोग्यदायी नाचणीनाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसीन, थायामीन...
असे करा ज्वारीवरील खोडकिडीचे नियंत्रण..ज्वारी हे मानवी खाद्य आणि पशुखाद्यासाठी कडबा अशा...
असे करा गव्हावरील तांबेरा रोगाचे...गहू पिकाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटून गेले...
असे करा ज्वारी, गव्हावरील खोडमाशीचे...रब्बी हंगामातील ज्वारी व गहू पिकावर खोडमाशीचा...
कृषी सल्ला : तूर, हरभरा, ज्वारी, कांदा...तूर शेंगा पक्वतेची अवस्था शेंग माशी, घाटे अळी...
असे करा गहू पिकावरील खोडमाशी व मावा...गहू पिकात बुटक्या आणि मध्यम बुटक्या वाणांचा...
उशिरा गहू पेरणीसाठी जाती व नियोजनया वर्षी परतीच्या पावसाने अधिक काळ मुक्काम...
नियोजन गव्हाच्या उशिरा पेरणीचे बागायत उशिरा पेरणीची शिफारस १६ नोव्हेंबर ते १५...
गहू पिकावरील किडींचे वेळीच करा नियंत्रणगहू पिकांच्या उत्पादनात घट येण्यामध्ये किडींचा...
आहारात असावी आरोग्यदायी बाजरीगहू खाण्याचे प्रमाण वाढत गेल्याने ज्वारी, बाजरी,...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
पेरणी पद्धतीने भात लागवडभाताची लागवड १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी. दोन...
ज्वारी वाणाची विविधता : मूल्यवर्धनातून...कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारीचे विविध...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
तयारी खरिपाची : भात लागवडीचे सुधारित...भारतातील सुमारे २/३ लोकांच्या दररोजच्या आहारात...
आहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...
गहू पिकावरील रोग नियंत्रणयंदाचा हंगाम आतापर्यंत गहू पिकासाठी अत्यंत पोषक...
गहू पिकावरील कीड नियंत्रणगहू पिकावर सध्या मावा, तुडतुडे, कोळी अशा किडींचा...
गहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...