गहू पिकावरील कीड नियंत्रण

गहू पिकावरील कीड नियंत्रण
गहू पिकावरील कीड नियंत्रण

गहू पिकावर सध्या मावा, तुडतुडे, कोळी अशा किडींचा प्रादुर्भाव दिसत आहे.

मावा –

लक्षणे:

  • ही कीड फिकट पिवळसर- काळपट, हिरवट रंगाची साधारणपणे दोन ते तीन मि.मी. लांबीची असते. या किडीच्या शरीराच्या पाठीमागच्या बाजूस दोन नलिकांसारखे अवयव असतात.
  • या किडीचे पिल्ले व प्रौढ पानांच्या पाठीमागील बाजूस, कोवळे शेंडे तसेच खोडावरील पेशीरस शोषून घेतात.
  • गहू पिकाचे पाने पिवळसर, रोगट होतात.
  • ही कीड मधाप्रमाणे गोड चिकट द्रव विष्ठेद्वारे पानांवर, खोडावर व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यांवर टाकते. त्यावर बुरशी वाढून पानाची प्रकाशसंश्‍लेषण क्रिया बंद होते.
  • परिणामी, गहू रोपे किंवा झाडे मरतात. पीक उत्पादनात मोठी घट येते.
  • नियंत्रण- आर्थिक नुकसान संकेत पातळी - दहा मावा कीड प्रतिरोप. वरील मर्यादा ओलांडल्यानंतर फवारणी प्रतिलिटर पाणी व्हर्टिसिलियम लेकॅनी ५ ग्रॅम किंवा मेटारायझियम ५ ग्रॅम - १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे. थायामिथोक्‍झाम (२५ डब्ल्यूजी) ०.१ ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड ०.५ ग्रॅम. तुडतुडे लक्षणे :

  • तुडतुडे हे कीटक तीन ते चार मि.मी. लांब, पाचरीच्या आकाराचे हिरवट- राखाडी रंगाचे असतात. हे पानांवर दोन्ही बाजूंस तिरकस चालताना आढळून येतात.
  • तुडतुडे पानातील अन्नरस शोषून घेतात.
  • पानांचे शेंडे पिवळे पडतात व रोपाची वाढ खुंटते.
  • नियंत्रण – फवारणी प्रतिलिटर पाणी डायमिथोएट (३० ईसी) १.५ मि.लि. पिकावर मावा आणि तुडतुडे एकत्रितपणे आढळून आल्यास मावा किडीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या उपायांचा वापर करावा. कोळी : लक्षणे: ही कीड लांब वर्तुळाकार, लाल- पिवळसर, पांढरट तपकिरी रंगाची असून ती पानांच्या पाठीमागच्या बाजूस राहून पानांतील रस शोषण करते. नियंत्रण – फवारणी प्रतिलिटर पाणी गंधक (८० डब्ल्यूपी पाण्यात मिसळणारे) २ ग्रॅम किंवा डायकोफॉल १ मि.लि. किंवा डायमिथोएट १.५ मि.लि. किंवा ॲबामेक्‍टिन ०.३ मि.लि. पुढील फवारणी १० ते १२ दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून घ्यावी. श्रीकांत खैरनार; ८८०५७५७५२७ (अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था, महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी, पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com