agricultural stories in Marathi, agrowon, wheat pest management | Agrowon

गहू पिकावरील कीड नियंत्रण

श्रीकांत खैरनार, जुनेद बागवान, विठ्ठल गीते
बुधवार, 30 जानेवारी 2019

गहू पिकावर सध्या मावा, तुडतुडे, कोळी अशा किडींचा प्रादुर्भाव दिसत आहे.

मावा –

लक्षणे:

गहू पिकावर सध्या मावा, तुडतुडे, कोळी अशा किडींचा प्रादुर्भाव दिसत आहे.

मावा –

लक्षणे:

  • ही कीड फिकट पिवळसर- काळपट, हिरवट रंगाची साधारणपणे दोन ते तीन मि.मी. लांबीची असते. या किडीच्या शरीराच्या पाठीमागच्या बाजूस दोन नलिकांसारखे अवयव असतात.
  • या किडीचे पिल्ले व प्रौढ पानांच्या पाठीमागील बाजूस, कोवळे शेंडे तसेच खोडावरील पेशीरस शोषून घेतात.
  • गहू पिकाचे पाने पिवळसर, रोगट होतात.
  • ही कीड मधाप्रमाणे गोड चिकट द्रव विष्ठेद्वारे पानांवर, खोडावर व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यांवर टाकते. त्यावर बुरशी वाढून पानाची प्रकाशसंश्‍लेषण क्रिया बंद होते.
  • परिणामी, गहू रोपे किंवा झाडे मरतात. पीक उत्पादनात मोठी घट येते.

नियंत्रण-
आर्थिक नुकसान संकेत पातळी - दहा मावा कीड प्रतिरोप.
वरील मर्यादा ओलांडल्यानंतर फवारणी प्रतिलिटर पाणी
व्हर्टिसिलियम लेकॅनी ५ ग्रॅम किंवा मेटारायझियम ५ ग्रॅम - १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.
थायामिथोक्‍झाम (२५ डब्ल्यूजी) ०.१ ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड ०.५ ग्रॅम.

तुडतुडे

लक्षणे :

  • तुडतुडे हे कीटक तीन ते चार मि.मी. लांब, पाचरीच्या आकाराचे हिरवट- राखाडी रंगाचे असतात. हे पानांवर दोन्ही बाजूंस तिरकस चालताना आढळून येतात.
  • तुडतुडे पानातील अन्नरस शोषून घेतात.
  • पानांचे शेंडे पिवळे पडतात व रोपाची वाढ खुंटते.

नियंत्रण –
फवारणी प्रतिलिटर पाणी
डायमिथोएट (३० ईसी) १.५ मि.लि.
पिकावर मावा आणि तुडतुडे एकत्रितपणे आढळून आल्यास मावा किडीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या उपायांचा वापर करावा.

कोळी :

लक्षणे:
ही कीड लांब वर्तुळाकार, लाल- पिवळसर, पांढरट तपकिरी रंगाची असून ती पानांच्या पाठीमागच्या बाजूस राहून पानांतील रस शोषण करते.

नियंत्रण – फवारणी प्रतिलिटर पाणी
गंधक (८० डब्ल्यूपी पाण्यात मिसळणारे) २ ग्रॅम किंवा डायकोफॉल १ मि.लि. किंवा डायमिथोएट १.५ मि.लि. किंवा ॲबामेक्‍टिन ०.३ मि.लि.
पुढील फवारणी १० ते १२ दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून घ्यावी.

श्रीकांत खैरनार; ८८०५७५७५२७
(अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था, महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी, पुणे.)


इतर तृणधान्ये
कृषी शिक्षणाचा उठलेला बाजारम हाराष्ट्रातील कृषी महाविद्यालयांमध्ये शिक्षण...
बाजरी लागवडीचे तंत्रबाजरीची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी....
ज्वारी पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापनज्वारी पिकांच्या कमी उत्पादकतेमध्ये कीड, रोगामुळे...
कापसाचा शिल्लक साठा बाहेर पाठवा कोरोना संक्रमण काळातील सुरुवातीचे तीन-चार महिने...
हिवाळ्यात आरोग्य, पोषणासाठी बाजरीअलीकडे अगदी ग्रामीण भागातही गहू खाण्याचे प्रमाण...
उशिरा पेरणीसाठी योग्य गहू जातींची निवडराज्यामध्ये परतीचा पाऊस दीर्घकाळ रेंगाळल्यामुळे...
अधिक उत्पादनासाठी गहू लागवड तंत्रज्ञानमहाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन १७६१ किलो...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रखपली गव्हाच्या सुधारित रोग प्रतिकारक जाती, योग्य...
नियंत्रण भातावरील दाणे रंगहीनता रोगाचे...सध्या पाऊस कमी झाला असून अति दमट व उष्ण हवामान...
बागायती गहू लागवडीची सूत्रेगव्हाची पेरणी जमिनीत पुरेशी ओल असताना दक्षिणोत्तर...
रब्बी हंगामातील लागवडीचे नियोजनरब्बी हंगामात कोरडवाहू परिस्थितीमध्ये नैसर्गिक...
भातसल्ला (कोकण विभाग)पुढील पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता...
जमिनीच्या प्रकारानुसार वापरा ज्वारी वाणराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
रब्बी ज्वारी लागवडीचे सुधारित तंत्रमहाराष्ट्रातील शेती ही प्रामुख्याने कोरडवाहू...
रब्बी ज्वारीसाठी करा मुलस्थानी जलसंधारणरब्बी हंगामात ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी...
भातावरील करपा, आभासमय काजळी रोगांचे...खरीप भात पिकांमध्ये सातत्याचे ढगाळ व दमट वातावरण...
भातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे...उष्ण - दमट हवामान, जास्त आर्द्रता, भात खाचरातील...
चाऱ्यासाठी ज्वारीचा नवा वाण ‘सीएसव्ही...चारा पीक म्हणून ज्वारी अत्यंत उपयुक्त आहे....
रहू, चटई पद्धतीने भात लागवडीचे नियोजनचटई पद्धतीने नवीन भात रोपवाटिका तयार करावी. या...
ज्वारी उत्पादनवाढीची सूत्रेज्वारी हे कमी पावसात धान्य व कडब्याचे हमखास...