जिरायती गहू पिकासाठी ओलावा महत्त्वाचा

जिरायती गहू पिकासाठी ओलावा महत्त्वाचा
जिरायती गहू पिकासाठी ओलावा महत्त्वाचा

जिरायती गव्हाच्या लागवडीमध्ये ओलाव्याचे महत्त्व मोठे आहे. या ओलाव्याचा वापर योग्य प्रकारे केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. बियाणे ५ से.मी.पेक्षा जास्त खोल पेरू नये, त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कमी होते. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा/वापसा असताना पेरणी करावी.

जमिनीत ओलावा टिकवण्याचे तंत्रज्ञान रब्बी हंगामात पावसाचे पाणी गहू पिकाच्या जमिनीत कसे मुरवता येईल यासाठी खालील तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.

बांधबंदिस्ती करणे परतीच्या पावसाची तीव्रता जास्त असल्यास व जमीन उताराची असल्यास, पावसाचे पाणी जास्त वेगाने वाहून जाते. परिणामी ते जमिनीत कमी मुरते. अशा उथळ व मध्यम खोल जमिनीत समपातळीतील बांध व खोल जमिनीत ढाळेचे बांध टाकावेत. पाणी अडवले जाऊन दीर्घकाळ मुरवले जाईल. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.

आंतरबांध व्यवस्थापन जिरायत गहू पिकाखालील विशेषतः खोल जमिनीत लहान सरी वरंबे पाडून किंवा लहान सारे पडावेत व जमिनीत बांधणी करावी.

उतारास आडवी मशागत करावी

  • बांधबंधिस्ती केलेल्या जिरायत क्षेत्रात नांगरणी, कुळवणी, पेरणी व कोळपणी यासारखी शेती मशागतीची कामे जमिनीच्या उतारास आडवी करावीत.
  • नांगरणीमुळे जमिन भुसभुशीत होऊन
  • तीत जास्त ओलावा साठवण्यास मदत
  • होते.
  • कुळवणी केल्यामुळे तणांचा नाश होतो. त्यामुळे तणांशी स्पर्धा कमी होऊन पिकाला अधिक ओलावा मिळतो. जिरायत गव्हात आंतरमशागत करावी. जमिनीच्या पृष्ठभागावर भुसभुशीत मातीचा थर
  • तयार होऊन भेगा बुजतात. त्यामुळे बाष्पीभवनाद्वारे उडून जाणारा ओलावा टिकून राहतो.
  • कोळपणी करणे अतिशय महत्त्वाचे आहे

  • पीक उगवून आल्यानंतर त्यात ठराविक दिवसात कोळपणी करणे आवश्यक असते. त्यामुळए तणे नष्ट करण्यासोबतच ओल थोपवली जाते. “एक कोळपणी आणि अर्धे पाणी” अशी म्हण आहे. जिरायत रब्बी गव्हामध्ये दोन कोळपण्याची शिफारस केली आहे.
  • पहिली कोळपणी पिक तीन आठवड्यांचे झाल्यावर करावी.
  • दुसरी कोळपणी पिक ५ आठवड्यांचे झाल्यावर करावी.
  • आच्छादनाचा वापर
  • गहू पिकात सेंद्रिय आच्छादन उदा. तूरकाठ्याचा भुसा, धसकटे, वाळलेले गवत, भाताचे काड किंवा भुसा यांचा वापर करावा. हेक्टरी ५ ते १० टन आच्छादनाचा वापर केल्यास पीक उत्पादनात सुमारे   ४० ते ५० टक्के वाढ मिळत असल्याचे दिसून आले आहे.
  • लागवडीनंतर शक्य तितक्या लवकर आच्छादन करून घ्यावे, अधिक फायदा होतो. कोणत्याही परिस्थितीत पीक ६ आठवड्यांचे होण्याच्या आत आच्छादनाचा वापर करावा. सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये ३५ ते ५० मी.मी. ओलावा अधिक मिळतो. थोडक्यात एक संरक्षित पाणी दिल्यासारखे होते.
  •  : डॉ. विजेंद्र बाविस्कर, ८३७४१७४७९७ (कृषी विद्यावेत्ता, अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था (महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी), पुणे.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com