agricultural stories in Marathi, chiplunkar lekh about walksman's research | Agrowon

जमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचा अतूट संबंध
प्र. र. चिपळूणकर
बुधवार, 19 जून 2019

वॉक्समन यांच्या सॉईल अॅण्ड मायक्रोब्स या पुस्तकातून सेंद्रिय पदार्थ कुजत असता अनेक सेंद्रिय आम्लांची निर्मितीपर्यंतची माहिती मागील भागामध्ये घेतली. या भागामध्ये त्याचा उर्वरित अंश शेतकऱ्यांसाठी देत आहोत.

सेंद्रिय पदार्थ कुजत असता अनेक सेंद्रिय आम्लांची निर्मिती होते. ही सेंद्रिय आम्ले अस्थिर असतात. काम नसेल तर कर्बवायू+ पाणी असे विघटन होऊन संपतात. याविषयी माहिती दिल्यानंतर वॉक्समन आपल्या पुस्तकात पुढे सांगतात. सेंद्रिय पदार्थ कुजण्याची प्रक्रिया जमिनीची सुपीकताही वाढविते. वरील दोन संदर्भावर चिंतन केल्यास काही गोष्टी लक्षात येतात त्या अशा-

वॉक्समन यांच्या सॉईल अॅण्ड मायक्रोब्स या पुस्तकातून सेंद्रिय पदार्थ कुजत असता अनेक सेंद्रिय आम्लांची निर्मितीपर्यंतची माहिती मागील भागामध्ये घेतली. या भागामध्ये त्याचा उर्वरित अंश शेतकऱ्यांसाठी देत आहोत.

सेंद्रिय पदार्थ कुजत असता अनेक सेंद्रिय आम्लांची निर्मिती होते. ही सेंद्रिय आम्ले अस्थिर असतात. काम नसेल तर कर्बवायू+ पाणी असे विघटन होऊन संपतात. याविषयी माहिती दिल्यानंतर वॉक्समन आपल्या पुस्तकात पुढे सांगतात. सेंद्रिय पदार्थ कुजण्याची प्रक्रिया जमिनीची सुपीकताही वाढविते. वरील दोन संदर्भावर चिंतन केल्यास काही गोष्टी लक्षात येतात त्या अशा-

  • सेंद्रिय पदार्थ थेट जमिनीतच कुजविले पाहिजे. ही क्रिया जास्तीत जास्त काळ चालू राहील तितके चांगले.
  • याचाच आणखी एक अर्थ ः जमिनीबाहेर कुजलेले खत टाकणे चुकीचे आहे. (उदा. शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत)
  • हरितक्रांतीनंतर पुढे २५-३० वर्षांत बहुतेक जमिनींची अल्कतेकडे वाटचाल चालू आहे. त्याला कुजण्याच्या क्रियेतून तयार होणारी आम्ले थांबवू शकतील. ही अल्कतेकडे चालू असलेली वाटचाल रोखण्यासाठी सध्या गंधक अगर फॉस्फरिक आम्लाचा खर्चिक पर्याय वापरला जातो.
  • या संदर्भास अनुसरून १९९० पासून मी चांगले कुजलेले खत वापरणे बंद केले. पीक कापणीनंतर पिकाचे अवशेष जागेलाच कुजविणेचा निर्णय घेतला. त्यातून पुढे बिनानांगरणी करता शेती करण्याची पद्धत विकसित झाली. माझ्या जमिनीची सुपीकता व उत्पादकता केवळ एकाच वर्षात नोंद घेण्यासारखी सुधारली.

वैरणीवर जनावरांच्या शरीरात असे बदल होतात...

जनावरांनी वैरण खाल्यानंतर त्याचे मूळ स्वरूप पूर्णपणे बदलत त्याचे शेणामध्ये रुपांतर होते. वैरणीतील सहज कुजू शकणाऱ्या भागांचे जनावरांच्या शरीरात शोषण होते. वैरणीतील नत्र प्रामुख्याने मुत्रवाटे बाहेर टाकला जाते. शेण हे मूळ वैरणीपेक्षा कुजण्यास जड असते. जनावरामध्ये (मानवासह) खाद्यातील शरीरवाढीसाठी योग्य पदार्थ बाजूला करण्याचे काम शरीरात जिवाणूंमार्फत केले जाते. हे शेण किंवा विष्ठेचा २० टक्के भाग हा या मृत जिवाणूंचा असतो.

या पुस्तकातील शेवटची प्रकरणे खालील प्रमाणे आहेत.
जमिनीतील नत्राची स्थित्यंतरे, पिकाच्या वाढीचा आणि सूक्ष्मजीवांचा संबंध,
जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या संख्येमध्ये वाढीबाबत जमिनीतील सूक्ष्मजीवांचा जमिनीच्या सुपीकतेशी असणारा संबंध याच्या अभ्यासातून एका पायाभूत निष्कर्ष निघतो. तो म्हणजे जमिनीत कार्य करणार्या जिवाणूंचे दोन गट असतात.

१. सेंद्रिय पदार्थ कुजवणारा गट,
२ वनस्पतींना अन्नद्रव्ये पुरवणारा गट

पहिल्या गटातील जिवाणू जमिनीत कसे वाढवात येतील, यावर शेतकऱ्यांनी चिंतन करावे. केवळ बाजारातून विकत आणून अशी जिवाणू पाकिटे टाकणे हे त्याचे उत्तर नाही. या जिवाणूंना सतत खाद्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी सहज, मध्यम आणि दीर्घ मुदतीने कुजणारे सेंद्रिय शेतामध्ये कुजत राहिले पाहिजेत. यातून जमिनीमध्ये जिवाणूंचे वैविध्य सांभाळले जाते. या कुजवणाऱ्या जिवाणू गटाने तयार केलेले खत हेच दुसऱ्या गटाचे खाद्य असल्याने हे जिवाणूही जमिनीमध्ये कार्यरत राहतात. यातून शेतीचे जमिनीच्या सुपीकतेविषयी भेडसावणारे अनेक प्रश्न निकाली निघू शकतात.

वॉक्समन यांचा जीवनप्रवास

१९३५ पर्यंत जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या अभ्यासात घालवल्यानंतर त्यांनी प्रतिजैविकांच्या (अॅण्टीबायोटिक) संशोधनावर लक्ष केंद्रित केले. त्याला कारणही तसेच घडले. हजारो मातीच्या नमुन्यांची तपासणी करत असताना एका प्रयोगात वाढवलेल्या बुरशीकडून ग्रामपॉझिटिव्ह गटातील सूक्ष्मजीव मेलेले आढळले. त्याकाळी असाध्य मानल्या जाणाऱ्या क्षयरोगाचे सूक्ष्मजीव याच वर्गात मोडतात. डॉ. वॉक्‍समन यांनी स्टेप्टोमायसेस ग्रेशियस या बुरशीपासून स्ट्रेप्टोमायसीन हे प्रतिजैविक शोधून काढल्याने क्षय रोगासारख्या असाध्य रोगावर उपचार शक्‍य झाले. १९५२ सालचे वैद्यक क्षेत्रातल्या नोबेल पारितोषकाचे ते मानकरी ठरले. जगाला आज ते स्टेप्टोमायसीनचे जनक या नावानेच परिचित आहेत. १८८८ ते १९७३ हा त्यांचा कार्यकाळ. हा संपूर्ण इतिहास दी सायन्स ऑफ वंडर ड्रग (लेखक - डोनाल्ड कुले) या प्रतिजैविकाच्या शोधाला वाहिलेल्या पुस्तकात येतो. त्याचे मराठी भाषांतर अद्भूत औषधे (लेखक मा. पू. जोशी, प्रकाशक - पुणे विद्यार्थीगृह प्रकाशन) या नावाने उपलब्ध आहे. १९८८ मध्ये त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने सकाळमध्ये त्यांच्यावर एक लेख प्रकाशित झाला. मात्र, त्यांच्या तत्पूर्वीच्या २५-३० वर्षातील भू-सूक्ष्मजीवशास्त्रातील अनमोल योगदानाची माहितीची दखल कोणीही घेतली नाही. यासंदर्भात मी एक लेखही लिहिला. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.

निवृत्तीनंतर नोबेल पारितोषिकाची रक्कम व स्वतःजवळील शिल्लक यातून न्यू जर्सी येथे वॉक्‍समन रिसर्च इन्सिट्यूटची स्थापना केली. त्याचे पश्‍चात त्यांचे पुत्र ब्रायन वॉक्‍समन व आज त्यांचे नातू ही संस्था संभाळतात. तेथे प्रामुख्याने इम्युनायझेशन (लसीकरण) या विषयावर कामकाज चालते. वैद्यक शास्त्राचे दृष्टीने या संस्थेचे काम मोलाचे असले तरी भू सूक्ष्मजीवशास्त्रापासून दूर गेल्यामुळे त्याचे मूळ संशोधन मागे पडले. १९३५ नंतर हा शास्त्रज्ञ भू-सूक्ष्मजीवशास्त्रापासून का तुटला, याचाही विचार केला पाहिजे. अमेरिकन कृषी विभागाने व कृषी विद्यापीठांनी त्यांच्या २५-३० वर्षांच्या संशोधनाची योग्य दखल न घेतल्याने ते नाराज होऊन दूर गेले का? अर्थात माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याने या प्रश्‍नाचे उत्तर कसे शोधावे? एक संधी चालून आली.
डॉ. वॉक्‍समन यांचे मार्गदर्शनाखाली भारतातील डॉ. रंगास्वामी व डॉ. अय्यंगार या दोन विद्यार्थ्यांनी आचार्य पदवी संपादन केली असल्याचे समजले. यापैकी डॉ. रंगास्वामी यांनी काही काळ ऑल इंडिया सॉईल केमिस्ट ऍसोसिएशन, अलाहाबाद या संस्थेचे अध्यक्षपदही भूषविले आहे. त्यांचे अॅग्रीकल्चर मायक्रोबायोलॉजी हे पुस्तक भारतात प्रकाशित आहे.

डॉ. अय्यंगार हे औद्योगिक सूक्ष्म जीवशास्त्र आहेत. भारतामध्ये विविध कारखान्यांच्या उभारणीत मोलाचे काम केल्यानंतर निवृत्ती घेत बंगळुरू येथे स्थायिक असल्याची माहिती कच्छ (गुजरात) येथील माझे एका मित्राने पुरविली. त्यांचा पत्ताही दिला. त्यांचेशी पत्रव्यवहारही केला. कर्मधर्मसंयोगाने माझे एक नातेवाईक त्यांच्या जवळच राहात भेटीची वेळ ठरवून बंगळुरू गाठले. त्यांचे बरोबर निवांत २-३ तास चर्चा झाली. त्यांनी दोन दिवसांनी परत भेटीला बोलाविल्याने मुक्काम वाढविला. मात्र, दुसऱ्या भेटीत काही अपरिहार्य कारणामुळे फार चर्चा होऊ शकली नाही. अमेरिकेच्या शेती खात्याने दुर्लक्ष केल्याच नाराजीचा विषय त्यांनी साफ अमान्य केला. त्यांच्या उत्तराने माझे फारसे समाधान झाले नसले तरी डॉ. वॉक्‍समन यांचे मार्गदर्शनाखाली आचार्य पदवी घेतलेल्या एका शास्त्रज्ञाबरोबर २-३ तास चर्चा करण्याची संधी मिळाली याचे मूल्यमापन शब्दात करता येणार नाही. माझ्यासाठी आयुष्यातील ती एक सर्वात आनंदाची ठेव आहे. हे थोडे विषयांतर झाले. तरीही हा शास्त्रज्ञ आणखी काही काळ भू सूक्ष्मजीवशास्त्रात कार्यरत राहिला असता तर शेतकरी वर्गाचे नक्कीच भले झाले असे वाटत राहते. जमिनीची सुपीकता आणि शेतकऱ्याच्या उन्नतीसाठीच सर्व अट्टाहास!

 

इतर कृषी सल्ला
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
जरूर करा पेरणीपूर्व बीजप्रक्रिया बऱ्याच ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला असून, शेतकरी...
एकात्मिक कीड नियंत्रणात कामगंध...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...
पावसाळी वातावरणात द्राक्षबागेचे...गेल्या आठवड्यात द्राक्षबागेत सर्वत्र पाऊस सुरू...
व्यवस्थापन लिंबू फळबागेचेलिंबू फळबाग लागवडीसाठी योग्य जमीन, जात यांची निवड...
नत्र चक्राचे फायदे घेण्यासाठी...गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
कृषी सल्ला : भात, नागली, नारळ, सुपारी,...भात अवस्था - रोपवाटिका भात क्षेत्रातील...
गरज सांडपाणी व्यवस्थापनाची...जिथे लोकसंख्या एकत्रित झालेली असते, तिथे निर्माण...
शेतकरी उत्पादन कंपनीचा उद्योग उभारताना...शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाल्यानंतर पुढील...
कृषी सल्ला : कापूस, तूर, भुईमूगपुढील पाचही दिवस आकाश ढगाळ राहील. काही ठिकाणी...
मांडा जलसंधारणाच्या कामाचे गणित...मागच्या भागात आपण नागरी आणि ग्रामीण भागातील...
शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करतानाशेतकरी उत्पादक कंपनी चालवत असताना प्रायव्हेट...
योग्य नियोजनातून कपाशीचे भरघोस उत्पादन शेतकरी ः अशोक देशमाने मंगरूळ, ता. मानवत, जि....
सेंद्रिय, रासायनिक खतांच्या संतुलित...शेतकरी ः राजू जठार नातेपुते, ता. माळशिरस, जि....
कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्येमागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी...
ग्रामीण भागातील जलसंधारणासाठी नियोजनग्रामीण भागात जलसंधारण जर यशस्वीपणे दीर्घकाळ...
शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापनागटशेती स्थिर झाल्यानंतर व गटशेतीतून शेतकऱ्यांच्या...
योग्य ओलाव्यावर करा पेरणी बाजरी बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा...