गोठ्याची स्वच्छता ठेवल्याने जनावरांचे आरोग्य चांगले राहाते.
गोठ्याची स्वच्छता ठेवल्याने जनावरांचे आरोग्य चांगले राहाते.

लेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी घ्या

निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील अस्वच्छता, जनावरांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष या कारणांमुळे लेप्टोस्पिरोसिसचा प्रसार वाढू शकतो. लेप्टोस्पिरोसिस हा प्राणिजन्य मानवीय आजार आहे. त्यामुळे जनावरांचे योग्य व्यवस्थापन ठेवावे.

  • लेप्टोस्पिरोसिस हा प्राणिजन्य मानवीय आजार आहे. म्हणजेच प्राण्यांपासून माणसास किंवा माणसापासून प्राण्यांना हा आजार होऊ शकतो, त्यालाच झुनोटिक आजार असे म्हणतात.
  • हा आजार प्रामुख्याने लेप्टोस्पिरा इंटररोगन्स नावाच्या जिवाणूमुळे होतो. हा जिवाणू पातळ, लवचिक, गतिशील, सर्पिल आकाराचा असतो.
  • निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील अस्वच्छता, जनावरांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष या कारणांमुळे रोगाचा प्रसार वाढू शकतो.
  • ज्या वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडून पाणी साठणे, पूर परिस्थिती निर्माण होणे किंवा पाण्याचा निचरा होण्यास नैसर्गिक अडचणी होतात, तेव्हा याचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
  • आजार कोणाला होऊ शकतो?

  •  समशीतोष्ण किंवा उष्णकटिबंधीय भागामध्ये किंवा हवामान असलेल्या ठिकाणी जास्त आढळून येतो.
  •  शेतकरी, खाण कामगार, कत्तलखान्यातील कामगार, पशुवैद्यक, प्राणिसंग्रहालय, प्राण्यांच्या दुकानात, दवाखान्यात, प्रयोगशाळेत काम करणारे किंवा दूषित तलावामध्ये किंवा नदीमध्ये पोहणारे, राफ्टिंग करणाऱ्यांना सुद्धा हा आजार होऊ शकतो.
  • प्रसार

  • आजार संसर्ग झालेल्या जनावरांच्या मूत्राद्वारे किंवा शरीरातील द्रव्य पदार्थद्वारे पसरतो.
  • निरोगी जनावरांचा बाधित जनावरांच्या मूत्राद्वारे खराब झालेले पाणी, मातीद्वारे आजार होण्याचे जास्त प्रमाण आहे.
  •  पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये हे जिवाणू काही आठवडे ते महिने टिकून राहू शकतात.
  • बऱ्याच प्रकारच्या जंगली आणि घरगुती प्राण्यांमध्ये आजाराचे जिवाणू आढळून येतात.  
  • संक्रमित किंवा बाधित जनावरे सतत काही महिन्यांपर्यंत जिवाणू मूत्राद्वारे किंवा शरिरातील द्रव्यपदार्थद्वारे वातावरणात सोडतात.
  • मानवामध्ये आजारांचे संक्रमण

  • बाधित जनावरांच्या मूत्राद्वारे किंवा शरीरातील द्रव्यपदार्थद्वारे.
  •  बाधित जनावरांच्या मूत्राचा संपर्क पाणी, माती किंवा अन्न या सर्व गोष्टींशी संपर्क.
  • त्वचेमधून, डोळे, नाक किंवा तोंड विशेषतः जर त्वचा कापली गेली असेल किंवा खरचटली असेल तर जिवाणू या जागेतून शरीरात प्रवेश करू शकतात.
  • पुराच्या पाण्यात बाधित जनावराचे मूत्र मिसळले असल्यास.  
  • मानवामध्ये आजारांची लक्षणे उच्च ताप, डोकेदुखी, स्नायू वेदना, उलट्या, त्वचा आणि डोळे पिवळे पडणे, लाल डोळे, पोटदुखी, अतिसार, रॅश

    आजाराचे टप्पे

    पहिला टप्पा ः   ताप, थंडी, डोकेदुखी, स्नायू वेदना, उलट्या किंवा अतिसार रुग्ण काही वेळेस बरा होऊ शकतो. परंतु, दुर्लक्ष केल्यामुळे आजार परत होऊ शकतो. दुसरा टप्पा ः   अतिशय गंभीर परिणाम. मूत्रपिंड, यकृताचे त्रास दिसून येतात सोबतच मेनिजायटिस दिसून येतो.

    रोगनिदान विविध प्रकारच्या तपासण्याकरून रोगाचे निदान करता येते.

    उपचार ः

  • प्रतिजैवकांचा वापर करून उपचार केला जाऊ शकतो.
  • आजाराच्या सुरवातीला योग्य उपचार झाल्यास चांगले परिणाम दिसतात.  
  • उपाययोजना ः

    उंदीर, घुशी रोगाचे प्रमुख वाहक असून त्यांच्या मूत्रातील जिवाणूद्वारे नाल्याचे पाणी, साचलेले पाणी, परिसर दूषित होते. ते दूषित पाणी वाहत जाऊन दुसरीकडे आजार पसरतो. त्यामुळे पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी.  

  •  प्रक्षेत्रावरील उंदरांचा तात्काळ नायनाट करावा.
  •  जनावरांच्या मलमूत्राची योग्य विल्हेवाट लावावी.
  •  खुराक, पशुखाद्याच्या पोत्यामध्ये उंदराच्या संपर्कातून आजाराचे जिवाणू प्रवेश करू शकतात, त्यामुळे पशुखाद्याच्या साठवणीच्या ठिकाणी उंदराचे नियंत्रण करावे.
  • प्रतिबंधात्मक उपाय ः

  • स्थानिक भागात मोठ्या प्रमाणात लसीकरण करावे.
  •  दूषित पाणी आणि मातीशी संपर्क टाळावा. पिण्यासाठी स्वच्छ पाणी वापरावे.
  • जनावरांची नियंत्रित वाहतूक करावी.
  •  जनावरे हाताळताना काळजी घ्यावी.
  •     आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढविणे.
  • वैयक्तिक स्वच्छता ठेवावी.
  •  संक्रमित जनावरांसोबत संपर्क टाळावा.
  •  दूषित पाण्यात पोहणे टाळणे.
  • तातडीने औषधोपचार करावेत.
  • - डॉ. लिना धोटे,७९७२४१३५३३

    (पशुवैद्यक महाविद्यालय, बिदर, कर्नाटक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com