agricultural stories in Marathi, corn, wheat, turmeric futures rate will increase | Page 2 ||| Agrowon

वायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या भावामध्ये वाढ
डॉ. अरुण प्र. कुलकर्णी
शुक्रवार, 5 जुलै 2019

सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या सप्ताहात मका, गहू व गवार बी यांचे भाव वाढले. इतरांचे भाव कमी झाले. एनसीडीईएक्स आणि एमसीएक्स या एक्स्चेंजव्यतिरिक्त आता बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज)मध्येसुद्धा फ्युचर्स ट्रेडिंग करता येईल. २८ जूनपासून तेथे सोयाबीन व कापसाव्यातिरिक्त हळदीचे व्यवहार सुरू झाले आहेत.

सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या सप्ताहात मका, गहू व गवार बी यांचे भाव वाढले. इतरांचे भाव कमी झाले. एनसीडीईएक्स आणि एमसीएक्स या एक्स्चेंजव्यतिरिक्त आता बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज)मध्येसुद्धा फ्युचर्स ट्रेडिंग करता येईल. २८ जूनपासून तेथे सोयाबीन व कापसाव्यातिरिक्त हळदीचे व्यवहार सुरू झाले आहेत.

गेल्या सप्ताहात पावसाची प्रगती समाधानकारक झाली. २५ जूनपर्यंत झालेला पाऊस हा सरासरीपेक्षा ३७ टक्क्यांनी कमी होता. ही घट २ जुलैपर्यंत ३० टक्क्यांवर आली आहे. पुढील सप्ताहातसुद्धा पाऊस समाधानकारक असेल आणि तो सर्व देश व्यापेल असा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी खरीप पिकांची पेरणी सुरू झालेली आहे. मक्याची मागणी मात्र वाढत आहे. मक्याच्या किमती जून महिन्यात वाढत होत्या. याही महिन्यात त्या वाढण्याची शक्यता आहे. इतर वस्तूंच्या किमतींचा कल घसरता आहे.
१ जुलैपासून ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी रब्बी मका, नोव्हेंबर डिलिव्हरीसाठी रब्बी मका, खरीप मका, हळद व गहू, डिसेंबर डिलिव्हरीसाठी हरभरा आणि फेब्रुवारी २०२० डिलिव्हरीसाठी सोयाबीनचे व्यवहार सुरू झाले. या सप्ताहात मका, गहू व गवार बी यांचे भाव वाढले, इतरांचे भाव कमी झाले. (आलेख १). पुढील काही महिन्यांत सोयाबीन व कापूस वगळता इतर सर्व पिकांचे भाव सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा अधिक असतील. (आलेख २). पुढील वर्षासाठी खरीप पिकांचे हमीभाव अजून जाहीर झाले नाहीत.

गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स आणि एमसीएक्समधील चढ-उतार ः

मका (रब्बी) ः
रब्बी मक्याच्या (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात वाढत होत्या (रु. १,८३६ ते रु. २,१६८). या सप्ताहात त्या पुन्हा वाढून रु. २,२०७ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाबबाग) रु. २,१३५ वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,७०० आहे (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. ऑक्टोबर डिलिव्हरीचे भाव रु. २,२७१ आहेत. खरीप मक्यासाठी अजून व्यवहार होत नाहीत.

साखर ः
साखरेच्या (ऑक्टोबर २०१९) किमती या सप्ताहात व्यवहार नसल्याने रु. ३,१६० वर स्थिर होत्या. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१५० वर आलेल्या आहेत.

सोयाबीन ः
सोयाबीन फ्युचर्स (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. ३,७३१ ते रु. ३,६१४). या सप्ताहात त्या रु. ३,६५१ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,७३३ वर आल्या आहेत. २ जुलै रोजी सप्टेंबर डिलिव्हरीसाठी रु. ३,६४५ भाव होता. नंतरच्या महिन्यांसाठी तो रु. ३,४९४ होता.

हळद ः
हळदीच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. ७,२७० ते रु. ६,६३०). या सप्ताहात त्या रु. ६,६६४ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,४५० वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ५.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,७८४). या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. व्यापाऱ्यांकडील साठा पुरेसा आहे. मागणी मर्यादित आहे.

गहू ः
गव्हाच्या (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. २,०२२ ते रु. १,९८९). या सप्ताहात त्या रु. २,००२ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. १,९५४ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,०६२). नवीन हमीभाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता).

गवार बी ः
गवार बीच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. ४,३९० ते रु. ४,२१८). या सप्ताहात त्या रु. ४,३२२ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,३०७ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा ऑक्टोबर २०१९ मधील फ्युचर्स किमती ३.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४५५).

कापूस ः
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. २२,२०० ते रु. २१,१८०). या सप्ताहात त्या रु. २१,१३० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २१,७२७ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २०,२१० वर आल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ७ टक्क्यांनी कमी आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाचे उत्पादन कमी आहे. पण आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणामसुद्धा किमतींवर होत आहे. कापसाखालील पेरणी वाढत आहे. या वर्षी कापसाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हरभरा ः
हरभऱ्याच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. ४,६७७ ते रु. ४,२५०). या सप्ताहात त्या रु. ४,१९४ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,१५६ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा ऑक्टोबर २०१९ मधील फ्युचर्स किमती ३.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,२९२). शासनाकडे पुरेसा साठा आहे. तो बाजारात येऊ लागला आहे. आवक वाढू लागली आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता).

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये फ्युचर्स ट्रेडिंग ः
एनसीडीईएक्स आणि एमसीएक्स या एक्स्चेंज व्यतिरिक्त आता बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज) मध्येसुद्धा फ्युचर्स ट्रेडिंग करता येईल. २८ जूनपासून तेथे सोयाबीन व कापसाव्यातिरिक्त हळदीचे व्यवहार सुरू झाले आहेत. बीसीईमध्ये सध्या सोयाबीनचे ३१ जुलै व ३० ऑगस्ट डिलिव्हरीसाठी, कापसाचे ३१ जुलै व ३० ऑगस्ट डिलिव्हरीसाठी, तर हळदीचे २० ऑगस्ट व २० सप्टेंबर डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू आहेत. डिलिव्हरी केंद्रे व इतर तपशील एनसीडीईएक्स सारखेच आहेत.
----------
(सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी).
-------
संपर्क ः
ई-मेल ः डॉ. अरुण प्र. कुलकर्णी arun.cqr@gmail.com

इतर अॅग्रोमनी
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
कागलचा शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्टनवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या...
पोल्ट्रीला धान्य पुरवठ्यासाठी...पुणे : विविध कारणांमुळे तोट्यात चाललेल्या लेअर...
स्फुरद, पालाशयुक्त खतांसाठी अनुदान दर...नवी दिल्ली : स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक...
ऊस बियाणे विक्रीसह भाडे तत्त्वावरील...उसाच्या बियाणे प्लॉटच्या माध्यमातून एकरी तीस ते...
उत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा ‘पेप्सिको’चा...नवी दिल्ली : अन्न आणि शीतपेय उत्पादनात मोठी...
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीचा वाढीचा कलपुढील महिन्यात रब्बी मका, गहू आणि हरभरा यांचे भाव...
ओढकामाच्या बैलांवर येतेय गदा ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
बांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
बाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...
वायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...
सेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...
कापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....
घरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...
सुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...
सरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...