agricultural stories in Marathi, cotton imbalence growth, weed control | Agrowon

खरीप नियोजन : कपाशीतील असमतोल वाढ, तणनियंत्रण उपाययोजना

जितेंद्र दुर्गे, डॉ. विजेंद्र शिंदे, आकाश वादाफळे
शनिवार, 8 जून 2019

गेल्या काही वर्षांमध्ये कपाशी लागवड समस्यांत वाढ होत आहे. अशा स्थितीमध्ये आपल्या विभागातील दरवर्षी जाणवणाऱ्या समस्या नेमकेपणाने जाणून घेत त्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.

अतिरिक्त अथवा असमतोल वाढ :

गेल्या काही वर्षांमध्ये कपाशी लागवड समस्यांत वाढ होत आहे. अशा स्थितीमध्ये आपल्या विभागातील दरवर्षी जाणवणाऱ्या समस्या नेमकेपणाने जाणून घेत त्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.

अतिरिक्त अथवा असमतोल वाढ :

  • ओलिताचा मुबलक वापर व रासायनिक खतांचा असमतोल वापर यामुळे कपाशी पिकाची अतिरिक्त अथवा असमतोल वाढ होताना आढळते. पिकाची कायिक वाढ जास्त होते. यात फळफांद्यातील अंतर जास्त होऊन फळफांद्याची संख्या कमी होते. परिणामी उत्पादनात घट येते. वाढ नियंत्रित करण्याकरिता लागवडीनंतर साधारणतः ३० दिवसांनी क्लोरमेक्वाट क्लोराईड १० मिलि अधिक सिलीकॉन १० मिलि प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे वापरावे.
  • यानंतर पीक साधारणत: ९० दिवसांचे झाल्यानंतर पुन्हा वरील वाढ नियंत्रकाची फवारणी करावी. यामुळे तापमानातील चढउतारापासून पिकाचे रक्षण होते. जमिनीतील ओल कमी अथवा जास्त झाल्यास त्यापासून पिकाचे संरक्षण होते.
  • बीटी कपाशीचे पीक ७० दिवसांचे व उंची साधारणपणे साडेतीन फूट झाल्यानंतर झाडांचे शेंडे खुडून घ्यावे. यामुळे पिकाची होणारी अतिरीक्त वाढ टाळली जाते. झाडाचे बूड जाड व फळफांद्या बळकट होतात.

लाल्या किंवा लालसर डाग विकृती :  
कपाशीचे पीक बोंडे पक्वतेच्या अवस्थेत असताना लाल्या किंवा लालसर डाग विकृतीचा प्रादुर्भाव होताना दिसतो. जमिनीतील ओल अतिशय कमी झाल्यामुळे, अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होतो. बहुतांश कोरडवाहू शेतात लाल्याग्रस्त कपाशीची झाडे आढळतात. हे टाळण्यासाठी कोरडवाहू कपाशीची लागवड करताना किंवा पीक साधारणत: दीड महिन्याचे झाल्यावर डवऱ्याच्या फेरासोबत डवऱ्याच्या जानोळ्याला घट्ट दोरी बांधून दोन ओळींच्या मधोमध गाळा पाडून घ्यावा. यामुळे कपाशीचे पीक आपोआपच गादीवाफ्यावर येते. शेतामध्ये पडणारे पावसाचे पाणी सरीमध्ये जमा होऊन मूलस्थानी जलसंवर्धन होते. जमिनीतील ओल टिकून अन्नद्रव्याचा पुरवठा होऊन लाल्याचा प्रादुर्भाव कमी राहतो. सुरवातीला तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाल्यास पुढे लाल्याचा प्रादुर्भाव आढळतो.

तणांचा प्रादुर्भाव

  • बीटी कपाशी पिकाला ओलिताची सोय, रासायनिक खतांचा मुबलक वापर, दोन ओळीमधील मोकळी जागा इत्यादी कारणांमुळे तणांचा प्रादुर्भाव वाढतो. कपाशीच्या पिकामध्ये सुरवातीचे ६५-७० दिवसांचा कालावधी तण व पीक यामधील तीव्र स्पर्धेचा काळ समजला जातो. या काळात तणांचा प्रादुर्भाव कमी राखण्यासाठी खालील उपाययोजना परिणामकारक ठरतात.
  • पेरणीपश्चात परंतु उगवणीपूर्व पेंडीमिथॅलीन ५ ते ८ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे ओलसर जमिनीवर समप्रमाणात फवारणी करावी. याद्वारे कपाशी उगवण्याआधी, जमिनीतील अंकुर फुटलेल्या तणांच्या बियाण्यांचा नायनाट करता येतो.
  • कपाशीच्या उभ्या पिकात तणांच्या नियंत्रणासाठी पायरोथिओबॅक सोडियम २.५ मिलि अधिक क्वीझॉलोफॉप ईथाईल २.५ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करता येते.

 तणनियंत्रणासाठी लागवड पद्धतीत बदल
बीटी कपाशीच्या प्रचलित लागवड पद्धतीमध्ये शेतकरी दोन ओळीतील अंतरानुसार शेताच्या एका दिशेने काकर पाडून घेतात. त्यानंतर मजुरांच्या साह्याने बीटी कपाशीचे बियाणे दोन झाडातील अंतरानुसार डोबून घेतात. या पद्धतीमध्ये बियाणे डोबताना ओळीतील झाडे काही प्रमाणात मागेपुढे होतात. त्यामुळे शेतात उभी-आडवी डवरणी शक्य होत नाही. दोन झाडामधील जागेतील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी पूर्णपणे निंदनावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेतात मार्करच्या साह्याने काकर पाडताना पुढील उपाययोजना करावी.
पेरणीच्या वेळी दोन ओळीतील अंतरानुसार उभे काकर पाडून घ्यावेत. त्यानंतर सव्वा ते दीड फुटी काकरीने आडवे काकर पाडावेत. अशा प्रकारे संपूर्ण शेतात फुल्या तयार होतात. या प्रत्येक फुलीवर एक या प्रमाणे बीटी बियाणे लावावे. पेरणी अशा प्रकारे केल्यास उभी - आडवी डवरणी शक्य होते. निंदणाच्या मजुरी खर्चात बचत होते.

 : जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७
(लेखक जितेंद्र दुर्गे व डॉ. शिंदे हे श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती येथे सहयोगी प्राध्यापक असून, आकाश वादाफळे हे रुरल इन्स्टिट्यूट, पिपरी, वर्धा येथे कार्यरत आहेत.)


इतर नगदी पिके
ऊस पिकासाठी योग्य ठिबक सिंचन पद्धतउसासाठी योग्य ठिबक सिंचन ठिबक सिंचन पद्धती...
सुधारित पद्धतीने खोडवा उसाचे व्यवस्थापन खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच...
सुरु उसाला द्या शिफारशीत खतमात्रा रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये...
उसासाठी सेंद्रिय खत, सूक्ष्म...जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची पिके...
उसाला द्या शिफारशीनुसार खतमात्रारासायनिक खते जमिनीवर पसरून न देता चळी घेऊन किंवा...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
ऊस पीक सल्ला१) साधारणपणे १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत...
गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ...सध्या कापूस पीक हे फुलोरा ते बोंडे लागण्याच्या...
कपाशीतील बोंड सडणे विकृतीचे व्यवस्थापनमागील दोन वर्षांपासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
नारळ बागेत मसाला पिकांची लागवड    नारळ बागेमध्ये नारळाच्या...
गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी एकात्मिक...गुलाबी बोंड अळ्यांना खाण्यासाठी व पतंगाना अंडी...
आडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...
ऊस बियाणे निर्मितीसाठी ‘सुपरकेन नर्सरी...अलीकडे प्रो ट्रे किंवा पिशव्यांमध्ये उसाची रोपे...
दुष्काळाशी लढा देत हळदीची उत्कृष्ट शेतीअमळनेर (जि. जळगाव) येथील अश्पाक मुनीर पिंजारी व...
डाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...
खरीप कांदा लागवड तंत्रज्ञानविशेषतः विदर्भात रब्बी हंगामातील कांद्याचे...
खरीप नियोजन : कपाशीतील असमतोल वाढ,...गेल्या काही वर्षांमध्ये कपाशी लागवड समस्यांत वाढ...
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
ऊस पीक व्यवस्थापन सध्याच्या काळात जमिनीतील ओलावा टिकवणे, पाण्याचा...