agricultural stories in Marathi, crop advice | Agrowon

कृषी सल्ला : कापूस, तूर, भुईमूग
कृषी विद्या विभाग, राहुरी
शुक्रवार, 5 जुलै 2019

पुढील पाचही दिवस आकाश ढगाळ राहील. काही ठिकाणी हलकासा, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.        

कापूस    

पुढील पाचही दिवस आकाश ढगाळ राहील. काही ठिकाणी हलकासा, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.        

कापूस    

  • मागील हंगामातील कपाशी धसकटे, पालापाचोळा जमा करून कम्पोस्ट खड्ड्यात टाकावा, त्यामुळे त्यावरील किडींच्या अवस्था नष्ट होतील. वाणांची निवड करताना कोरडवाहू व बागायती, लागवडीचा प्रकार, त्याचे गुणधर्म, आपल्या भागात सरस उत्पादन देणारा, कीड व रोगप्रतिकारक, पाण्याचा ताण सहन करणारे वाण निवडावेत. कोरडवाहूसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावेत.
  • पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे, नसल्यास जमीन ओलावून पेरणी करावी.  हवेतील नत्र स्थिर करण्यासाठी व मातीतील स्फुरद पिकाला उपलब्ध होण्यासाठी अॅझोटोबॅक्टर व पीएसबी जिवाणुसंवर्धकाची २५  ग्रॅम प्रति १ किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.       

तूर

  • अतिलवकर येणाऱ्या वाणांकरिता- ४५  १० सेमी, लवकर येणाऱ्या- ६०  २० सेमी, मध्यम कालावधीकरिता- ९० २० सेमी इतके अंतर
  • ठेवावे.
  • आंतरपीक म्हणून तूर : बाजरी -३ : ३, तूर : ज्वारी - ३ : ३, तूर : सोयाबीन- ३ : ३ अशी लागवड करावी.  पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबियम २५ ग्रॅम /किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. शेतामध्ये एरंडी किवा झेंडू या सारखी सापळा पिके घ्यावीत.         

भुईमूग    

  • पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम थायरम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक चोळावे. त्यानंतर प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबिअम आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक चोळावे. बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरावे.
  • भुईमूगाची पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन रोपातील अंतर १० सें.मी ठेवावे. पाने  खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी सापळा पीक म्हणून शेताच्या बांधावर एरंडीची लागवड करावी. हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी जमिनीत ओल असताना एकरी २ लिटर बिव्हेरिया बॅसियाना प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आळवणी घालावी.
  • खरीप भुईमूग पिकात सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, मूग, उडीद, तूर ही आंतरपिके ६: २ या प्रमाणात तर भुईमूग + ज्वारी, कपाशी १:१ या प्रमाणात घ्यावी.

 ः ०२४२६ - २४३२३९
(प्रमुख, कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

इतर कृषी सल्ला
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
जरूर करा पेरणीपूर्व बीजप्रक्रिया बऱ्याच ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला असून, शेतकरी...
एकात्मिक कीड नियंत्रणात कामगंध...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...
पावसाळी वातावरणात द्राक्षबागेचे...गेल्या आठवड्यात द्राक्षबागेत सर्वत्र पाऊस सुरू...
व्यवस्थापन लिंबू फळबागेचेलिंबू फळबाग लागवडीसाठी योग्य जमीन, जात यांची निवड...
नत्र चक्राचे फायदे घेण्यासाठी...गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
कृषी सल्ला : भात, नागली, नारळ, सुपारी,...भात अवस्था - रोपवाटिका भात क्षेत्रातील...
गरज सांडपाणी व्यवस्थापनाची...जिथे लोकसंख्या एकत्रित झालेली असते, तिथे निर्माण...
शेतकरी उत्पादन कंपनीचा उद्योग उभारताना...शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाल्यानंतर पुढील...
कृषी सल्ला : कापूस, तूर, भुईमूगपुढील पाचही दिवस आकाश ढगाळ राहील. काही ठिकाणी...
मांडा जलसंधारणाच्या कामाचे गणित...मागच्या भागात आपण नागरी आणि ग्रामीण भागातील...
शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करतानाशेतकरी उत्पादक कंपनी चालवत असताना प्रायव्हेट...
योग्य नियोजनातून कपाशीचे भरघोस उत्पादन शेतकरी ः अशोक देशमाने मंगरूळ, ता. मानवत, जि....
सेंद्रिय, रासायनिक खतांच्या संतुलित...शेतकरी ः राजू जठार नातेपुते, ता. माळशिरस, जि....
कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्येमागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी...
ग्रामीण भागातील जलसंधारणासाठी नियोजनग्रामीण भागात जलसंधारण जर यशस्वीपणे दीर्घकाळ...
शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापनागटशेती स्थिर झाल्यानंतर व गटशेतीतून शेतकऱ्यांच्या...
योग्य ओलाव्यावर करा पेरणी बाजरी बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा...