agricultural stories in Marathi, crop advice | Page 2 ||| Agrowon

कृषी सल्ला ( राहुरी विभाग)

कृषी विद्याविभाग, राहुरी
सोमवार, 21 जून 2021

पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. खरीप पिकांच्या पेरणीला पुरेसा पाऊस (६० ते ७५ मिमी) व पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय सुरुवात करू नये. पेरणीसाठी घाई करू नये.

हवामान सारांश ः
पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

खरीप पिकांच्या पेरणीला पुरेसा पाऊस (६० ते ७५ मिमी) व पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय सुरुवात करू नये. पेरणीसाठी घाई करू नये.

पिकांची निवड (जमिनीनुसार) ः
भारी ः कापूस, तूर, सोयाबीन
मध्यम ः सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन
हलकी ः बाजरी, कुळीथ, तीळ, कारळा, एरंडी

ऊस ः
हुमणीच्या नियंत्रणासाठी पहिला पाऊस झाल्यानंतर निंब, बाभूळ व बोर या झाडावरील भुंगेरे सामुदायिकरीत्या रात्रीच्या वेळी गोळा करावेत. हे भुंगेरे रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत.

तूर ः
 पेरणीची तयारी
 लागवडीसाठी वाण ः विपुला, फुले राजेश्‍वरी, आय.सी.पी.एल.-८७, बी.एस.एम.आर.-८५३, बी.एस.एम.आर.-७३६, बी.डी.एन.-७११, बी.डी.एन.-७१६
 पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यांस ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबियम २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात घेऊन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.
 पेरणीच्या वेळी हेक्टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद म्हणजेच १२५ किलो डीएपी द्यावे.

भुईमूग ः
 पेरणीची तयारी
लागवडीसाठी वाण ः एसबी-११, जेएल-२४ (फुले प्रगती), टीएजी-२४, जेएल-२२० (फुले व्यास), जेएल-२८६ (फुले उनप), टीपीजी-४१, टीजी-२६, जेएल-५०१, फुले आरएचआरजी-६०२१, फुले उन्नती, जेएल-७७६ (फुले भारती)

बीजप्रक्रिया ः
पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यांस थायरम ५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम ३ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा (जैविक बुरशीनाशक) ५ ग्रॅम चोळावे. त्यानंतर एक किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबियम आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक चोळावे. बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरावे.

 पेरणीच्या वेळेस नत्र २५ किलो अधिक स्फुरद ५० किलो द्यावे. अधिक उत्पादनाकरिता रासायनिक खत मात्रेसोबत जिप्सम ४०० किलो प्रति हेक्टर (हेक्टरी २०० किलो पेरणीवेळी तर उर्वरित २०० किलो आऱ्या सुटताना) जमिनीत मिसळून द्यावे.

मका ः
 पेरणीची तयारी
 पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणांस थायरम २ ते २.५ ग्रॅम लावावे.
 पेरणीच्यावेळी ४० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ४० किलो पालाश प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी ४० किलो नत्र, पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी ४० किलो नत्र प्रति हेक्टर द्यावे.
 जमिनीत झिंकची कमतरता असल्यास हेक्टरी २० ते २५ किलो झिंक सल्फेट द्यावे.

सूर्यफूल ः
 पेरणीची तयारी
 लागवडीसाठी वाण ः
सुधारित ः फुले भास्कर, एस एस-५६, मॉर्डेन, ईसी-६८४१४, भानू.
संकरित ः केबीएसएच-१, एलएसएफएच-१७१, एलएसएफएच-३५, एलएसएफएच -४४, फुले रविराज, एमएसएफएच-१७.

बीजप्रक्रिया ः
 केवडा रोग टाळण्यासाठी पेरणीपूर्वी मेटॅलॅक्झील (३५ डब्ल्यूएस) ६ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे.
 नेक्रॉसिस (विषाणूजन्य रोग) प्रतिबंधासाठी इमिडाक्लोप्रीड (७० डब्ल्यू) ५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर (जिवाणू खत) २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.

खतमात्रा ः
 कोरडवाहू पिकास हेक्टरी २.५ टन शेणखत तसेच ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे.
 बागायती पिकास हेक्टरी ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ६० किलो पालाश द्यावे. यापैकी ३० किलो नत्र व स्फुरद, पालाशची संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी द्यावी. उरलेली ३० किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी.
 गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खतात मिसळून द्यावे.

बाजरी ः
 पेरणीची तयारी
लागवडीसाठी वाण ः
अ) संकरित ः फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती
ब) सुधारित ः धनशक्ती

बीज प्रक्रिया ः
१) मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया ः
पेरणीपूर्वी बियाण्यास २० टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. त्यासाठी १० लिटर पाण्यात २ किलो मीठ विरघळावे. पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त हलके बियाणे बाजूला काढून टाकावे. तळाला राहिलेले निरोगी आणि वजनाने जड बियाणे वेगळे करून घ्यावे. हे बियाणे पाण्याने २ ते ३ वेळा धुऊन नंतर सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.

२) मेटॅलॅक्झील (३५ डब्लूएस) बीजप्रक्रिया ः
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास मेटॅलॅक्झील ३५ (डब्ल्यूएस) ६ ग्रॅम चोळावे.

३) अझोस्पिरीलम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया ः
 प्रति किलो बियाण्यास अझोस्पिरीलम २५ ग्रॅम चोळून पेरणी करावी. त्यामुळे २० ते २५ टक्के नत्र खताची बचत होऊन उत्पादनात १० टक्के वाढ होते.
 स्फुरद विरघळविणारे जिवाणू २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

खतमात्रा ः
 हलक्या जमिनीत ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश तर मध्यम जमिनीत ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे.
 पेरणीच्या वेळी नत्राची अर्धी व स्फुरद, पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. उर्वरित नत्राची मात्रा पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी जमिनीत ओलावा असताना द्यावी.
 रासायनिक खते दोन चाडीच्या पाभरीने पेरून द्यावीत.

मूग व उडीद ः
 पेरणीची तयारी
 लागवडीसाठी वाण ः
मूग ः वैभव हा वाण खरीपसाठी उपयुक्त आहे. मुगामध्ये वैभव व बी.पी.एम.आर.-१४५ हे दोन वाण भुरी रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणारे चांगले वाण आहेत.
उडीद ः टी.पी.यू.-४ आणि टी.ए.यू.-१.
 पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा पावडर ५ ग्रॅम लावावी. त्यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम जिवाणू पावडर गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून लावावी.
 दोन्ही पिकांना २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद म्हणजेच १०० किलो डीएपी प्रति हेक्टरी द्यावे. शक्यतो रासायनिक खते ही चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून बियाणांलगत पेरून द्यावीत. म्हणजे त्याचा प्रभाव चांगला होतो.

(टीप ः ॲग्रस्को शिफारशी आहेत.)
--------------------------------
संपर्क ः ०२४२६-२४३२३९
(प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
---------------------------------


इतर ताज्या घडामोडी
राज्यात सरासरीच्या २४ टक्के अधिक पाऊसपुणे ः जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीसदृश्य...
शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार...सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,...
अकोला झेडपीची सभा ऑनलाइन, तरीही नाश्‍...अकोला ः कोरोनामुळे बहुतांश सभा, बैठका ऑनलाइन होत...
खासगी पदविकाधारक, पशुधन पर्यवेक्षकांचे...मंचर, जि. पुणे : पशुसंवर्धन विभागातील खासगी...
सांगलीत अतिवृष्टीचा १८१ गावांना फटकासांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेली...
पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत...कोल्हापूर : सध्याची पूरस्थिती बिकट आहे,...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ...नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरिपात...
ठाकरे, फडणवीस समोरासमोरकोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी...
शिरोळमध्ये मुख्यमंत्र्यांचा फक्त पाच...शिरोळ, जि. कोल्हापूर : पूरस्थितीचा जिल्ह्यात...
पंढरपूरला जिल्हा करावासोलापूर ः गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत...
जल, मृद्‍संधारण कामांवर भर द्यावा ः एस...बुलडाणा : गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच...
खासगीकरणाविरोधात वीज कामगारांचा...नागपूर ः वीज उद्योगाच्या खासगीकरणाच्या...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...