कपाशीवरील जिवाणूजन्य करपा रोगाचे नियंत्रण

कपाशी जिवाणूजन्य करपा
कपाशी जिवाणूजन्य करपा

ढगाळ वातावरणात कपाशीवर जिवाणूजन्य पानांवरील चट्टे आणि ‘करपा’ रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. प्रामुख्याने हा रोग बीटी आणि संकरित जातींवर फुलोरा आणि बोंडे वाढीच्या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. रोगकारक जिवाणू : झान्थोमोनास ऑक्सोनोपोडीस पीवी. मालव्यासियारम लक्षणे ः

  • प्रादुर्भाव देठ, पाने, फुलाच्या देठाशी असणारी कोवळी पाने आणि बोंडांवर दिसतो.
  • पानांवर ठिपके दिसतात, देठे व पानांच्या शिरा करपतात, बोंडे सडतात.
  • पर्णदलावर लहान, हिरवे, पाणी शोषणारे गोलाकार किंवा अनियमित ठिपके विकसित होऊन तांबूस रंगाचे होतात. अधिक तीव्रतेचा प्रादुर्भाव असल्यास पर्णदल आणि रोपांत विकृती निर्माण होते.
  • काळे आणि वाढलेले डाग पर्णदलामध्ये पसरून रोप मरते.
  • पानाच्या मागील भागावर गडद रंगाचे अर्धपारदर्शक डाग दिसून येतात. नंतरच्या टप्प्यात पानांवरील डाग कोनात्मक होऊन, तांबूस ते काळ्या रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे चट्टे दिसतात.
  • काही वाणांमध्ये जिवाणू पानांच्या शिरा आणि आजूबाजूच्या पेशीसमूहांमधे प्रवेश करून त्या नष्ट करतात. पीक पिवळे पडते, विकृती निर्माण होऊन पानगळ होते.
  • लहान देठांवर लांब आणि काळपट चट्टे पडतात.
  • लहान बोंडावर कोनात्मक ते अनियमित काळे दबलेल्या आकाराचे ठिपके दिसतात.
  • उष्ण व दमट हवामानात जिवाणू प्रादुर्भावामुळे बोंडे सडतात, बोंडाची गळती होते, विकृती निर्माण होते.
  • अनुकूल घटक:

  • ३२ ते ३७ अंश सेल्सिअस तापमान, सापेक्ष आर्द्रता ८५ टक्के. लवकर केलेली पेरणी, उशिरा झालेली विरळणी आणि सिंचन.
  • जमिनीची सदोष मशागत, जमिनीत पालाशची कमतरता.
  • पावसाळी, ढगाळ हवामानानंतर लख्ख सूर्यप्रकाश.
  • रोगाचे चक्र:

  • रोगकारक जिवाणू बियाण्याच्या आत, बियाण्यावर, कपाशीच्या धाग्यांवर आणि न कुजलेल्या पिकांच्या काडीकचऱ्यावर सुप्तावस्थेत राहतात.
  • प्राथमिक स्रोत हा प्रादुर्भावीत बियाणे आणि त्यावरील धागे असतात. दुय्यम प्रसार हा वादळी पाऊस व दवबिंदूद्वारे होतो.
  • नियंत्रण ः (प्रतिलिटर पाणी) १) कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम आधिक स्ट्रेप्टोमायसीन १०० मिलीग्रॅम २) रोगाचे प्रमाण पुन्हा आढळल्यास पहिल्या फवारणीनंतर १५ ते २० दिवसांनी दुसरी फवारणी. संपर्क ः ०७१०३-२७५५३८ ( केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com