कृषी सल्ला : उन्हाळी मका, मका, डाळिंब, बाजरी, मोसंबी

कृषी सल्ला (राहुरी विभाग)
कृषी सल्ला (राहुरी विभाग)

मका पाण्याची पाळी देतेवेळी जीवामृत एकरी २०० लिटर याप्रमाणात सोडावे. भुईमूग शेंगा तयार होत असताना जास्तीत जास्त शेंगा तयार होण्यासाठी ००:५२:३४ हे खत ७० ग्रॅम, एकत्रित सूक्ष्मअन्नद्रव्ये ५० ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लसूण घास स्पोडोप्टेरा अळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही. १ मिली अधिक बिव्हेरिया बॅसियाना ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. डाळिंब सूत्रकृमींचा प्रादुर्भाव आढळून आसल्यास कार्बोफ्युरॉन (३ जी) १३५ किलो प्रति हेक्टरी झाडांभोवती रिंग पद्धतीने पुरेसा ओलावा असताना टाकून झाकावे. जरबेरा नाग अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरिफॉस (२० ई.सी.) १ मिली किंवा ॲसिफेट (७५ एस.पी.) १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. बाजरी सोसे अथवा हिंगे यांच्या नियंत्रणासाठी सकाळच्या वेळी वारा शांत असताना मिथिल पॅराथियॉन (२% भुकटी) एकरी ८ किलो या प्रमाणात धूरळावी. मोसंबी फळातील रस शोषणाऱ्या पतंगाचे व्यवस्थापन करण्यासाठी विषारी अमिष : १ किलो गूळ अधिक १ लिटर मोसंबी फळांचा रस अधिक २०० मिली मॅलिथिऑन (५० ईसी) प्रति १० लिटर पाणी यांचे मिश्रण तयार करावे. प्रति १० झाडास एक या प्रमाणे रुंद तोंडाच्या डब्यात २४०-३०० मिली ठेवून झाडावर बांधावे. संपर्क ः ०२४२६- २४३२३९ (ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com