agricultural stories in Marathi, crop advice rahuri region | Agrowon

कृषी सल्ला : पानवेल, गुलाब, ऊस, मका, मूग, उडीद, सोयाबीन

कृषी विद्या विभाग, राहुरी
गुरुवार, 20 जून 2019

हवामान ः
पुढील पाचही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील. ता. २०, २१ जून रोजी तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
खरीप पिकाची पेरणी मॉन्सूनचे आगमन झाल्यावर सलग ३ ते ४ दिवस पुरेसा पाऊस झाल्यानंतर (६५ ते १०० मिमी) वाफसा आल्यानंतरच करावी.

पानवेल ः
फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी, उतरणीच्या अगोदर डायमेथोएट (३० ई.सी.) १ मिलि प्रति लिटर या प्रमाणे शेवरी, शेवगा आणि वेलीवर फवारणी करावी.

हवामान ः
पुढील पाचही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील. ता. २०, २१ जून रोजी तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
खरीप पिकाची पेरणी मॉन्सूनचे आगमन झाल्यावर सलग ३ ते ४ दिवस पुरेसा पाऊस झाल्यानंतर (६५ ते १०० मिमी) वाफसा आल्यानंतरच करावी.

पानवेल ः
फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी, उतरणीच्या अगोदर डायमेथोएट (३० ई.सी.) १ मिलि प्रति लिटर या प्रमाणे शेवरी, शेवगा आणि वेलीवर फवारणी करावी.

गुलाब ः
लाल कोळी या किडीच्या नियंत्रणासाठी,
अॅबॅमेक्टिन (१.८ टक्के प्रवाही) ०.४ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

ऊस
हुमणीच्या नियंत्रणासाठी, पहिला पाऊस झाल्यानंतर निंब, बाभूळ व बोर या झाडांवरील भुंगेरे प्रकाश सापळ्यांचा वापर करून नष्ट करावेत. कंदिलाचा वापर करून सामुदायिकरीत्या रात्रीचे वेळी गोळा करावेत. रॉकेलमध्ये टाकून नष्ट करावेत.

जमिनीनुसार पिकांची निवड
भारी- कापूस, तूर, ज्वारी, सोयाबीन
मध्यम- सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, ज्वारी
हलकी- बाजरी, कुळीथ, तीळ, कारळा, एरंडी

मका
मका पिकामध्ये उडीद/ मूग/ चवळी/ सोयाबीन/ भुईमूग/ तूर आंतरपीक म्हणून घ्यावेत.

मूग आणि उडीद
मॉन्सूनचा पहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वापसा येताच पेरणी पूर्ण करावी.

मूग / उडीद/ सोयाबीन
जमिनीची पूर्व मशागत करावी. दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा असतानाच पेरणी करावी. पेरणीसाठी प्रमाणित बियाण्यांची खरेदी कृषी विद्यापीठे, महाबीज यांच्याकडून करावी. पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करावी.

कापूस
कापूस लागवडीसाठी मध्यम ते भारी, ९० से.मी. पेक्षा जास्त खोली असणारी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. पिकाची लागवड करण्यापूर्वी शेताची खोल नांगरट करून, कुळवाच्या २-३ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीअगोदर हेक्टरी १० ते १२ टन शेणखत बागायती कपाशीसाठी व ८ टन शेणखत कोरडवाहू कपाशीसाठी शेतात मिसळावे. गेल्या वर्षी ज्याठिकाणी कापूस, टोमॅटो, भेंडीची लागवड केली असेल तर ती जमीन कापूस लागवडीसाठी टाळावी. बीटी/ संकरित बियाण्यासाठी ९० सेंमी तर देशी बियाण्यांसाठी ६० सेमी अंतरावर उथळ सऱ्या पाडाव्यात. उथळ सऱ्यामुळे पाण्याची बचत होते.

सोयाबीन

  • सोयाबीन लागवडीसाठी मध्यम काळी पोयट्याची पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.
  • एक नांगरट व दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. शेवटच्या कुळवाच्या पाळी बरोबर चांगले कुजलेले शेणखत १० टन प्रतिहेक्टरी वापरावे.
  • एक नांगरट व दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीबरोबर चांगले कुजलेले शेणखत १० टन प्रतिहेक्टरी वापरावे.
  • सोयाबीन पिकामध्ये तूर हे आंतरपीक (३:१) या प्रमाणात घ्यावे.

तूर
पहिला पाऊस झाल्यावर वाफसा येताच कुळवाची पाळी देऊन घ्यावी. काडीकचरा वेचून जमीन पेरणीसाठी तयार ठेवावी. हेक्‍टरी चांगले कुजलेले पाच टन शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे.

०२४२६- २४३२३९
(ग्रामीण कृषी मौसम सेवा विभाग आणि कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)


इतर कृषी सल्ला
मत्स्यपालन : तंत्र बायोफ्लॉक उत्पादनाचे...फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या...
या आठवड्यात ढगाळ, थंड, कोरडे हवामान...महाराष्ट्राच्या मध्य भागावर पूर्व व पश्‍चिम...
सुधारित पद्धतीने करा हळद काढणीसर्वसाधारणपणे जातीपरत्वे हळद काढण्यास ७ ते ९...
असे करा संत्रा बागेत आंबिया बहरासाठी खत...संत्रा-मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन...
कृषी सल्लावाल  फुलोरा अवस्था वाल पिकावरील शेंगा...
तुरीवरील शेंगमाशीचे नियंत्रणतूर हे महाराष्ट्रातील प्रमुख डाळवर्गीय पीक आहे....
भविष्यासाठी नद्या जपण्याची गरजप्रत्यक्ष जीवनामध्ये हवामानाचे विविध बदल जाणवून...
फळबागेत आच्छादन कराफळपिकांमध्ये साधारणपणे १० अंश सेल्सिअसपेक्षा...
अशी करा नवीन द्राक्ष लागवडीची तयारीद्राक्ष लागवडीसाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे....
राज्यात थंडीचे प्रमाण सामान्य राहील सह्याद्री पर्वतरांगांवर हवेचा दाब १०१४...
एल निनो म्हणजे नेमके काय ?हवामानाविषयी माहितीमध्ये सातत्याने ऐकू येणाऱ्या...
गारपीटग्रस्त संत्रा बागेसाठी उपाययोजनामराठवाड्यातील काही भागांसह विदर्भात पुन्हा पाऊस व...
असे करा आंब्यावरील तुडतुड्यांचे नियंत्रणलांबलेल्या पावसामुळे आंबा पिकातील पालवीचा कालावधी...
असे करा वाढीच्या अवस्थेनुसार गहू...गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी योग्य पाणी...
असे करा गव्हावरील तांबेरा रोगाचे...गहू पिकाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटून गेले...
असे करा ज्वारी, गव्हावरील खोडमाशीचे...रब्बी हंगामातील ज्वारी व गहू पिकावर खोडमाशीचा...
असे करा करडईवरील मावा किडीचे व्यवस्थापन...करडईवर जगामध्ये  एकूण ७९ प्रकारच्या किडीची...
कृषी सल्ला : तूर, हरभरा, ज्वारी, कांदा...तूर शेंगा पक्वतेची अवस्था शेंग माशी, घाटे अळी...
लिंबूवर्गीय फळपीक सल्लासंत्रा-मोसंबी आंबे बहराचे नियोजन या वर्षी अगदी...
असे करा गहू पिकावरील खोडमाशी व मावा...गहू पिकात बुटक्या आणि मध्यम बुटक्या वाणांचा...