agricultural stories in Marathi, Crop pests more widespread than previously known | Agrowon

पिकांवरील किडींचा प्रसार अपेक्षेपेक्षा अधिक
वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

किडी आणि रोगांमुळे होणारे पिकांचे नुकसान हे वाढत चालले असून, ते आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक विस्तृत प्रदेशामध्ये पसरत असल्याचा निष्कर्ष एक्स्टर विद्यापीठातील संशोधकांनी काढला आहे. आज त्या ठिकाणी किडींची नोंद नसल्याचे मानले जाते, तिथेही त्यांचा वावर असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. हे संशोधन ‘ग्लोबल चेंज बायोलॉजी’मध्ये प्रकाशित केले आहे.

किडी आणि रोगांमुळे होणारे पिकांचे नुकसान हे वाढत चालले असून, ते आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक विस्तृत प्रदेशामध्ये पसरत असल्याचा निष्कर्ष एक्स्टर विद्यापीठातील संशोधकांनी काढला आहे. आज त्या ठिकाणी किडींची नोंद नसल्याचे मानले जाते, तिथेही त्यांचा वावर असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. हे संशोधन ‘ग्लोबल चेंज बायोलॉजी’मध्ये प्रकाशित केले आहे.

किडींची एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये नोंद होत नसल्यास, त्या तिथे नसल्याचे मानले जाते. मात्र, एक्स्टर विद्यापीठाने केलेल्या विश्लेषणामध्ये अनेक किडी सध्या आढळत नसल्या तरी त्या तिथे अस्तित्त्वात आहेत. ही शक्यता ७५ टक्केपेक्षा अधिक आहे. चीन, भारत, दक्षिण ब्राझील आणि पूर्वी सोव्हियत युनियनमध्ये असलेल्या अन्य काही देशात झालेल्या अभ्यासामध्ये अशा किडींची संख्या मोठी असल्याचे आढळले आहे.

‘सेंटर फॉर अॅग्रीकल्चर अॅण्ड बायोसायन्स इंटरनॅशनल’ (CABI) संस्थेच्या किडीच्या वितरणांच्या माहितीसाठ्यातील १७३९ किडीची माहिती या अभ्यासासाठी वापरण्यात आली. एक्स्टर विद्यापीठातील संशोधक डॉ. डॅन बेब्बर यांनी सांगितले की, सध्या काही ठिकाणी किडींच्या धोक्याची व्याप्ती समजून घेण्यासाठी आम्ही एक प्रारूप तयार केले आहे.
या प्रारूपाची अचूकता तपासण्यासाठी चीनमधील विविध प्रकाशनामध्ये प्रकाशित झालेल्या किडींच्या नोंदीचा वापर केला आहे. या नोंदी जागतिक किडीच्या माहितीसाठ्यामध्ये अद्याप समाविष्ट झालेल्या नाहीत.

विशिष्ट ठिकाणी ज्या किडी आढळण्याची केवळ शंका व्यक्त केली जात होती, त्या ठिकाणी मुळात या किडी असल्याचे दिसून आले आहे. कोणत्याही किडीच्या नियंत्रणासाठी व प्रसार रोखण्यासाठी त्यांच्या सुरवातीच्या अवस्था या अत्यंत महत्त्वाच्या असतात.

नव्या विभागामध्ये किडींचा प्रसाराचा वेग गेल्या काही वर्षांमध्ये वाढला आहे. त्यासाठी जागतिक व्यापाराला कारण धरले जात असले तरी त्यातील वातावरणातील बदलाचा वाटा नाकारता येणार नाही. या किडींचा नव्याने होणारा प्रसार रोखण्यासाठी किडींच्या सुरवातीच्या अवस्थांमध्येच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. पूर्वीच्या अभ्यामध्ये नोंदवल्या न गेलेल्या किडी जागतिक कीड वितरण माहितासाठ्यामध्ये गैरहजर असल्याचे मानले जात होते. मात्र, आमच्या अभ्यासामध्ये अशा छुप्या गैरहजर (स्युडो अॅबसेन्स) किडींची संख्या मिळवण्याची पद्धत पुढे आली आहे. त्यातून सुधारीत वितरण प्रारूप आणि धोक्याचे विश्लेषण करणे शक्य होईल.

इतर ताज्या घडामोडी
वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख...वाशीम : जिल्ह्यात या रब्बी हंगामासाठी एक लाख...
खानदेशातील बाजारांमध्ये ज्वारीची आवक...जळगाव : अतिपावसामुळे खानदेशात ज्वारीचे आतोनात...
कापूस वेचणीला परप्रांतीय मजुरांचा आधारअकोला : अकोट तालुक्यातील ग्राम तरोडा व परिसरात...
अमरावती जिल्ह्यात २४५० कोटींचे नुकसानअमरावती : मॉन्सुनोत्तर पावसामुळे जिल्ह्यात तीन...
नाशिक जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवर...नाशिक : ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील...
 बारामती उपविभागात ४३ हजार हेक्टरवरील...पुणे ः मॉन्सूनोत्तर पावसाने बारामती...
मराठवाड्यात ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील...औरंगाबाद  : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ४१...
पुणे बाजार समितीत ‘आंबेमोहर’च्या दरात...पुणे  ः आंबेमोहर तांदळासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर  ः कोरड्या आणि ओल्या दुष्काळामुळे...
नगर : रब्बी ज्वारीचा १ लाख ९१ हजार...नगर  ः मॉन्सूनोत्तर पाऊस जोरात झाला असला तरी...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १३ टक्के...सातारा  : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत...अर्धापूर, जि. नांदेड  : शेतकऱ्यांच्या...
शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषदकोल्हापूर  : येत्या गळीत हंगामासाठी ऊस दर...
आंदोलनाचा दणका; केळी पीकविमा...अकोला  ः २०१८-१९ या वर्षात केळी उत्पादक...
ऊस दराबाबत आज कोल्हापुरात बैठककोल्हापूर : यंदाच्या ऊस दरावर सकारात्मक तोडगा...
शिवसेनाप्रमुखांचा आज स्मृतिदिनमुंबई  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा...
पीकविम्यासाठी पुण्यात चौथ्या दिवशीही ...पुणे  ः गेल्या वर्षीचा खरीप पीकविमा न...
औरंगाबादमध्ये कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
ढगातील हिमकणांच्या निर्मितीची प्रक्रिया...एकत्रित प्रकारच्या ढगांमध्ये हवेच्या उभ्या...
किमान तापमानात घसरण, थंडीला सुरुवातमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा...