agricultural stories in Marathi, cultivation of Adulsa | Agrowon

अशी करा अडुळसा लागवड

औषधी व सुगंधी वनस्पती योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
शुक्रवार, 3 मे 2019

अडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर उंच वाढणारे झुडूप आहे. पाने हिरवी, लांबट, वर्तुळाकार, टोकाकडे निमुळती होत गेलेली असतात.

अडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर उंच वाढणारे झुडूप आहे. पाने हिरवी, लांबट, वर्तुळाकार, टोकाकडे निमुळती होत गेलेली असतात.

झुडपाचे मध्यम आकाराचे सोटमूळ लांब वाढते. खोडाला फांद्या समोरासमोर येतात. पेर फुगलेली असतात. फुले पांढरी असतात. फळे टोकाला लागतात.
या वनस्पतीची लागवड ही छाट कलमाद्वारा किंवा बिया लावूनही करता येते. मुख्यतः पावसाळ्यात लागवड केली जाते. कुंपणाच्या कडेला, शेतजमिनीच्या बांधावर एक x एक मीटर अंतरावर याची लागवड करावी. मोठ्या प्रमाणात लागवडीसाठी छाट कलमांचा वापर करून प्लॅस्टिक पिशवीमध्ये रोपे तयार करावीत. या वनस्पतीवर रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव आढळून येत नाही. पावसाळ्यात याची लागवड करावी. जूनच्या शेवटचा आठवडा ते जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात लागवड केल्यास पिकाची वाढ चांगली होते.
पानांची किंवा फुलांची काढणी गरजेनुसार झाडाच्या पानाच्या प्रमाणानुसार करावी. साधारणतः तिसऱ्या महिन्यापासून पाने काढणीसाठी तयार होतात. त्यानंतर एक ते दोन महिन्यांच्या अंतराने छाटणी करावी. छाटणी केल्यानंतर पाने, फांद्या, फुले ही सावलीत वाळवावीत. संपूर्ण वाळल्यानंतर त्याची पावडर करावी. आयुर्वेदिक औषधात अडुळशाचा वापर केला जातो.

संपर्क ः ०२४२६- २४३२९२
औषधी व सुगंधी वनस्पती योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

 

टॅग्स

इतर औषधी वनस्पती
आवळ्याचे गुणकारी पदार्थआवळा हे फळ इतर फळांसारखे वर्षभर टिकत नाही,...
जाणून घ्या बहुगुणी पळसाबद्दल..!शास्त्रीय नावः ब्युटीया मोनोस्पर्मा वनस्पतीचे...
तापावर गुणकारी गुळवेलजळजळ होणे, बारीक ताप येणे, उष्णता वाढणे या...
जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थविविध आजारांवरील उपचारामध्ये जवस उपयुक्त असूनही...
..अशी करा अश्‍वगंधाची लागवडअश्‍वगंधाची लागवड खरीप हंगामात करावी. लागवडीसाठी...
पोटदुखीवर नाडुकली उपयुक्त स्थानिक नाव     ः  ...
त्वचारोग, मधुमेह, संधिवातावर बोंडारा... स्थानिक नाव ः बोंडारा     ...
सूज, अतिसारावर मायाळू उपयोगी स्थानिक नाव    : मायाळू, भजीचा वेल...
पोटशूळ, इसब आजारांवर उपयुक्त काटेमाठ  स्थानिक नाव    : काटेमाठ...
दमा, खोकल्यावर गुणकारी घोळ स्थानिक नाव    :   ...
बहुगुणी तेलबिया पीक लक्ष्मीतरूलक्ष्मीतरू (शास्त्रीय नाव - Simarouba glauca...
त्वचारोगावर टाकळा उपयुक्त स्थानिक नाव    :  ...
अशक्तपणावर उपयुक्त हुम्भ स्थानिक नाव    :   ...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
आरोग्यदायी पुदिनापुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून,...
अशी करा अडुळसा लागवडअडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर...
अशी करतात गवती चहाची लागवड गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीसाठी...
अपचन, त्वचारोगावर उपयुक्त मोखा स्थानिक नाव     ः मोखा, मोकडी,...
औषधी, अन्न प्रक्रियेसाठी पुदिना उपयुक्तपुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, पाचक...