agricultural stories in Marathi, custurd apple plantation | Agrowon

सीताफळाचे अन्नद्रव्य, ओलीत व्यवस्थापन

निवृत्ती पाटील, डॉ. आर. एल. काळे
शुक्रवार, 5 जुलै 2019

सीताफळाची मुळे खोलवर न जाता वरच्या थरात राहतात, त्यामुळे चांगली वाढ मिळण्यासाठी योग्य प्रकारे खत व ओलिताचे व्यवस्थापन करावे.

योग्य मशागतीसह खतांचे नियोजन केल्यास सीताफळाचे चांगले उत्पादन मिळू शकते. फळे नवीन व जुन्या अशा दोन्ही फुटीवर येतात. म्हणून ही झाडे नत्राला चांगला प्रतिसाद देतात. नत्राची कमतरता असल्यास पानाच्या कडेला व टोकाला काळे डाग पडतात. पालाशची कमतरता असल्यास पानांच्या कडा जळतात. फळाचा आकार व प्रत सुधारण्यासाठी शेणखत, सेंद्रिय खत, गांडूळखत, निंबोळी पेंड व रासायनिक खतांचे संतुलित नियोजन करावे.  

सीताफळाची मुळे खोलवर न जाता वरच्या थरात राहतात, त्यामुळे चांगली वाढ मिळण्यासाठी योग्य प्रकारे खत व ओलिताचे व्यवस्थापन करावे.

योग्य मशागतीसह खतांचे नियोजन केल्यास सीताफळाचे चांगले उत्पादन मिळू शकते. फळे नवीन व जुन्या अशा दोन्ही फुटीवर येतात. म्हणून ही झाडे नत्राला चांगला प्रतिसाद देतात. नत्राची कमतरता असल्यास पानाच्या कडेला व टोकाला काळे डाग पडतात. पालाशची कमतरता असल्यास पानांच्या कडा जळतात. फळाचा आकार व प्रत सुधारण्यासाठी शेणखत, सेंद्रिय खत, गांडूळखत, निंबोळी पेंड व रासायनिक खतांचे संतुलित नियोजन करावे.  

ओलीत व्यवस्थापन :
 सीताफळाच्या झाडांना नियमित पाण्याची गरज नाही. निव्वळ पावसाच्या पाण्यावरसुद्धा चागले उत्पादन मिळते. परंतु संरक्षित ओलिताशिवाय झाडाला पहिली ३-४ वर्ष उन्हाळ्यात पाणी दिल्यास झाडांची वाढ चागली होते. त्याचप्रमाणे फळधारणेनंतर सप्टेबर ऑक्टोबर मध्ये १ -२ पाणी दिल्यास फळाची प्रत व आकार सुधारतो. बाग नांगरून घेतल्यास पावसाळ्यात बागेला जास्त पाणी उपलब्ध होते. उत्पादनावर आलेल्या बागांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे विश्रांतीच्या काळात झाडांना ३५-५५ दिवस पाणी देऊ नये. सर्वसाधारणपणे झाडांची ३५ ते ५० टक्के पानगळ झाल्यानंतर झाडांना विश्रांती मिळाली, असे समजावे.

वळण व छाटणी ः

  • झाडांना योग्य वळण देण्यासाठी वाढीच्या सुरवातीच्या काळात हलक्या छाटणीची आवश्यकता असते. झाडे योग्य वळण देऊन एका बुंध्यावर वाढवली तर झाडे डोलदार वाढतात. अन्यथा अनेक फांद्या असलेले झुडूप तयार होते. वाढ कमी होऊन उत्पादन कमी राहते. - मिनीपासून १ मीटर खोडावरील सर्व फुटवे काढून त्यांच्या चारही बाजूने फांद्या विखुरलेल्या राहतील, अशा मोजक्याच फांद्या ठेवाव्यात. जुन्या, वाळलेल्या, अनावश्यक आणि गर्दी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात. बागेत भरपूर सूर्य प्रकाश व हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी.
  • लागवडीनंतर रोप ४ ते ५ महिन्यांत १.५ ते २ फुटाचे झाल्यावर त्याला ६ इंच ठेऊन वरील शेंडा कापून टाकावा. नंतर खोडातून येणाऱ्या फांद्यातून फक्त २  किंवा ३ फांद्या ठेवाव्यात. बाकीच्या फांद्या काढून घ्याव्यात. या फांद्यांना पुन्हा ४-५ महिने वाढू द्यावे.  परत V आकाराच्या दोन फांद्या प्रत्येक मुख्य फांदीला ठेऊन इतर फांद्या काढून टाकाव्यात. म्हणजे जर जून – जुलै मध्ये लागवड केली असेल तर पहिली छाटणी ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये आणि दुसरी छाटणी मे – जून महिन्यामध्ये करावी. अशा प्रकारे छाटणी केल्यास दोन वर्षात १६ ते २४ फांद्याचे उत्कृष्ट झाड तयार होते.     
  • नवीन व जुन्या अशा दोन्ही वाढीवर फळ धारणा होते. फळधारणा अवस्थेतील झाडांची मे महिन्यात हलकी छाटणी केल्यास अधिक फळे जाड फांदीवर लागतील. खोल किंवा भारी छाटणी करू नये. छाटणीनंतर लगेच १ टक्के बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.

बहार व्यवस्थापन  ः

  • उत्तम व्यवस्थापन केल्यास दुसऱ्या वर्षी बहार घेता येऊ शकते. परंतु व्यापारी दृष्ट्या ३ ते ४ वर्षानंतर चांगले उत्पादन मिळते. सीताफळाचे झाड नैसर्गिकरीत्या हिवाळ्यात विश्रांतीत जाते. हिवाळा कमी होऊ लागल्यानंतर फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून पानगळ नैसर्गिकरीत्या होऊन नवीन पालवी फुटण्यास सुरवात होते.
  • मिनीच्या मगदुराप्रमाणे विश्रांतीच्या काळात झाडांना ३५ ते ५५ दिवस पाणी देऊ नये. सर्वसाधारणपणे झाडांची ३५-५० टक्के पानगळ झाल्यानंतर झाडांना विश्रांती मिळाली असे समजावे. या कालावधीत आंतरमशागतीची कामे, छाटणी इ. पूर्ण करून घ्यावी.  
  • नवीन पालवीसोबत काही प्रमाणात फुले निघतात, मात्र पुरेशी आर्द्रता नसल्यामुळे गळून पडतात. काही शेतकरी एप्रिल मे महिन्यात येणारी फुले टिकविण्यासाठी ओलीत व्यवस्थापनाद्वारे आर्द्रता वाढवून बहार घेतात. ही फळे सप्टेबर महिन्यात तयार होऊन दर चांगला मिळतो.
  • साधारणतः पाऊस झाल्यानंतर वातावरणातील आर्द्रता वाढून जून – जुलै महिन्यात बाग फुटते. ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये फळे काढणीस तयार होतात. वरील प्रमाणे खते भरून घ्यावीत.

पीक संरक्षण
सीताफळावर सहसा मोठ्या प्रमाणात किडी व रोगांना बळी पडत नाही. त्यावर पिठ्या ढेकणाचा (मिली बग) प्रादुर्भाव होतो. ही कीड पाने, कोवळ्या फांद्या व फळातून रस शोषते. पावसाळ्यात या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. जून-जुलै महिन्यात पिल्ले खोडावरून झाडावर चढतात. त्याच्या नियंत्रणासाठी १५-२० सेमी रुंदीची प्लॅस्टिक पट्टी किंवा लोखंडी पट्टीवर ग्रीस लावून खोडावर जमिनीलगत बांधून घ्यावी. किडीला झाडावर चढता येणार नाही.
 फळे कडक पडणे (स्टोन फ्रुट्स) : ही महत्त्वाची विकृती असून, फळांची वाढ पूर्ण न होता कडक होतात. रंग काळसर तपकिरी होऊन फळे झाडावरच राहतात. फळ वाढीच्या काळात अन्नरसासाठी स्पर्धा होऊन अन्नरस कमी पडल्याने विकृती येते. यासाठी झाडावर फळांची संख्या योग्य ठेवून अन्नद्रव्याचे संतुलित व्यवस्थापन करावे.  
फळे काळी पडणे : फळे ज्या वेळी कैरी एवढी होतात आणि या काळात जर हवेत आद्रता व सततचा पाऊस पडत असेल तेव्हा देठाजवळील खोल भागात पाणी साचून तेथील पेशी कुजू लागतात, बुरशी दिसते. याचे प्रमाण वाढत जाऊन फळाचा बराचसा भाग काळा पडतो. दुसरे कारण म्हणजे जर सीताफळाची बाग भारी काळ्या जमिनीत असेल आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसेल तेव्हा आणि बागेत स्वच्छता नसल्यास खूप तणांचा प्रादुर्भाव झाल्यास हा प्रादुर्भाव वाढतो.

काढणी व उत्पादन :
कलमांपासून लागवड केलेल्या झाडांना ३-४ वर्षांपासून बहार येतो तर बियांपासून तयार केलेल्या रोपांना ४-५ वर्षे बहार येण्यास लागतात. दरवर्षी प्रत्येक झाडापासून ११० ते १२० ग्रॅमची ६०-७० फळे मिळतात. सर्वसाधारणपणे ६-७ वर्ष वयाच्या झाडापासून १०० ते १५० फळे येतात. या पिकाचे आर्थिक आयुष्य हे १५ ते २० वर्षे राहते.   

 ः निवृत्ती पाटील, ०९९२१००८५७५
(विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम.)


फोटो गॅलरी

इतर फळबाग
व्यवस्थापन केळी बागेचे...तीव्र सूर्यप्रकाशापासून घडाचे संरक्षण करण्यासाठी...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
सीताफळात योग्य परागसिंचन होणे आवश्यकसीताफळाची फळधारणा तापमानावर जास्त अवलंबून...
नारळाला द्या शिफारशीत खतमात्रानारळ झाडाच्या सभोवताली पहिले वर्ष १ फूट, दुसरे...
असे करा लिंबूवर्गीय फळपिकांचे व्यवस्थापनसध्या काही संत्रा बागांना पूर्ण ताण बसून आंबिया...
दीड वर्षात पपईसह पाच पिकांचा 'तनपुरे...पपईच्या दीर्घ कालावधीच्या पिकात कांदा, पपई...
जीवनसत्त्व, क्षार घटकांचा पुरवठा करणारे...अंजिरामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक मुबलक...
द्राक्ष रिकट पूर्व तयारीसह व्यवस्थापनसध्याच्या वातावरणाचा विचार करता किमान...
केळी सल्लासूत्रकृमीग्रस्त जमिनीस खोल नांगरट देऊन उन्हात २...
केळीवरील सोंडकिडीचे कामगंध...जागतिक पातळीवर केळीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या...
दर्जेदार केळी उत्पादनाचे तंत्रकेळी घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड...
द्राक्ष सल्ला : तापमानातील चढ-उताराचे...सध्याच्या तापमानाचा विचार करता द्राक्षबागेत...
पिवळ्या पर्णछत्राची समस्या, कारणे जाणून...पावसाळा सरल्यानंतर थंडी पडली की बऱ्याच बागांमध्ये...
लिंबूवर्गीय फळपीक सल्ला सद्य:स्थितीत शेतकऱ्यांनी आंबिया बहरासाठी ...
असे करा रुगोज चक्राकार पांढरी माशीचे...थंडी वाढू लागल्यानंतर कडाक्याच्या थंडीला सुरुवात...
अशी करा पपईची लागवडपपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जून-जुलै, सप्टेंबर-...
नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकट घेण्याचा काळसध्या वातावरण कमी होत असून, काही ठिकाणी ढगाळ...