agricultural stories in Marathi, dairy development in kadvanchi village | Agrowon

कडवंची : घरापुरते दूध अन् शेणखतासाठी पशुपालन
संतोष मुंढे
रविवार, 21 एप्रिल 2019

कडवंचीमधील शेतकऱ्यांनी द्राक्ष शेतीला संघटन कौशल्यातून प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे. द्राक्ष बागांसाठी पुरेसे शेणखत उपलब्ध व्हावे आणि कुटुंबापुरते दुभते राहावे म्हणून गायी, म्हशी, शेळीपालन केले जाते. गावकऱ्यांचे संघटन कौशल्य, मार्केटचा अभ्यास आणि जालना शहरातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीला असलेली संधी लक्षात घेता येत्या काळात गावात दूध प्रक्रिया व्यवसाय उभा राहू शकतो. कडवंचीमधील शेतकऱ्यांनी तशी तयारी दाखविल्यास पशुसंवर्धन विभाग याबाबत मार्गदर्शन तसेच शासकीय योजना राबविण्यासाठी तयार आहे.
- अमितकुमार दुबे,सहायक आयुक्‍त, पशुसंवर्धन विभाग, जालना

द्राक्षाचे गाव असलेल्या कडवंचीमधील प्रत्येक शेतकऱ्याचे पशुपालनाकडेही तेवढेच लक्ष आहे. प्रत्येकाच्या गोठ्यात गाय, म्हैस, बैल यांसह किमान चार शेळ्या, मेंढ्याही दिसतात. २०१२ मध्ये झालेल्या ऐकोणीसाव्या पशुगणनेनुसार कडवंचीमध्ये ४३६ बैल, ३०५ गायी, ९३ म्हशी, २०२ मेंढ्या आणि १९ शेळ्या होत्या. सध्या होत असलेल्या पशुगणनेत ही संख्या निश्‍चितच वाढलेली असेल.

गावात किरकोळ स्वरूपात शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. प्रामुख्याने दुभत्या गायी, म्हशी या केवळ घरापुरते दुभते राहावे आणि शेतीला पुरेसे शेणखत उपलब्धतेसाठीच सांभाळल्या जातात. शेतीकामाच्या व्यापातून वेळ मिळाला आणि थोडेफार अधिकचे दूध शिल्लक राहात असेल तर जालना-सिंदखेडराजा मार्गावर असलेल्या हॉटेल व्यावसायिकांना विक्री
केली जाते.

शेळीपालनाकडे कल वाढला

दुभती जनावरे, शेळ्या केवळ दुभत्यासाठी नाही तर शेतीला शेणखत मिळावे म्हणून आम्ही सांभाळतो. गावातील बहुतांश शेतकरी याच उद्देशाने शेळीपालन, म्हैसपालन, गाईपालन करतात. बायोगॅस स्लरीमुळे जमिनीचा पोत टिकवून ठेवण्यास आम्हाला मदत होते. माझ्याकडे दोन गीर व एक संकरीत गाय आहे. याशिवाय दहा शेळ्या आहेत. गावातील प्रत्येकाच्या गोठ्यात किमान दोन, तीन शेळ्या दिसतात. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांचा शेळीपालनाकडे कल वाढला आहे.
- कैलास क्षीरसागर, पशुपालक

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यतापुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात...
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, ...पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने...
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील...मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...