गारपिटीसह पावसाची शक्यता

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत काही दिवशी जोरदार पावसाची शक्यता राहील. अधिक पाऊस व गारपीट, तसेच विजा पडणे असे प्रकार होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत जेथे हवेचे दाब कमी होतील तेथे ढग जमून पाऊस होईल.
weekly weather
weekly weather

या आठवड्यात महाराष्ट्रावर १००६  हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन पावसाची शक्यता कायम राहील. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत काही दिवशी जोरदार पावसाची शक्यता राहील. अधिक पाऊस व गारपीट, तसेच विजा पडणे असे प्रकार होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत जेथे हवेचे दाब कमी होतील तेथे ढग जमून पाऊस होईल. हे सर्व हवामान बदलामुळे सुरूच राहील. ‘नेचर’ या मासिकात ‘हवामानाची आणीबाणी’ या मथळ्याखाली संशोधनपर निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. त्यात गेल्या २० वर्षांत २६७ गिगा टन (एक गिगा टन म्हणजे १ अब्ज टन) इतके प्रतिवर्षी बर्फ वितळत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच स्वित्झर्लंड येथील समुद्रपातळी ६ मीटरने वाढली असून, समुद्रकाठावरील वस्त्यांत पाणी शिरत असल्याचे सांगण्यात आले आहे. पृथ्वीवरील २८ ट्रिलियन टन बर्फ (म्हणजे २८ लाख कोटी टन)  गेल्या २० वर्षांत कमी झाल्याचे निरीक्षण नोंदलेले आहे. याचा मोठा परिणाम जागतिक हवामानावर होत असून, अमेरिकेतील कोलोरॅडो, बर्लिंग्टन या प्रांतात दिसत आहे. असाच परिणाम होबाम या फ्रान्समधील भागातही दिसत आहे. कोकण  सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४२ ते ४६ मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात ६ मि.मी., रायगड जिल्ह्यात १२ मि.मी., तर ठाणे जिल्ह्यात ३ ते ४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ८० ते ८५ टक्के तर ठाणे, रायगड जिल्ह्यांत ६७ ते ७२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४० टक्के, तर उर्वरित रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३३ ते ३६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्य व वायव्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र  नाशिक व धुळे जिल्ह्यात काही दिवशी ८ मि.मी., तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ४ ते ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग धुळे जिल्ह्यात अधिक राहील. मराठवाडा  या आठवड्यात उस्मानाबाद, लातूर, नांदेड व बीड जिल्ह्यांत काही दिवशी १४ ते २० मि.मी. पावसाची शक्यता आहे. परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत काही दिवशी ४ ते ८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैर्ऋत्येकडून राहील. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, लातूर, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ४८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता औरंगाबाद जिल्ह्यात १७ टक्के व उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २० ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. पश्‍चिम विदर्भ  या आठवड्यात अकोला, वाशीम, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत काही दिवशी ४ ते ९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १२ कि.मी. राहील. अकोला व वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस, तर अमरावती, बुलडाणा जिल्ह्यांत ३९ ते ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ३९ टक्के, तर  दुपारची १९ टक्के राहील. मध्य विदर्भ  यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत काही दिवशी ४ ते ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ४१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ कि.मी. व दिशा नैॡत्येकडून राहील. पूर्व विदर्भ  चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत काही दिवशी ४ ते ६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १४ कि.मी. राहील. कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ते २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ५८ टक्के, तर दुपारची १९ ते २४ टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत प्रत्येकी ४९, ८७, ६३ व ४६ मि.मी. पावसाची शक्यता राहील. तर सोलापूर व नगर जिल्ह्यांत १६ ते २० मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १० कि.मी. राहील. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, पुणे जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, तर उर्वरित सांगली, सातारा, नगर, सोलापूर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ८२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते ३५ टक्के राहील.

कृषी सल्ला 

  •   पावसाची शक्यता लक्षात घेऊन कांदा पिकाची काढणी करून सुरक्षित स्थळी साठवण करावी.
  •   नवीन लागवड केलेल्या कलमांना काठीचा आधार द्यावा.
  •   फळबागांमध्ये आच्छादनाचा वापर करावा.
  •   नवीन लागवड करावयाच्या फळबागांसाठी खड्डे तयार करावेत.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ  व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी  फोरम फॉर साउथ आशिया.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com