agricultural stories in Marathi, envirnmrnt friendly wild boar management | Agrowon

रानडुकरांचे पर्यावरणस्नेही व्यवस्थापन
डॉ. प्रमोद नागोराव मगर, मयूर ढोले, डॉ. सुरेश नेमाडे
रविवार, 19 मे 2019

वनविभाग किंवा जंगलाच्या आसपास असलेल्या प्रदेशामध्ये शेतीसाठी कीडरोगाबरोबरच रानडुक्कर, माकड, नीलगाय/रोही, पक्षी, कृंतक, उंदीर व घूस अशा पृष्ठवंशीय प्राण्यांमुळे होणाऱ्या विध्वंसाचा सामना करावा लागतो. या अनियमितपणे होणाऱ्या हल्ल्यासाठी शेतकऱ्यांनी दक्ष राहून प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला पाहिजे.

वनविभाग किंवा जंगलाच्या आसपास असलेल्या प्रदेशामध्ये शेतीसाठी कीडरोगाबरोबरच रानडुक्कर, माकड, नीलगाय/रोही, पक्षी, कृंतक, उंदीर व घूस अशा पृष्ठवंशीय प्राण्यांमुळे होणाऱ्या विध्वंसाचा सामना करावा लागतो. या अनियमितपणे होणाऱ्या हल्ल्यासाठी शेतकऱ्यांनी दक्ष राहून प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला पाहिजे.

शेतीमध्ये त्रासदायक ठरणाऱ्या प्राण्यांमध्ये रानडुकरांचा वाटा अनेक ठिकाणी सर्वात मोठा आहे. भात, मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग, दाळ व तेलवर्गीय पिके, भाजीपाला व फळवर्गीय पिके, ऊस अशा पिकांमध्ये खाण्यापेक्षा त्यांच्या हैदोसामुळे अधिक नुकसान होते. रानडुकरे नेहमी कळपाने सूर्योदयापूर्वी (पहाटे) व रात्रीच्या वेळी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. त्यांची सक्रियता दिवसापेक्षा पहाटे व रात्री अधिक असते. रानडुकरांची हुंगण्याची किंवा वास घेण्याची क्षमता मोठी असते. ते दुरूनच पिकाचा अंदाज घेऊ शकतात.

रानडुक्कर (Wild Boar)-
शास्त्रीय नाव – Sus scrofa (सूस स्क्रोफा)
कूळ - Suidae (सुईडी)
गण- Artiodactyla (आर्टिओडॅक्टिला)
उपगण- Suiformes (सुइफोर्मस)

  • रानडुक्कर हा वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत परिशिष्ट ३ प्रजातींच्या यादीत नमूद केलेला प्राणी असून, हा प्राणी कायद्यानुसार संरक्षित आहे. त्यांना मारणे किंवा त्यांना हानी पोहचल्यास शिक्षा होऊ शकते.
  • आकार व वजन - रानडुक्कर आकाराने ९० सेमी (३ फूट) उंच आणि वजन १ ते २ क्विंटल असते (नराचे सरासरी वजन १३५ ते २३० किलो तर मादीचे वजन ८५ ते १३५ किलोपर्यंत असते).
  • रंग- शरीर काळ्या रंगाचे असून शरीरावर करड्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचे जाडे केस असतात. तरुण रानडुक्कर तपकिरी रंगाचे असून प्रौढ हे करड्या रंगाचे असतात. नवीन जन्माला आलेली पिले तपकिरी रंगाची असून, शरीरावर काळ्या पट्ट्या असतात.
  • तोंड- लांब व अरुंद सोंडेसारखे तोंड असते.
  • शेपटी- शेपटी सरळ व मोठी असून, शेवटी केसाचा झुबका असतो.
  • पाय- त्यांचे पाय अरुंद असून त्यांचे चारही बोटामध्ये हाड असते. परंतू जमिनीवर चालत असताना त्यांचा अंगठा जमिनीला स्पर्श करीत नाही.
  • दात- वरच्या जबड्यात कृंतक दात असतात. चावायचे दात (दाढ) मजबूत व बंद खाचयुक्त असतात. सुळे दात नरांमध्ये जास्त विकसित असतात. खालच्या बाजूचे सुळे दात ३२ सेमी इतके लांब असून, बाहेरच्या बाजूने वाकलेले असतात. खालच्या बाजूचे व वरच्या बाजूचे दोन्ही सुळे दात बाहेर निघालेले व वाकलेले असतात. रानडुकर रवंथ करत नाहीत. त्यांच्या पोटाची रचना अगदी साधी सोपी असते.
  • रानडुक्कर शाकाहारी, मांसाहारी म्हणजेच बहुअन्नभक्षक असतात. ते झाडाची मुळे, कंद, कीटक, साप व इतर लहान सस्तन प्राण्यांवर उपजीविका करतात. त्यांचा समूह १५ ते ३५ जणांचा असतो. त्यात प्रदेशनिहाय नर व मादी यांची संख्या वेगळी असते. मादी स्थानिक ठिकाणी राहून पिलांचे संरक्षण करतात. नर हे आक्रमक असून मिलनप्रसंगी जास्त आक्रमक असतात. अन्य वेळी डिचवल्याशिवाय किंवा उत्तेजित केल्याशिवाय आक्रमण करत नाहीत.
  • भारतामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये रानडुकरांचा समावेश परिशिष्ट ३ मध्ये करण्यात आला आहे. रानडुकरांची शिकार, त्यांना बंदिस्त करणे किंवा मारणे हा शिक्षापात्र गुन्हा आहे. म्हणून पिकांचे रानडुकरांपासून संरक्षण करण्याकरिता कमी खर्चिक, परवडणारी, कायदेशीर रणनीती वापरावी लागते.

रानडुक्कर व्यवस्थापनाच्या पद्धती ः
भारतीय कृषी अनुसंधान परिषदअंतर्गत अखिल भारतीय समन्वित प्रकल्प- पृष्ठवर्गीय कीड व्यवस्थापन, हैदराबाद यांनी शिफारस केलेल्या व प्रचलित पारंपरिक रानडुक्कर व्यवस्थापन पद्धतींची माहिती घेऊ.

१) भौतिक अडथळे निर्माण करणे ः रानडुकरांची हुंगण्याची क्षमता चांगली असली तरी त्यांची दृष्टी व ऐकण्याची क्षमता ही अतिशय कमी असते. याच गोष्टींचा फायदा घेऊन आपण त्यापासून पिकांचे संरक्षण करू शकतो.

तारांचे कुंपण (Barbed Wire Fence) -
जर रानडुकरांचा हैदोस ठराविक ठिकाणी मोठ्या प्रमाणात असेल तर तिथे तारांचे ३ पदरी कुंपण करावे. या तीन पदरांमध्ये एक फूट अंतर ठेवल्यास रानडुकरांसाठी भौतिक अडथळा तयार होतो. रानडुकरे अशा ठिकाणी प्रवेश करणे टाळतात.
खर्च- तार किंमत- रु. ७००० प्रति एकर + मजूर खर्च- रु. १००० = एकूण खर्च रु. ८००० प्रती एकर क्षेत्र

गोलाकार टोकदार पात्याचे कुंपण (Circular Razor Fence)
पिकापासून एक फूट अंतरावर पिकाच्या चारही बाजूने टोकदार पात्यांचे कुंपण लावावे. भाजीपाला व फळ पिकांचे रानडुकरांपासून दीर्घ काळ संरक्षणासाठी ही पद्धत फायद्याची ठरते.
खर्च- कुंपण किंमत- रु. १८,००० प्रति एकर, + मजूर खर्च- रु. १००० = एकूण खर्च रु. १९,००० प्रति एकर क्षेत्र.

साखळी जोडणीयुक्त कुंपण (Chain Link Fence) -
पिकाच्या चारही बाजूने पिकापासून एक फूट अंतरावर ३ फूट उंचीचे साखळी जोडणीयुक्त कुंपण लावावे. रानडुकरांसाठी भौतिक अडथळा तयार झाल्याने अशा भागात रानडुकरे प्रवेश करीत नाहीत.
खर्च- कुंपण किंमत - रु. १०,५०० प्रति एकर, + मजूर खर्च - रु. १००० = एकूण खर्च रु. ११,५०० प्रति एकर क्षेत्र.

सौरऊर्जाचलित कुंपण -
कायमस्वरूपी व उच्च मूल्यवान पिकांचे रानडुकरांपासून संरक्षण करण्यासाठी सौरऊर्जाचलित कुंपनाचा वापर प्रचलित होत आहे. ते रानडुकरासह अन्य वन्य प्राण्यांना अडविण्यासाठी पर्यावरणपूरक ठरत आहेत. हे कुंपण पिकांभोवती लावले जाते. त्याच्या तारेतून १२ व्होल्ट विद्युतचे वहन होते. त्यामुळे प्राण्यांना विजेचा झटका बसत असला तरी जीवितहानी होत नाही. याचा प्रति एकर खर्च रु. ९० हजारांपर्यंत येतो.

मत्स्य जाळे कुंपण –
पिकाच्या चारही बाजूने पिकापासून एक फूट अंतरावर मत्स्य जाळे कुंपण लावता येते. त्यामुळे रानडुकरांसाठी भौतिक अडथळा निर्माण होतो. ही पद्धत सगळ्यात साधी, स्वस्त व सोपी आहे. प्रति एकर क्षेत्रासाठी मजुरासह फक्त रु. २००० इतका खर्च येतो.

चर किंवा खड्डा पद्धत-
रानडुकरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी सर्वात साधी व सोपी पद्धत म्हणजे शेताच्या भोवताली २ फूट रुंद आणि दीड फूट खोल खड्डा किंवा चर खोदून ठेवणे. रानडुकरे अशा शेतापासून दूर राहतात. खोदलेल्या चरांमध्ये पाणी अडून जलसंधारणही होऊ शकते.

डॉ. प्रमोद नागोराव मगर, ७५८८५६६६१५
(कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
पशुधनवाढीचे विश्लेषण कधी? आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...
आरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...
तळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...
जिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...