agricultural stories in Marathi, Fall army worm in corn | Agrowon

मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

योगेश मात्रे, डॉ. पी. आर. झंवर, डॉ. एस. डी. बंट्टेवाड
रविवार, 18 जुलै 2021

लष्करी अळी ही बहुभक्षीय कीड असून ८० पेक्षा जास्त वनस्पतीवर उपजीविका करते. गवतवर्गीय पिके हे आवडते खाद्य असून, या खरीप हंगामातही वेळीच सावध होऊन एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे उपाय करावेत.

लष्करी अळी ही बहुभक्षीय कीड असून ८० पेक्षा जास्त वनस्पतीवर उपजीविका करते. गवतवर्गीय पिके हे आवडते खाद्य असून, त्यातही मका, मधू मका, ज्वारी यावर अधिक आढळते. हराळी, सिंगाडा, कापूस, रान मेथी, मका, ओट, बाजरी, वाटाणा, भात (धान), ज्वारी, शुगरबीट, सुदान ग्रास, सोयाबीन, ऊस, तंबाखू व गहू यांवर वारंवार प्रादुर्भाव होतो. या खरीप हंगामातही वेळीच सावध होऊन एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे उपाय करावेत.

फॉल आर्मी वर्म (लष्करी अळी) (शास्त्रीय नाव - स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) ही अमेरिकेतील मका पिकावरील कीड असून, जून २०१८ मध्ये भारतात सर्वप्रथम प्रादुर्भाव आढळला. या किडीमुळे खरीप व रब्बी हंगामात पिकांचे (उदा. मका, ऊस, ज्वारी) मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

किडीची ओळख व जीवनक्रम ः
१. अंडी, अळी, कोष व पतंग या चार अवस्था.
२. मादी पानाच्या वरच्या व खालील बाजूस, पोंग्यामध्ये जवळपास एक हजार अंडी घालते.
३. पुंजक्यामध्ये असलेल्या अंड्यांवर लोकरीसारखे आवरण.
४. अंड्यांचा रंग पिवळट सोनेरी. घुमटाच्या आकाराची.
५. अंडी अवस्था २ ते ३ दिवस.

अळी
१. ही अवस्था सहा अवस्थांमधून पूर्ण होते.
२. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या अन्नाच्या शोधात विखुरतात.
३. प्रथम अवस्थेतील लहान अळ्या हिरव्या, डोके काळे.
४. दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केल्यानंतर डोके तपकिरी, तिसऱ्या अवस्थेमध्ये रंग तपकिरी.
५. अंगावर वरच्या बाजूने तीन पांढऱ्या रेषा.
६. चौथ्या ते सहाव्या अवस्थेत अळीच्या शरीरावर उंचवट्यासारखे ठिपके.
७. अळी अवस्था १४ ते १९ दिवसांमध्ये पूर्ण.

कोष
१. पूर्ण वाढ झालेली अळी २ ते ८ सेंटिमीटर खोल जमिनीत जाऊन मातीचे आवरण करून कोषावस्थेत.
२. कोष लालसर तपकिरी.
३. कोषावस्था ९ ते १२ दिवसांत पूर्ण.

पतंग
१. नर पतंग राखाडी ते तपकिरी. पुढील पंखाच्या वरच्या कडेला त्रिकोणी आकारात पांढरा ठिपका व पंखाच्या मध्यभागी गोल ठिपका.
२. मादी पतंगाचे पुढचे पंख राखाडी.
३. नर आणि मादीमध्ये मागील पंख सोनेरी पांढऱ्या रंगाचे.
४. पतंग अवस्था चार ते सहा दिवसांची.
५. लष्करी अळीचा जीवनक्रम ३२ ते ४६ दिवसांत पूर्ण.

अळी ओळखण्याची खूण
१. डोक्याच्या पुढील बाजूस उलट इंग्रजी ‘Y’ आकाराची खूण
२. शरीराच्या आठव्या ‘बॉडी सेगमेंट’ वर चौकोनी आकारात चार ठिपके. त्यात केसही आढळतात.
३. शरीरावर अन्यत्र अशी ठेवण नाही.

प्रसार ः
या किडीचा प्रसार वेगाने होण्यासाठी पुढील बाबी कारणीभूत आहेत.
प्रवास क्षमता ः या किडीचा पतंग एका रात्रीत १०० किमी तर १५ दिवसात २ हजार किमी प्रवास करतो. यामुळे दुर्गम भागातील मका पीक शोधून तिथेही अंडी घातले जातात. दूरवर एकाकी असलेल्या पिकांमध्ये प्रार्दुभाव आढळतो.
प्रजनन क्षमता ः या किडीचा मादी पतंग एकावेळी २०० ते ३०० अशा पद्धतीने ७ ते ८ वेळा २ हजार अंडी देते. यामुळे किडीच्या संख्येत अल्पावधीत प्रचंड वाढ होते. प्रादुर्भाव लवकर पसरत आहे.

नुकसानीचा प्रकार

१. मका पिकात रोपावस्थेत पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील अळ्या पाने खरवडून खात असल्याने पानावर पांढरे लांबट चट्टे.
२. अळी तिसऱ्या अवस्थेत पोंग्यामध्ये प्रवेश करून पाने खाण्यास सुरवात करते. या अवस्थेत पानांवर छिद्रे दिसतात.
३. पाचव्या अवस्थेत पोंग्यामध्ये राहून पाने खाते. त्यामुळे पानांवर मोठी छिद्रे.
४. सहाव्या अवस्थेत अळी अधाशीपणे पाने खाऊन पोंग्यामध्ये विष्ठा टाकते. मक्‍याची पाने झडल्यासारखी दिसतात.
५. तुरा आणि कणीस भरण्याच्या अवस्थेत आर्थिक नुकसान अधिक. अळी कणसात प्रवेश करून दाण्यांवर उपजीविका करते. मधुमका जास्त बळी पडतो.

शेतात निरीक्षण कसे करावे?
१. शेताचे दररोज निरीक्षण करावे. बाहेरील बाजूच्या तीन ते चार ओळी सोडून शेतातून इंग्रजी डब्ल्यू (W) आकारात चालावे. या आकारातील प्रत्येक ओळीतील पाच अशी एकूण वीस झाडे निवडावीत. पैकी किती झाडांवर प्रादुर्भाव आहे, याची नोंद घ्यावी.
२. वीस झाडांपैकी दोन झाडे प्रादुर्भावित असतील तर नुकसान पातळी १० टक्के आहे असे समजावे. जर पीक रोपावस्थेत अथवा मध्य वाढीच्या अवस्थेत असेल तर नियंत्रणाचे उपाय योजणे गरजेचे आहे.

आर्थिक नुकसान संकेत पातळी
१. रोपावस्था ते सुरुवातीची पोंगा अवस्था (उगवणी नंतर दोन आठवड्यांपर्यंत)-तीन पतंग प्रति सापळा सलग तीन दिवस किंवा ५ टक्के प्रादुर्भावित झाडे
२. सुरुवातीची पोंगा अवस्था ते मध्य पोंगा अवस्था (उगवणीनंतर दोन ते चार आठवडे) : ५ ते १० टक्के प्रादुर्भावित झाडे
३. मध्य पोंगा अवस्था ते उशिराची पोंगा अवस्था (उगवणीनंतर ४ ते ७ आठवडे) : १० ते २० टक्के प्रादुर्भावित झाडे
४. उशिराची पोंगा अवस्था (उगवणीनंतर सात आठवड्यांपुढे)- २० टक्क्यांपेक्षा जास्त प्रादुर्भावित झाडे
५. तुरा लागण्याची अवस्था ते पीक काढणी : १० टक्क्यांपेक्षा जास्त कणसाचे नुकसान.

सध्या करावयाचे व्यवस्थापन

 • फेरपालट - मका घेतलेल्या शेतात त्यानंतर भुईमूग अथवा सूर्यफूल घ्यावे.
 • एकाच वेळी पेरणी केल्यामुळे एका प्रदेशातील मका एकाच वेळी वाढतो.
 • मका पिकाभोवती नेपियर गवताच्या ३ ते ४ ओळी लावावे. हे गवत सापळा पीक म्हणून कार्य करते. या गवतावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास निंबोळी अर्क (५% ) किंवा ॲझाडिरॅक्टीन (१५०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 • मका पेरणीनंतर लगेच एकरी दहा पक्षी थांबे उभारावेत.
 • पानांवर दिसणारे अंडीपुंज व सुरवातीच्या अवस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
 • किडींचे नैसर्गिक शत्रू उदा. परभक्षी (ढालकिडा, मोठ्या डोळ्याचा ढेकूण इ. व परोपजीवी किटक (ट्रायकोग्रामा, टिलोनोमस, कॅम्पोलेटीस इ.) यांचे संवर्धन करावे. यासाठी आंतरपिके व शोभिवंत फुलांची झाडे लावावी.
 •  ट्रायकोग्रामा किंवा टिलेनोमस रेमस यांनी परोपजीवीग्रस्त ५० हजार अंडी प्रति एकर एक आठवड्याच्या अंतराने ३ वेळा किंवा कामगंध सापळ्यामध्ये ३ पतंग प्रति सापळा आढळून आल्यास शेतात सोडावेत.
 •  मक्यावरील लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी ५ कामगंध सापळ्याचा वापर आणि प्रत्यक्ष शेताचे निरिक्षण करावे.
 • सामूहिकरीत्या मोठ्या प्रमाणात नर पतंग आकर्षित करून मारावेत. यासाठी १५ कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत. प्रकाश सापळे लावावेत.
 • पोंगा व्यवस्थित तयार होईल त्या वेळी माती आणि राख किंवा चुना यांचे ९:१ या प्रमाणात मिश्रण घेऊन त्यात टाकावे. त्यामुळे पोंग्यातील अळ्यांवर परिणाम होतो.
 • प्रादुर्भाव दिसू लागताच जैविक कीटकनाशक नोमुरिया रिलाई ३ ग्रॅम किंवा मेटारायझीम ॲनीसोप्ली ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 • प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर गेल्यास रासायनिक नियंत्रणासाठी,
 • फवारणी प्रति लिटर पाणी
  थायामेथोक्झाम (१२.६ %) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (९.५ % झेडसी) ०.५ मि.लि. किंवा
  स्पिनेटोरम (११. ७ एससी) ०.९ मि.लि. किंवा
  क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.४ मि.लि.

विशेष सूचना
१. कीटकनाशक आलटून पालटून फवारणी करावी. द्रावण पोंग्यात जाईल याची काळजी घ्यावी.
२. रासायनिक कीटकनाशकाची फवारणी चारा पिकावर करू नये.
३. एकाच रासायनिक कीटकनाशकाची फवारणी हंगामात दोन पेक्षा जास्त वेळा करू नये.
४. तुऱ्याची अवस्था व त्यानंतर फवारणी टाळावी.
५. फवारणी करताना मजुराने सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी.

योगेश मात्रे ( पीएच. डी. विद्यार्थी ), ७३८७५२१९५७,
डॉ. पी. आर. झंवर (सहयोगी प्राध्यापक), ७५८८१५१२४४,

(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

टीप :
१) एकात्मिक व्यवस्थापन, केंद्रीय कृषी मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे ६ मे २०१९ व रासायनिक कीटकनाशकांचा वापर २८ मे २०१९ च्या कार्यालयीन परिपत्रकानुसार आहे.)
२) वरील प्रमाण नॅपसॅक पंपासाठी आहे.


फोटो गॅलरी

इतर कृषी सल्ला
द्विदल पिकांसाठी रायझोबिअम जीवाणू...पेरणीपूर्वी  बीजप्रक्रिया करण्यासाठी...
शेतकरी नियोजन : पीक संत्राशेतकरी : ऋषिकेश सोनटक्के गाव : टाकरखेडा...
राज्यात आठवडाभर पावसात उघडीपीची शक्‍यताया आठवड्यात औरंगाबाद, गडचिरोली, वर्धा, गोंदिया,...
भरड धान्ये : पोषक तत्त्वांचे आगरभारताच्या शिफारशीनुसार संयुक्त राष्ट्राने २०२३ हे...
कंपन्यांच्या माध्यमातून शाश्‍वत...अजूनही शाश्‍वत मूल्यसाखळी विकसित झालेली नाही....
देशावर लाटणं फिरवणारा कंबोडियन पोळपाटभगवान विष्णूच्या या देशात मी माझ्या बाईकवरून...
शेतकरी नियोजन : पीक कापूसशेतकरी : गणेश श्‍यामराव नानोटे गाव : ...
कृषी सल्ला (कपाशी, सोयाबीन, तूर, वांगी...कपाशी फुले उमलणे ते बोंड धरणे बागायती...
तंत्र रब्बी ज्वारी लागवडीचे...कोरडवाहू रब्बी ज्वारी पेरणी १५ सप्टेंबर ते १५...
कृषी सल्ला (खरीप भात, चिकू, नारळ, हळद)खरीप भात  दाणे भरण्याची अवस्था (हळव्या...
रब्बी ज्वारीची पूर्वतयारीरब्बी हंगामात ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी...
लिंबूवर्गीय फळपिकांतील तपकिरी फळकूज...सद्यःस्थितीत पावसाची रिमझिम, अपुरा सूर्यप्रकाश,...
द्राक्ष बागेत हंगामापूर्वी करावयाची...सध्या फळछाटणीचा कालावधी सुरू असून, येत्या हंगामात...
टोमॅटोतील विषाणूजन्य रोगांचे एकात्मिक... अ) प्रतिबंधात्मक किंवा पूर्वनियंत्रण ः...
टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांची ओळखसातत्याने बदलणारे तापमान व अनुकूल वातावरणामुळे...
शेतकरी नियोजन पीक : आंबाशेतकरी : रजनीकांत मनोहर वाडेकर. गाव : ...
रक्तक्षय होण्याची कारणे अन् उपाययोजना...मुलांच्या वाढीच्या काळात, स्त्रियांच्या गरोदरपणात...
जाणून घ्या भाजीपाला पिकांच्या काढणीच्या...योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने काढणी केल्यास...
निसर्गाचा सन्मान केला तर साथ मिळतेच...कर्नाटक हे ३१ जिल्ह्यांचे आणि भौगोलिकदृष्ट्या...
द्राक्ष बागेत पाऊस, ढगाळ वातावरणामुळे...गेल्या आठवड्यात द्राक्ष लागवडीखाली असलेल्या बागेत...