agricultural stories in Marathi, farmer producer company | Agrowon

शेतकरी उत्पादन कंपनीचा उद्योग उभारताना...
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 जुलै 2019

शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाल्यानंतर पुढील कार्यासाठी भांडवलाची पूर्तता करणे आवश्यक आहे. कंपनीसाठी किती भांडवल लागेल याविषयी अंदाज करण्यासाठी अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. शेतकरी उत्पादक कंपनी कोणत्या पिकावर काम करते तसेच किती प्रमाणात प्रक्रिया व विक्री व्यवस्था नियोजन करते यावरून व्यवसायाचे स्वरूप लक्षात येते. त्यावरून भांडवलाची गरज ठरविता येते. हंगामानुसार व्यवसायाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्याही विचारात घेऊन भांडवलाचा अंदाज बांधावा लागतो.

शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाल्यानंतर पुढील कार्यासाठी भांडवलाची पूर्तता करणे आवश्यक आहे. कंपनीसाठी किती भांडवल लागेल याविषयी अंदाज करण्यासाठी अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. शेतकरी उत्पादक कंपनी कोणत्या पिकावर काम करते तसेच किती प्रमाणात प्रक्रिया व विक्री व्यवस्था नियोजन करते यावरून व्यवसायाचे स्वरूप लक्षात येते. त्यावरून भांडवलाची गरज ठरविता येते. हंगामानुसार व्यवसायाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्याही विचारात घेऊन भांडवलाचा अंदाज बांधावा लागतो. यासाठी व्यवसायाचे स्वरूप, बाजार परिस्थिती, साठवण व्यवस्था, पीक उत्पादनाविषयी कंपनीचे धोरण, प्रक्रियेसाठी कच्च्या मालाची गरज, साठवणगृहाचे नियोजन व निर्बंध, कंपनीचे एकूण उत्पादन व अंदाजे वार्षिक उलाढाल, कंपनीची कार्यपद्धती आणि कंपनीच्या मालमत्तेची देखभाल या सर्व विषयांचा आढावा घ्यावा. या घटकांवरून कंपनीला किती भांडवल लागेल याचा अंदाज मिळू शकेल.

भांडवलाचा अंदाज ठरवताना महत्त्वाचे -

 • व्यवसायाचे स्वरूप
 • हंगामनिहाय कार्यपद्धती
 • उत्पादनाचे धोरण
 • बाजार परिस्थिती
 • कच्च्या मालाचा पुरवठा
 • साठवण व्यवस्था
 • उत्पादन आणि उलाढाल
 • कंपनीची कार्यपद्धती
 • मालमत्तेची देखभाल

उद्योगासाठी व्यावहारिक बाबी ः
कंपनीचा उद्योग सुरू करताना प्रामुख्याने त्यात गरजेनुसार वित्तपुरवठा, वित्तपुरवठ्याची साधने यांचा विचार करावा. कंपनीच्या मालासाठी ग्राहक कोणते व त्यांच्याकडून किती मागणी आहे, याचाही अंदाज सर्वेक्षणामधून मिळवावा. या अंदाजानुसार कंपनीच्या उत्पादनाचे नियोजन करावे. कंपनीचे व्यवहार करताना कंपनी कायद्याचे तंतोतंत पालन करण्याची दक्षता घ्यावी. कंपनीतर्फे सद्य:स्थितीत चालू असलेले प्रकल्प व त्यांची बाजाराशी जोडणी या बाबी अत्यंत काटेकोरपणे तपासून निर्णय घेण्याची गरज असते. कंपनीसाठी भांडवल उभे केल्यानंतर त्याचे नियोजन करताना भांडवलाची किंमतसुद्धा विचारात घ्यावी लागते. वेगवेगळ्या माध्यमातून भांडवल उभे करताना प्रत्येक टप्प्यावर त्यासाठी खर्च येतो. तो खर्च म्हणजे भांडवल उभे करण्याची किंमत होय.

बाजार व्यवस्थेचा अभ्यास ः
शेतकरी उत्पादक कंपनीसाठी बाजार व्यवस्थेचा अभ्यास करावा. तेथील पुरवठा, मागणी यावरून आपल्या उत्पादनाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक असते. परिसरातील उपलब्ध कृषी उत्पादन कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्यासोबत आगाऊ करार करावेत. माल तयार झाल्यानंतर विक्रीसाठी धावपळ करण्याची गरज भासत नाही. शक्यतो कंपनीने स्वतःचा प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याचा प्रयत्न करावा. अशाप्रकारे उत्पादित मालाच्या विक्रीसाठी बाजारात स्टॉल उपलब्ध करून घ्यावेत. बाजारपेठ वाढविण्यासाठी इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक कमिशन यांच्याकडून परवाना घेतल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रॉनिकली जगात कुठेही माल विकता येतो. बाजार व्यवस्था करण्यासाठी गरज पडल्यास वेगवेगळ्या साधनातून कर्जाची उपलब्धता, मालाचे उत्पादन वाढवून योग्य बाजार मिळवावा. उत्पादनांच्या विक्रीसाठी अन्नसुरक्षेसंदर्भात एफएसएसएआय (Food Safety and Standards Authority of India-FSSAI) कडून परवाना घेणे आवश्यक आहे.

आर्थिक नियोजन ः

 • शेतकरी उत्पादक कंपनीचे आर्थिक नियोजन साधारणतः तीन टप्प्यांमध्ये करावे लागते. सगळ्यात पहिला टप्पा सुरवातीला आर्थिक स्थिरता येईपर्यंत असतो. या टप्प्यात प्रामुख्याने कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर खर्च करावा लागतो. सोबतच कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या व्यक्ती विकासावर भर देण्यासाठी अनुदान उपलब्ध करावे. त्यातून कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवून व्यक्ती विकासाबरोबरच कंपनी आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होण्यास मदत होते.
 • दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वसाधारण उद्योग वाढीसाठी प्रयत्न करावे लागतात. यासाठी आर्थिक तरतूद म्हणून सभासदांकडून समभाग वाढविणे. कंपनीच्या वाढीसाठी खेळते भांडवल तयार करणे हे आवश्यक आहे. या टप्प्यांमध्ये खेळते भांडवल हाताशी असणे महत्त्वाचे आहे. उद्योगाच्या वाढीसाठी या टप्प्यामध्ये धडपड करावी लागते.
 • तिसऱ्या टप्प्यामध्ये उद्योग परिपक्वतेच्या बिंदूपर्यंत पोचतो. या वेळेस आर्थिक नियोजन म्हणून मुदत कर्ज घेणे किंवा कर्जातून भांडवल उभे करणे आवश्यक असते. यामुळे शेतकरी उत्पादक कंपनी परिपक्वतेच्या दिशेने वाटचाल करून स्थिर होते.

इतर कृषी सल्ला
कृषी सल्ला : बीटी कापूस, सोयाबीन, मूग,...या वर्षी पावसाचे आगमन उशिरा झाले असले तरी काही...
गाजरगवत निर्मूलनासाठी नियमित सामुदायिक...पडीक जमिनी, मोकळ्या जागा, रस्त्याच्या कडा या...
पावसाचे प्रमाण कमी होत जाणारपालघर, नंदूरबार, धुळे, जळगाव नाशिक व विदर्भातील...
पावसाच्या खंड काळात घ्यावयाची काळजीपिकांची उगवण झाल्यावर सर्वसाधारण १५ ते २०...
पूरग्रस्त द्राक्षवेलीची मुळे कार्यरत...सांगली जिल्ह्यातील द्राक्ष विभागामध्ये जास्त...
कार्यक्षमता वाढवण्यासाठी तणनाशकांसोबत...बहुतेक शेतकरी बंधू पावसाळ्यात पावसाची शक्‍यता...
पीक फेरपालटाद्वारे जपा जमिनीची सुपीकता महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही कोरडवाहू असून,...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...
सोयाबीनवरील किडींचे नियंत्रण व्यवस्थापनसध्या स्थितीत सोयाबीन पिकावर तुरळक स्वरूपात...
अजैविक ताणाविरोधी लढाईत जैवसंप्रेरके...पुणे येथे द्राक्ष बागायतदार संघ महाअधिवेशन ३ ते ५...
पाणी साचलेल्या द्राक्षबागांसाठी...द्राक्ष लागवडीखाली असलेल्या क्षेत्रात गेल्या...
फळगळचे नेमके कारण जाणून करा योग्य... एकूण फळागळीमध्ये ७० ते ८० टक्के फळे ही...
तणनियंत्रण पद्धतींचा विकास हाताने तण उपटून टाकण्यापासून सुरू झालेला हा...
तणांचे आच्छादन हा सर्वोत्तम पर्याय तणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतानाच तणांचे...
गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी एकात्मिक...गुलाबी बोंड अळ्यांना खाण्यासाठी व पतंगाना अंडी...
तणनिर्मूलनाचा थोडक्यात इतिहास माणसाने शेतीला सुरवात केल्यानंतर काही काळात अन्य...
आडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...
कृषी सल्ला : ज्वारी, सोयाबीन ज्वारी      रोप अवस्था...
शेतकरी उत्पादक कंपनीची ओळख, उद्दिष्टे मागील भागापर्यंत आपण गटशेती कशी करावी, याची...