agricultural stories in Marathi, farmers planning of Onion crop | Page 3 ||| Agrowon

शेतकरी नियोजन पीक : कांदा

मुकुंद पिंगळे
बुधवार, 28 जुलै 2021

माझी धोडंबे (ता. चांदवड) येथे एकूण ६.५ एकर शेती आहे. त्यामध्ये कांदा, सोयाबीन, कांदा, टोमॅटो, भुईमूग ही पिके खरीप हंगामात घेतो. त्यापैकी कांदा हे मुख्य पीक असते. प्रामुख्याने ४ एकर क्षेत्रावर खरीप हंगामात पोळ कांदा लागवडीचे दरवर्षी नियोजन करत असतो.

शेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर
गाव : धोडंबे, ता. चांदवड, जि. नाशिक
एकूण क्षेत्र : ६.५ एकर
कांदा लागवड क्षेत्र : ४ एकर

माझी धोडंबे (ता. चांदवड) येथे एकूण ६.५ एकर शेती आहे. त्यामध्ये कांदा, सोयाबीन, कांदा, टोमॅटो, भुईमूग ही पिके खरीप हंगामात घेतो. त्यापैकी कांदा हे मुख्य पीक असते. प्रामुख्याने ४ एकर क्षेत्रावर खरीप हंगामात पोळ कांदा लागवडीचे दरवर्षी नियोजन करत असतो.

घरगुती कांदा बीजोत्पादन :
दरवर्षी खरीप कांदा लागवडीसाठी कांदा बीजोत्पादनाचे नियोजन केले जाते. त्यासाठी खरीप कांदा निघाल्यानंतर दरवर्षी निवड पद्धतीने कांदे काढून डेंगळे लागवड केली जाते. त्यापासून सरासरी २५ किलो बियाणे तयार होते. त्याचा वापर कांदा रोपवाटिका तयार करण्यासाठी मी करत असतो. चालू सप्ताहाच्या सुरुवातीला १० किलो बियाणे टाकले आहे.

शास्त्रीय पद्धतीने रोपवाटिका :
लागवडीसाठी रोपांची योग्य वाढ झाली पाहिजे. रोपांची अतिवाढ होऊन न देता ती मध्यम हवी.
रोपांची काडी परिपक्व व निरोगी हवी. त्यांच्या मुळांची चांगली वाढ झालेली असावी. या अनुषंगाने रोपवाटिकेचे नियोजन केले जाते. कांदा लागवडीत दर्जेदार रोप हा महत्त्वाचा घटक असतो. त्यावरच पिकाची रोगप्रतिकारक शक्ती, वाढ व आगामी उत्पादन अवलंबून असल्याने त्यावर मुख्य लक्ष केंद्रित करून रोपनिर्मिती करण्याकडे कल असतो. घरगुती लागवड करून उर्वरित रोपांची मी विक्री करतो.

रोपवाटिकेसाठी जमीन निवड :

कांदा रोपवाटिकेचे नियोजन काळ्या व हलक्या जमिनीत करतो. ही जमीन उताराची पाण्याचा निचरा होणारी आहे. यामुळे पावसाचे पाणी वाफ्यात साचत नाही. योग्य पाणी निचरा होण्यासाठी ३ फूट बाय २० फूट आकाराचे सपाट वाफे तयार केले आहेत. रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या ज्वारी, हरभरा या क्षेत्रावर ही रोपवाटिका असते.

व्यवस्थापनातील प्रमुख बाबी :

  • रोपवाटिका तयार करताना वाफ्यांमध्ये बियाणे टाकण्यापूर्वी निंबोळी पेंड २५ किलो आणि ट्रायकोडर्मा १ किलो यांचे मिश्रण वापरतो.
  • मूळकूज, शेंडा करपा नये यासाठी रासायनिक बुरशीनाशकांची मात्रा चोळली. त्यानंतर ट्रायकोडर्माचीही बीजप्रक्रिया हलक्या हाताने केली जाते. नंतर बियाणे सुकवून वाफ्यांमध्ये वापरले जाते.
  • पावसाळ्यात बियाणे अंकुरल्यानंतर वाफसा पद्धतीनेच रोपवाटिकेला पाणी दिले जाते. साधारण पाण्याच्या ४ ते ५ पाळ्या दिल्या जातात. मात्र पाऊस असताना त्यापूर्वी अंदाज घेतला जातो.
  •  बीजप्रक्रियेमुळे बहुतांश रोगांचा प्रादुर्भाव रोखला जातो. तरीही रोपांचा पिवळेपणा, शेंडे मर, जमिनीतील हानिकारक बुरशीमुळे होणारी मर, मुळकूज या रोगासह किडीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष ठेवतो. आवश्यकतेनुसार नियंत्रणाच्या उपाययोजना करतो.
  • रासायनिक खतांचा मर्यादित वापर करतो.

पुढील नियोजन :

  •  दररोज रोपवाटिका पाहणी करून रोग व कीटक निरीक्षण व त्यानुसार उपाययोजना
  •  पाऊस आल्यानंतर वाफ्यात पाणी साचून मूळकूज होऊ नये यासाठी पाण्याचा निचरा करण्याकडे लक्ष ठेवणे.
  •  अलीकडे जैविक घटकांची आळवणीवर भर देतो. त्यातही रोपांच्या पांढरी मुळांची वाढ होण्यासाठी प्रयत्न करतो.
  • रोप टाकल्यानंतर ४० दिवसांत रोपांची पुनर्लागवड नियोजन आहे.

नंदकुमार उशीर, ९८५०८५५७५१
(शब्दांकन : मुकुंद पिंगळे)


इतर ताज्या घडामोडी
वसुंधरेला धनधान्याने समृद्ध करा ः...दापोली, जि. रत्नागिरी ः शेती करणे हे जगातील...
पीकविमाप्रश्‍नी चूल बंद आंदोलनाला...निफाड, जि. नाशिक : तालुक्याच्या पूर्व भागात दोन...
‘कादवा’ करणार सीएनजी निर्मिती ः अध्यक्ष...नाशिक : साखर उद्योग मोठ्या अडचणीतून मार्गक्रमण...
मेघोली तलाव फुटून शेतीचे नुकसानकोल्हापूर ः मेघोली (ता. भुदरगड) येथील लघू तलाव...
नगर, शेवगाव, पाथर्डीत पावसाने नुकसाननगर ः शेवगाव, पाथर्डी, नगर तालुक्यांत दोन...
खडकपूर्णा प्रकल्पाचे तीन गेट उघडले बुलडाणा ः मराठवाड्यात होत असलेल्या पावसाचा फायदा...
पीकविमा न देणाऱ्या ११ बँकांवर कारवाईजळगाव ः जिल्ह्यात सुमारे दहा हजार शेतकऱ्यांनी...
डॉ. आढाव, रावल यांना आबासाहेब वीर...सातारा : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव...
मराठवाड्यात ६७ मंडळांत अतिवृष्टीऔरंगाबाद : कायम लहरीपणाचा परिचय देणारा पाऊस...
कपाशी, मिरची पिकांत वाढली ‘मर’औरंगाबाद : पावसाची उघडीप मिळाली असताना आता...
सरकारकडून तिसऱ्या लाटेचा बाऊ ः...नागपूर : राज्य सरकार स्वतःचे अपयश लपविण्यासाठी...
यंदाही बैलपोळा सण साजरा होणार की नाही?अकोला ः गेल्यावर्षात कोरोना निर्बंधामुळे पोळा...
चालते-बोलते विद्यापीठ काळाच्या पडद्याआडपुणे : डॉ. ज्ञानदेव हापसे हे ऊस विज्ञानाचे चालते-...
रब्बी पीक प्रात्यक्षिक अर्जाला आजपासून...हिंगोली : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (अन्नधान्य...
निकृष्ट साहित्य मारले शेतकऱ्यांच्या माथीनागपूर ः गैरप्रकारांना चाप बसावा याकरिता थेट...
सोलापूर : भाजीपाल्यांचे दर दबावाखालीसोलापूर : आधीच पावसाने प्रदीर्घ विश्रांती...
कोल्हापुरात भाज्यांचे दर आठवड्यात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या सप्तहापासून...
सिमला मिरची पाच, टोमॅटो चार रुपये किलोनगर : नगरसह जिल्हाभरातील बाजार समित्यांत टोमॅटोला...
सांगली : उत्पादन खर्च वाढला,...सांगली : आठवडा बाजार सुरू झाले आहेत, पण व्यवहार...
सातारा : टोमॅटो, ढोबळी, घेवड्याच्या...सातारा : जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी, सध्या...