agricultural stories in Marathi, farmers planning, pomegranate | Agrowon

शेतकरी नियोजन - डाळिंब

सुदर्शन सुतार
गुरुवार, 22 जुलै 2021

गेल्या तीन वर्षांपासून दिनेश लेंगरे हे डाळिंबाची निर्यात करतात. दरवर्षी मृग बहर धरतात. या वर्षीही ६ जूनला पानगळ करून मृग बहर धरला आहे. बाग सध्या सेटिंग अवस्थेत आहे.

शेतकरी ः दिनेश सीताराम लेंगरे
गाव ः खुपसंगी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर
एकूण क्षेत्र ः ३० एकर
डाळिंब क्षेत्र ः ४ एकर

 

खुपसंगी (ता. मंगळवेढा) येथे माझी ३० एकर शेती आहे. त्यात चार एकर डाळिंब, दोन एकर आंबा, एक एकर लिंबू, एक एकर पपई, एक एकर ढोबळी मिरची आणि अन्य क्षेत्रावर अन्य पिके आहेत. गेल्या तीन वर्षांपासून मी डाळिंबाची निर्यात करतो. दरवर्षी मृग बहर धरतो, या वर्षीही ६ जूनला पानगळ करून मृग बहर धरला आहे. बाग सध्या सेटिंग अवस्थेत आहे. पण सततच्या पावसामुळे अडचण येते आहे.

गत दहा दिवासांतील काम

  •  बाग सध्या सेटिंग अवस्थेत आहे. या कालावधीत बागेला पाण्याची गरज असते, पण सध्या सातत्याने पाऊस पडत असल्याने पाण्याची फारशी गरज नाही. तरीही गेल्या दहा दिवसांत एक दिवसाआड तासभर गरजेनुसार पाणी दिले.
  •  वातावरणातील सततच्या बदलामुळे कुजवा, खोडकीड रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यासाठी फवारणी करून घेतली.
  • फवारणी करताना रासायनिक आणि जैविक घटकांची फवारण्या समतोल सांभाळतो.
  • साधारणपणे या कालावधीत खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्याच्या प्रतिबंधासाठी खोडाला बोर्डो पेस्ट लावून घेतली.

पुढील वीस दिवसांतील काम

  • बाग सेटिंग अवस्थेत असल्याने रासायनिक आणि सेंद्रिय खताचा डोस देत आहे. त्यात प्रति झाड सूक्ष्म अन्नद्रव्ये, निंबोळी पेंड प्रत्येकी एक किलो या सोबत २५० ग्रॕम गांडूळ खतही देणार आहे.
  • बागेतील तणनियंत्रणासाठी तणनाशकाची फवारणी करण्यापेक्षा ब्रशकटरचा वापर करण्याचे नियोजन आहे.
  •  खोडावरच्या अतिरिक्त फुटी काढून घेणार आहे. त्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी घेणार आहे.
  • त्यानंतर ०ः५२ः३४ आणि ०ः६०ः२० ही दोन्ही खते एक दिवसाआड दोन किलो प्रमाणात देणार आहे.
  • या काळात कुजव्याचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी निरीक्षण करत राहून आवश्यक त्या बुरशीनाशकांची फवारणी करावी लागेल.
  •  दर आठवड्याला प्रति एकर २०० लिटर पाण्यातून जिवामृत सोडतो. त्यासाठी जिवामृत तयार करण्याची साखळी बसवली आहे.

संपर्क ः दिनेश लेंगरे, ९८२२६४००८८
(शब्दांकन ः सुदर्शन सुतार)


इतर ताज्या घडामोडी
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...