agricultural stories in Marathi, feed management in fishery | Agrowon

मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर महत्त्वाचा...

रामेश्‍वर भोसले, मनियार मसुद मुक्तार
सोमवार, 8 नोव्हेंबर 2021

माशांच्या संवर्धनासाठी लागणारे नैसर्गिक खाद्य हे प्रामुख्याने वनस्पती प्लवंग आणि प्राणी प्लवंगामध्ये उपलब्ध असते. बाजारपेठेतील उपलब्धता आणि खाद्याचा आकार यावर कृत्रिम खाद्याचे दर अवलंबून असतात. शिफारशीनुसार मत्स्यखाद्याचा वापर करावा.

माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज असते. मत्स्यपालनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा सकस आहार दिला जातो. मत्स्यपालनामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे खाद्य दिले जाते. एक म्हणजे कृत्रिम खाद्य आणि नैसर्गिक खाद्य.

कृत्रिम खाद्य ः
 हे खाद्य वेगवेगळ्या अन्नधान्यापासून बनवले जाते. उदाहरणार्थ, शेंगदाणा पेड, सोयाबीनची पेड, साळीचा कोंडा, सरकी पेंड इत्यादी. या सर्वांचे मिश्रण करून कृत्रिम खाद्य बनवले जाते.
नैसर्गिक खाद्य ः
 हे खाद्य पाण्यामध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध असते. नैसर्गिक खाद्य हे प्रामुख्याने दोन प्रकारामध्ये विभागलेले आहे. एक म्हणजे वनस्पती प्लवंग आणि दुसरे प्राणी प्लवंग.
 वनस्पती प्लवंग म्हणजे शेवाळ. सूर्यप्रकाशाचा वापर करून प्रकाशसंश्लेषण क्रियेने तयार व स्वत:चे अन्न स्वत: बनवतात. त्याची वाढ ही नैसर्गिक रित्या पाण्यामध्ये होते.
 प्राणी प्लवंग नैसर्गिकरीत्या उपलब्ध असते. यांच्या प्रजाती खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यापैकी मोजक्याच प्रजाती हे माशांचे खाद्य म्हणून वापरले जाते. जसे की डॅफनिया, मोईन आणि रोटिफेर, इत्यादी.
 माशाच्या वाढीसाठी प्राणी प्लवंग हा खूप महत्त्वाचा घटक आहे, कारण जेव्हा माशांच्या पिलाचा जन्म होतो तेव्हा ते प्रथम प्राणी प्लवंग खातात.
 माशांची वाढ वेगवेगळ्या टप्यांमध्ये होते, उदाहरणार्थ, मत्स्य जिरे, अर्ध बोटुकली आणि बोटुकली. या सर्व टप्यांमध्ये नैसर्गिक खाद्याचा खूप महत्त्वाचा वाटा आहे.
 मत्स्य बोटुकली पुढील मत्स्यसंवर्धनासाठी वापरली जाते. या वाढीच्या काळामध्ये मत्स्य बीज हे खूप महत्त्वाचा व नाजूक काळ समजला जातो. कारण मत्स्य बीज हे खूप लहान असतात. त्यामुळे मत्स्यबीजाची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते.

पाणी आणि खाद्याचे व्यवस्थापन ः

  •  पाणी व्यवस्थापनामध्ये पाण्याचे गुणधर्म तपासणी करणे गरजेचे असते. उदाहरणार्थ, पाण्याचा सामू, वायुमिश्रण,जडपणा, अमोनिया इत्यादी, महत्त्वाचे घटकांची तपासणी करणे गरजेचे असते.
  •  खाद्याच्या व्यवस्थापनामध्ये कृत्रिम खाद्य हे खूप महाग असते. बाजारपेठेतील उपलब्धता आणि खाद्याचा आकार यावर दर अवलंबून असतात. या खाद्यामुळे काही वेळा माशांच्या टाकीतील आणि मत्स्य तळ्यातील पाणी खराब होते.त्यामुळे मत्स्य बीज मरतूक हे मोठ्या प्रमाणात होते.
  •  नैसर्गिक खाद्य खूप उपयुक्त ठरू शकते. तर त्यातील काही महत्त्वाचे प्राणी प्लवंग आपण आपल्या घरी किंवा मत्स्य तळ्यामध्ये तयार करू शकतो जसे की, डॅफनिया, मोईन आणि रोटिफेर. इत्यादी.

नैसर्गिक खाद्याचे महत्त्व ः
१. मत्स्य प्रजातींची वेगाने वाढ होते.
२. खाद्य खाण्याची कार्यक्षमता वाढते.
३. नैसर्गिक खाद्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्व आणि खनिज स्रोत मोठ्या प्रमाणात आहेत.
४. माशांना चवीसाठी चांगले आहे. माशांच्या पिलांच्या वाढीसाठी चांगले असते.
५. नैसर्गिक खाद्यामुळे टाकी किंवा तळ्यातील पाणी स्वच्छ राहते.
६. नैसर्गिक खाद्य निर्मिती करणे खूप सोपे आहे.

मत्स्यपालनात नैसर्गिक खाद्याचा वापर आणि आकार
नैसर्गिक खाद्य आकार (मायक्रो. मी)

रोटीफर्स ५० - २००
डाफ्निया  २००- ४००
मोइना  ४०० – १०००

नैसर्गिक खाद्यांमधील पौष्टिक रचना ( टक्के)
प्रथिने  ४५-७०
मेद  ११-२७
कर्बोदके- १५-२०
ओलावा  ८५-९५

नैसर्गिक खाद्य उत्पादन करण्याच्या पद्धती ः
प्लॅस्टिक टाकी किंवा सिमेंट टाकी

१) या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टाक्यांचा वापर करून नैसर्गिक खाद्य तयार करता येऊ शकते.
२) साधारणपणे ५० ते २००० लिटरपर्यंत पाणी साठवता येते. त्यानंतर आपण कोणतेही एक नैसर्गिक खाद्य निवड करून त्यामध्ये ५ नंबर प्रति मिलि लिटर प्रमाणे साठवणूक करावी किंवा हिरवे पाणी त्या टाकीमध्ये १० ते १५ लिटर पाणी मिसळावे. त्यानंतर दिवसातून दोन वेळेस खाद्य म्हणून बेकरी यीस्ट अर्क कोमट पाण्यात मिश्रण करून पाण्यामध्ये टाकावे. असे ५ ते १० दिवस केल्यानंतर त्या टाकीमध्ये लहान प्राणी प्लवंग तयार होतात. त्यानंतर त्यामधून ५० टक्के प्राणी प्लवंगाची काढणी करून माशांच्या पिलांना खाद्य म्हणून वापरावे.
३) दर १०-१५ दिवसांनी २० टक्के पाणी काढून नवीन पाणी सोडावे. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता चांगली राहते.

मत्स्य तलावातील नैसर्गिक खाद्य निर्मिती ः
१) नैसर्गिक खाद्यनिर्मिती तलावामध्ये करता येते, पण यासाठी काटेकोरपणे व्यवस्थापनाची गरज आहे. त्यासाठी तलावाची पूर्व तयारी करणे गरजेचे आहे.
२) तलावाला पूर्णपणे वाळवून घ्यावे. त्यामध्ये चुना टाकावा. त्यानंतर पाणी सोडून, ब्लिचिंग पावडर पसरावी.
३) ही सर्व कामे झाल्यानंतर ५ ते १० दिवसांनी त्यामध्ये काही रासायनिक खतांचा वापर करणे गरजेचे असते. जसे की ताजे शेण चाळणीने गाळून टाकावे. (१० ग्रॅम प्रति लिटर)
४) त्याच प्रमाणे कोंबडीची विष्ठा हे देखील फायदेशीर ठरू शिकते.(१ किलो / मी ३). त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात दुपटीने खताचा वापर करावा.
५) डाफ्निया, रोटिफेर आणि मोईन या प्रजातीचे बीज काही प्रमाणात सोडून संवर्धन करता येते. अशा पद्धतीने केले, तर १५ दिवसांनंतर १० ते २० नंबर प्रति लिटर प्रमाणे वाढ होते. त्यानंतर त्यामधून ५० मायक्रॉनच्या जाळीने काढून मत्स्य खाद्यासाठी वापर करावा.

नैसर्गिक खाद्यनिर्मितीसाठी पाण्याची गुणवत्ता
सामू : ६.५ ते ८.५
प्राणवायू  : २ ते ५ मिलिग्रॅम / लिटर
तापमान  : १८ ते २४ डिग्री सेल्सिअस
पाण्याचा जडपणा : २५० मिलिग्रॅम / लिटर
पोटॅशियम  : <३९० मिलिग्रॅम / लिटर
मॅग्नेशिअम   :  ३० ते २४० मायक्रो ग्रॅम / लिटर
अमोनिया :  <०. २ मिलिग्रॅम / लिटर
प्रकाश कालावधी  : १०-२० तास

रामेश्‍वर भोसले, ९८६०७२७०९०
(संशोधन विद्यार्थी, मत्स्य महाविद्यालय व संशोधन संस्था, थुतुकुडी, तामिळनाडू)
मनियार मसुद मुक्तार, ९९६०९८६८६७
(प्रकल्प सहयोगी, कांदळवन प्रतिष्ठान, महाराष्ट्र

भारत, अमेरिका


इतर कृषिपूरक
कुक्कुटपालनासाठी शास्त्रोक्त पद्धतीचे...आहाराच्या दृष्टीने विचार केला तर कोंबड्याच्या...
शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये संधी...शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने...
पशुआहारात तंतुमय पदार्थांचे महत्त्वपशूआहारातील तंतुमय पदार्थांमुळे जनावरांच्या...
शेळ्यांमधील सांसर्गिक प्लुरोन्युमोनियाज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो, कोंदट व दमट...
हिवाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापनकोंबड्यामध्ये विषाणूजन्य, जिवाणूजन्य, प्रजीवजन्य...
शेळ्या-मेंढ्यांमधील थायलेरिओसिसरोगग्रस्त जनावरांना गोचीड रक्त शोषण्यासाठी चावतात...
शेळ्या, मेंढ्यांमधील अगॅलेक्शियाअगॅलेक्शिया आजारामुळे शेळ्या, मेंढ्यांचे दूध देणे...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
टाळा जनावरांची विषबाधा...​ज्वारीच्या कोवळ्या धाटांची विषबाधा जनावरांनी...
संकल्प करूया देशी गोवंश संवर्धनाचा...सुजाण पिढीने आपल्या देशी गोवंशाचे माहात्म्य...
मूल्यवर्धित चारानिर्मिती तंत्रपावसाळ्यानंतर कोकणात हिरव्या चाऱ्याची टंचाई असते...
कालवडीतील प्रजनन संस्थेचे महत्त्व..अधिक दुग्धोत्पादनाकरिता दुधाळ जनावरांतील विशेषतः...
जाणून घ्या शोभिवंत माशांना बाजारपेठेत...भारतामध्ये शोभिवंत मासे संवर्धन आणि पालनासाठी...
बैलामधील खांदेसूजीवर उपाययोजनाशेतीकामामध्ये बैलांकडून जास्त प्रमाणात काम करून...
लाळ्या खुरकूत आजाराचा वाढतोय प्रसारज्या जनावरांच्या पायाच्या खुरी दुभंगलेल्या आहेत,...
आजार टाळण्यासाठी वेळीच लसीकरण गरजेचे...जनावरांतील औषधोपचारापेक्षा लसीकरणाचा खर्च कमी आहे...
कार्प माशांच्या बीजांचे संगोपनमाशांचे निरंतर उत्पादन वाढविण्यासाठी योग्य...
गाईसाठी योग्य आकारमानाचा गोठागोठ्यामध्ये जनावरांसाठी साधारणपणे किती जागा असावी...
गाई,म्हशींच्या संक्रमण काळातील आहार...संक्रमण काळ हा दुभत्या जनावरांच्या आयुष्यातील...
रेबीज बद्दल जागरूक रहा रेबीज हा उष्ण रक्ताच्या प्राण्यांचा, विषाणूद्वारे...