agricultural stories in Marathi, First global estimate of importance of pollinators for seed production in plants | Agrowon

परागवाहकांचे जैवविविधता संवर्धनातील जागतिक महत्त्व अधोरेखित

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

परागवाहकांशिवाय फुले येणाऱ्या वनस्पतींपैकी तिसरी वनस्पती ही बियांच निर्माण करू शकणार नाही आणि अर्ध्या वनस्पतींचे फलनामध्ये ८० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक घट होण्याची शक्यता दक्षिण आफ्रिकेतील स्टेल्लेनबोश विद्यापीठामध्ये झालेल्या संशोधन निष्कर्षात व्यक्त करण्यात आली आहे.

परागवाहकांशिवाय फुले येणाऱ्या वनस्पतींपैकी तिसरी वनस्पती ही बियांच निर्माण करू शकणार नाही आणि अर्ध्या वनस्पतींचे फलनामध्ये ८० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक घट होण्याची शक्यता दक्षिण आफ्रिकेतील स्टेल्लेनबोश विद्यापीठामध्ये झालेल्या संशोधन निष्कर्षात व्यक्त करण्यात आली आहे. जरी स्वयंफलनाची प्रक्रिया सर्वसामान्य असली तरी त्यातून होणारी ही घट भरून काढणे शक्य होणार नाही. हे संशोधन ‘जर्नल सायन्स अॅडव्हान्सेस’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

सुमारे १.७५ लाख वनस्पती प्रजाती असून त्यातील अर्ध्या फुले येणाऱ्या आहेत. त्या आपल्या पुनरुत्पादनासाठी किंवा बिया निर्मितीसाठी बहुतांशी सजीवांवर अवलंबून आहेत. त्यामुळे परागवाहकांमध्ये होणारी घट ही नैसर्गिक परिसंस्थेची विशेषतः जैवविविधतेची मोठी हानी करू शकते. दक्षिण आफ्रिकेमध्ये स्टेल्लेनबोश विद्यापीठासह पाचही खंडातील २३ संशोधन संस्थांतील २१ शास्त्रज्ञ या अभ्यासामध्ये डॉ. जेम्स रॉजर आणि प्रो. अॅलन इल्लिस यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होते. नैसर्गिक परिसंस्थेमध्ये परागवाहकांचे जागतिक पातळीवरील महत्त्व जाणून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला.

हेल्महोल्ट्झ पर्यावरण संशोधन केंद्रातील प्रो. टिफनी नाईट यांनी सांगितले, की वनस्पती प्राणी किंवा किटक परागवाहकांवर किती प्रमाणात अवलंबून आहेत. सध्या सातत्याने पुढे येत असलेल्या परागवाहकांच्या घटत्या संख्येमुळे परागवहनावर कितपत प्रमाण होतो, याचा अभ्यास करण्यात आला. त्याच प्रकारे परागवाहकांची जैवविविधतेतील घटीमुळे जागतिक पातळीवरील वनस्पतींना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, याचाही अंदाज घेण्यात आला.

बहुतांश वनस्पती या परागवहनासाठी सजीवांवर अवलंबून आहेत, काही वनस्पतींमध्ये स्वयंफलन होते. म्हणजेच त्या फलनाच्या प्रक्रियेसाठी सजीवांवर अवलंबून नाहीत. परागवाहकांवर अवलंबून असलेल्या जागतिक पातळीवरील वनस्पतींवर परागवाहकांच्या नसण्याचा किती परिणाम होणार, याचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. या बाबत वेगवेगळ्या वनस्पती आणि परागवाहकांबाबत शेकडो संशोधने प्रकाशित झालेली आहेत. डॉ. रॉजर यांनी ‘स्टेल्लेनबोश ब्रिडिंग सिस्टिम डेटाबेस’ (sPLAT) तयार केला आहे. या GloPL डेटाबेसमध्ये कार्यरत संशोधकांमध्ये प्रो. टिफन नाईट, प्रो. टिया-लिन अॅशमन आणि डॉ. जेनेट स्टिट्स यांचा समावेश आहे. तर प्रो. मार्क व्हॅन क्लेनेन आणि डॉ. मिले राझनाजातोवो यांनी ‘कॉनस्टॅन्झ ब्रिडिंग सिस्टिम डेटाबेस’ तयार केला आहे. या अभ्यासासाठी हे तिन्ही डेटाबेस एकत्र करण्यात आले. या माहिती साठ्यामध्ये १५२८ वेगवेगळे प्रयोग, १४३ वनस्पती कुळातील ११७४ प्रजाती आणि १३९२ वनस्पती यांचा समावेश होता. यात अंटार्क्टिका सोडून अन्य सर्व खंडातील वनस्पती समाविष्ट होत्या.

हे आहेत धोके...
नुकत्याच झालेल्या अनेक अभ्यासामध्ये परागवाहकांच्या प्रजातींची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे. त्यातील काही प्रजाती तर लुप्त झाल्या आहेत. या अभ्यासामध्ये प्रामुख्याने सजीव परागवाहकांवर अवलंबून असलेल्या जंगली वनस्पती प्रजातींवर लक्ष केंद्रित केले होते. या घटत्या परागवाहकांच्या प्रजाती व संख्येचा या जंगली वनस्पती आणि त्यांच्या एकूणच नैसर्गिक परिसंस्थेवर होणारा परिणाम तपासण्यात आला. एकत्रित अभ्यासाच्या निष्कर्षातून पुढे आलेला निष्कर्ष धक्कादायक आहे.
१) परागवाहकांशिवाय फुले येणाऱ्या वनस्पतींपैकी तिसरी वनस्पती ही बियांच निर्माण करू शकणार नाही आणि अर्ध्या वनस्पतींचे फलनामध्ये ८० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक घट होण्याची शक्यता दिसते.
२) स्वयंपरागीकरण किंवा स्वयंफलन ही प्रक्रिया वनस्पतीमध्येही मोठ्या प्रमाणात दिसत असली तरी त्यातून सध्याच्या लोकसंख्येच्या अन्नांची गरज पूर्ण होणे शक्य नाही.
३) कॉनस्टॅन्झ विद्यापीठातील प्रो. मार्क व्हॅन क्लेनेन यांनी सांगितले, की जर परागवाहक या पृथ्वीवरून संपूर्णपणे नष्ट झाले तर याचा विचारच करून पहा, म्हणजे आपल्याला त्यांचे नेमके महत्त्व कळू शकेल. ज्या परागवाहकांच्या प्रजाती व त्यांची संख्या कमी झाली, त्यांचा विचार केल्यास त्यावर अवलंबून असलेल्या वनस्पतींच्या प्रजातीही आपोआप घटलेल्या दिसून येतील. या वनस्पतींवर आहार व अन्य अनेक कारणांसाठी अवलंबून असलेल्या प्राणी प्रजातींही धोक्यात येऊ शकतात. म्हणजेच नैसर्गिक परिसंस्थेतील एकूण जैवविविधताच धोक्यात येत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वाढत्या मानवी लोकसंख्येसाठी भविष्यात अन्नांची उपलब्धता हा गंभीर प्रश्न असणार आहे. दुसरा एक धोका लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे परागवाहकांवर अवलंबून नसलेल्या आणि तणांसारख्या फारशा उपयुक्त नसलेल्या वनस्पतींची संख्या वेगाने वाढू शकतात.

संशोधन प्रतिक्रिया...
१) GloOL डेटाबेस वर नियंत्रण ठेवणारे कॅनबेरा विद्यापीठातील डॉ. जोआन बेन्नेट यांनी सांगितले, की परागवाहकांवर अवलंबून असलेल्या अनेक वनस्पती सध्या घटताना दिसत आहे किंवा विलुप्त होत असल्याचा अस्वस्थ करणारी बाब सातत्याने समोर येत आहे. स्वयंफलन करणाऱ्या वनस्पतींमध्ये मध आणि पराग यांचे प्रमाणही कमी होत जाण्याचा धोका लक्षात घेतला पाहिजे.

२) डॉ. रॉजर सांगतात, की सर्वच गोष्टी इतक्या भयावह असतील असे नाही, पण आपण तयार असणे गरजेचे आहे. काही वनस्पती या दीर्घकाळ जगणाऱ्या आणि अधिक परागकण तयार करणाऱ्या राहतील, अशी आशा करू. त्या दरम्यान आपल्याला परागवाहकांची संख्या वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करता येतील. सध्या आफ्रिकेतील परागवाहकांचा माहितीसाठा फारसा उपलब्ध नाही. त्याबाबत नुकतेच काम सुरू झाले आहे. जिथे अद्याप काही प्रमाणात तरी जंगली वनस्पती आणि परागवाहक यांची जैवविविधता शिल्लक असेल, त्यातून भविष्यातील जंगली वनस्पती आणि परागवाहकांतील जैवविविधतेचे संवर्धन करणे शक्य होऊ शकेल.

 


इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...