agricultural stories in Marathi, fruit crop management in water shortage | Page 2 ||| Agrowon

फळबागांना आच्छादन, संरक्षित पाणी द्या
डॉ. आदिनाथ ताकटे
शुक्रवार, 29 मार्च 2019

सध्याच्या काळात पाणी कमतरता, सूर्यप्रकाश, गरम वारे, कोरडी हवा याचा विपरीत परिणाम नवीन लावलेल्या फळझाडांवर होत असतो. यामुळे मुख्यत्वे कोवळी फूट करपणे, खोड तडकणे, फळगळ होणे, फळांचा आकार लहान होणे, पाने,फळे गळून झाडे वाळणे, झाडांची वाढ थांबते. याकरिता पाणी आणि उपलब्ध साधनांचा कार्यक्षम वापर करावा.

 

सध्याच्या काळात पाणी कमतरता, सूर्यप्रकाश, गरम वारे, कोरडी हवा याचा विपरीत परिणाम नवीन लावलेल्या फळझाडांवर होत असतो. यामुळे मुख्यत्वे कोवळी फूट करपणे, खोड तडकणे, फळगळ होणे, फळांचा आकार लहान होणे, पाने,फळे गळून झाडे वाळणे, झाडांची वाढ थांबते. याकरिता पाणी आणि उपलब्ध साधनांचा कार्यक्षम वापर करावा.

 

उन्हाळ्यामध्ये शक्यतो ठिबक सिंचन किंवा भूमिगत सिंचन पद्धतीने थेट फळझाडांच्या मुळापाशी गरजेनुसार पाणी द्यावे. या पद्धतीत इतर प्रचलित पद्धतीपेक्षा ५० ते ६० टक्के पाण्याची बचत होते. उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ मिळू शकते. या पद्धतीमुळे झाडांच्या गरजेनुसार पाणी मोजून देता येते. पाण्याचा अपव्यय होत नाही. पाण्याबरोबर खते देता येतात, त्यामुळे खताच्या खर्चात बचत होते.
फळबागेस सकाळी अथवा रात्री पाणी दिल्यास कार्यक्षम वापर होतो. पाण्याची कमतरता असलेल्या क्षेत्रात एक आड एक सरीने पाणी द्यावे. तसेच पाणी देण्याच्या पाळीत वाढ करावी. उदाहरणार्थ एखाद्या बागेस १० दिवसांच्या अंतराने पाणी देत असाल तर पुढील पाणी १२ दिवसाने, त्यापुढील पाणी १५ दिवसाने द्यावे. पाणी देताना जमिनीचा मगदूर, तापमान आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घ्यावी.

मडका सिंचन पद्धत

  •  कमी क्षेत्रातील व जास्त अंतरावरील फळझाडांना ही पाणी देण्याची पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. या पद्धतीत लहान झाडांना साधारणतः दोन ते तीन वर्षांकरिता ५ ते ७ लिटर पाणी बसणारी लहान मडकी वापरावीत. जास्त वयाच्या मोठ्या झाडांकारिता १० ते १५ लिटर पाणी बसेल अशी मडकी वापरावीत.
  •   मडकी शक्यतो जादा छिद्रांकीत किंवा आढीत कमी भाजलेली असावीत. पक्क्या भाजलेल्या मडक्याच्या बुडाकडील बाजूस लहानसे छिद्र पाडावे व त्यामध्ये कापडाची चिंधी किंवा नारळाची शेंडी बसवावी. प्रत्येक झाडास दोन मडकी जमिनीत खड्डा खोडून बसवावीत. त्यामध्ये संध्याकाळी पाणी भरून ठेवावे. मडके पाण्याने भरल्यानंतर त्यावर झाकणी किंवा लाकडी फळी ठेवावी. त्यामुळे मडक्यातील पाणी बाष्पीभवनाने वाया जाणार नाही. या पद्धतीमुळे ७० टक्के पाण्याची बचत होते.

आच्छादनांचा वापर

  •   उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे जमिनीतून पाण्याचे अधिक उत्सर्जन होते. आच्छादनांचा वापर केल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून राहण्यास मदत होते.
  •  आच्छादनाकरिता पालापाचोळा, वाळलेले गवत, लाकडी भुसा, उसाचे पाचट, गव्हाचे काड, भाताचे तुस अशा सेंद्रिय घटकांचा वापर करावा. सेंद्रिय आच्छादनाची जाडी १२ ते १५ सें.मी असावी. सेंद्रिय स्वरूपाचे आच्छादन वापरल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.
  •  पॉलिथीन फिल्मच्या आच्छादनामुळे तणांची वाढ होत नाही. जमिनीचे तापमान नियंत्रित राहते. जमिनीत उपयुक्त जीवाणूंची वाढ होण्यास मदत होते.
  •   सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन असेल तर कालांतराने कुजून त्यापासून उत्कृष्ट सेंद्रिय खत मिळते. आच्छादनांमुळे जमिनीची धूप कमी होते, भेगा पडण्याचे प्रमाण कमी होते. आच्छादनामुळे दिलेल्या खताचा जास्त कार्यक्षमरित्या उपयोग होतो.
  •  आच्छादनामुळे उन्हाळ्यात दोन पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढविता येतो. आच्छादनांमुळे पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनातही वाढ होते.

लहान रोपांना सावली
    नवीन लागवड केलेल्या फळझाडांना पहिल्या एक–दोन वर्ष कडक उन्हापासून सरंक्षण देण्यासाठी सावली करावी. झाडाच्या दोन्ही बाजूंना ३ फूट लांबीचे बांबू रोवावेत. बाबूंना चारही बाजूने आणि मधून तिरकस असे बांबू किंवा कामट्या बांध्याव्यात. त्यावर वाळलेले गवत अंथरावे. या गवतावरून तिरकस काड्या सुतळीने व्यवस्थित बांध्याव्यात. वाळलेल्या गवताएेवजी बारदाना किंवा शेडनेटचा वापर करावा.

  -  डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
(मध्यवर्ती रोपवाटिका विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ,
 राहुरी, जि. नगर)

इतर फळबाग
द्राक्ष सल्ला : आर्द्रतापूर्ण...द्राक्षबागेतील तापमान सध्या कमी होत आहे. नाशिक,...
ढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...
डाळिंबबागेतील मररोगाची लक्षणे कसे ओळखाल...डाळिंबबागेमध्ये मररोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार...
द्राक्षवेल अचानक सुकण्याच्या समस्येवर...सध्याच्या परिस्थितीत द्राक्षबागेतील सर्व भागात...
द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशियम बारबॅटम...द्राक्षाच्या जुन्या बागांमध्ये खोडकिडीच्या...
भुरी नियंत्रणासह अन्नद्रव्य...सध्या बऱ्याच ठिकाणी तापमानामध्ये वाढ होताना दिसत...
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा...विविध संत्रा बागांमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
कॅनोपीमध्ये वाढू शकतो भुरीचा प्रादुर्भावहवामान अंदाजानुसार येत्या आठवड्यामध्ये कोणत्याही...
आंबा पिकावरील फळमाशीचे व्यवस्थापनआंबा पिकावर सुमारे १८५ किडी आढळत असल्या तरी...
द्राक्ष फुटीच्या विरळणीबरोबर कीड...येत्या आठवड्यामध्ये कोणत्याही विभागामध्ये पावसाची...
केसर आंबा व्यवस्थापन या वर्षी केसर आंबा कलमांना मोठ्या प्रमाणावर...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
फणस व्यवस्थापनफणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
कागदी लिंबू लागवडकागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड,...
द्राक्षबागेत नवीन फुटीवर किडींच्या...द्राक्ष बागेमध्ये सध्याच्या वातावरणाचा आढावा...
संत्र्यावर कोळशीचा प्रादुर्भाव, त्वरेने...सद्यस्थितीत अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांत...
फळबागांना आच्छादन, संरक्षित पाणी द्यासध्याच्या काळात पाणी कमतरता, सूर्यप्रकाश, गरम...
द्राक्षबागेत खरड छाटणीनंतर सूक्ष्म...द्राक्षबागेत या वेळी फळकाढणीचा हंगाम जोरात सुरू...