द्राक्ष पट्ट्यात बसवले पेरूचे गणित
द्राक्ष पट्ट्यात बसवले पेरूचे गणित

द्राक्ष पट्ट्यात बसवले पेरूचे गणित

सांगली जिल्ह्यातील सावर्डे (ता. तासगाव) येथील मोहन इरळे यांनी द्राक्ष पट्ट्यामध्ये पेरूची लागवड करत वेगळी वाट चोखाळली आहे. पाणी कमतरतेवर मात करण्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न सुरू आहेत. दर्जेदार पेरू उत्पादनामुळे किरकोळ व्यापारी स्वतः शेतातून पेरू तोडून नेतात. खर्च कमी होतानाच बाजारपेठेएवढा दर मिळल्याने पेरू विक्रीचेही गणितही बसविण्यात त्यांना यश आले आहे. तासगाव तालुका हा द्राक्ष आणि बेदाणा उत्पादनासाठी राज्यभर ओळखला जातो. तासगावापासून दहा कि.मी. अंतरावरील सावर्डे गावही निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकांचे, तर कुस्तीचा सांस्कृतिक वारसा सांगणारे पैलवानांचे गाव. येथील मोहन परशुराम इरळे यांच्याकडे ८ एकर शेती आहे. त्यासोबतच त्यांच्या चुलत्यांची तीन एकर शेतीही ते कसतात. त्या विषयी माहिती देताना मोहन इरळे म्हणाले, की १६ चुलतभावांसह एकूण ६० जणांचे आमचे कुटुंब होते. एकत्रित असताना वडिलांच्या काळात द्राक्ष बागेच्या लागवडीतून घराची उन्नती झाली. पुढे प्रत्येकाचे व्यवसाय वाढल्याने साधारण पंधरा वर्षांपूर्वी कुटुंब विभक्त झाले असले तरी व्यवसायात एकमेकांची भागादारी तशीच आहे. कोणतेही काम एकमेकांच्या सल्ल्याने केले जाते. त्यात मोठे काका रंगराव इरळे यांचे शेती आणि व्यवसायातील नियोजनासाठी नेहमीच मार्गदर्शन मिळते. द्राक्ष शेतीमुळे आर्थिक संपन्नता आली असली तरी द्राक्ष शेतीमध्ये अडचणीही वाढल्या आहे. त्यात पाणीटंचाई, वाढता उत्पादन खर्च यांमुळे काही प्रमाणात तरी अन्य फळबागेची लागवड करण्याचा निर्णय घेतला. कमी पाण्यावर येणाऱ्या डाळिंब आणि पेरू यापैकी प्रथम डाळिंबाची निवड करत चार एकरवर लागवड केली. मात्र, येथील वातावरण डाळिंबासाठी पोषक नाही. डाळिंबाची अपेक्षित फुगवण होत नसल्याने पुन्हा पेरू लागवडीचा निर्णय घेतल्याचे मोहनराव यांनी सांगितले. पेरू लागवडीचा निर्णय घेतल्यानंतर भिलवडी येथील चितळे यांच्या बागेत जाऊन माहिती घेतली. ते आमच्याकडून पॅकिंगसाठी बॉक्स घेत असल्याने परिचय होताच त्याचा फायदा झाला. नगर जिल्ह्यातून उत्तम दर्जाची रोपे आणून लागवड केली. या भागात पेरू लागवड कमी असल्याने पेरूच्या विक्रीचा प्रश्न होता. मात्र, आमच्या सांगली, कवलापूर, कळंबी येथील पाहुण्यांनी व्यापाऱ्यापर्यंत आमच्या पेरूची जाहिरात केली. त्यामुळे व्यापारी थेट बांधावर येऊ लागले. पेरू तोडणे, वाहतूक हे खर्च वाचले. परिणामी, बाजारापेक्षाही अधिक दर मिळाला. इरळे यांची शेती सहा एकर - पेरु ३.५ एकर - द्राक्ष उर्वरित क्षेत्रामध्ये ज्वारी, भुईमूग अशी कोरडवाहू पिके घेतात. अशी आहे लागवड पहिली लागवड - २०१२ या वर्षी आठ फूट बाय पाच फूट अंतावर तीन एकर नऊ फूट बाय पाच फूट अंतरावर - दोन एकर एका एकरात ९०० ते १००० रोपे बसतात. गेल्या वर्षी नऊ फूट बाय पाच फूट अंतरावर एक एकर क्षेत्रावर पुन्हा पेरू लागवड केली. एकरी उत्पादन खर्च ः ५० ते ६० हजार रुपये असा असतो हंगाम छाटणी - एप्रिल

  • तीन वेळा घेतला जाते बहर
  • पेरूची लागवड केल्यानंतर ११ किंवा १२ व्या महिन्यात काढणीस येतात.
  • छाटणी नंतर १० दिवसात प्रतिझाड झिंक २०० ग्रॅम, बोरॉन ५० ग्रॅम, पोटॅश २५० ग्रॅम, मॅग्नेशिअम १०० ग्रॅम, एसएसपी ५०० ग्रॅम या प्रमाणे खताचे नियोजन करतात. कळी येतेवेळी १३ः४०ः१३ या ग्रेडची खते दिली जाते.
  • फवारणी आठ दिवसांतून एकदा
  • शेंडे कट करून झाडाची उंची सहा ते सात फुटापर्यंत मर्यादित ठेवली जाते. त्यामुळे पेरू सहज काढता येतात.
  • सकाळी सहा वाजता व्यापारी शेतात येऊन आठपर्यंत पेरू काढणी पूर्ण होते.
  • कृषी प्रदर्शनात भाग घेतल्यामुळे पेरूसाठी नवीन व्यापारी, ग्राहक मिळवणे शक्य झाले.
  • एकरी उत्पादन सन २०१३....अडीच टन....२० रुपये प्रतिकिलो सन २०१४....सहा टन.....२५ ते ३५ रुपये प्रतिकिलो सन २०१५....दहा टन....२५ ते ३५ रुपये प्रतिकिलो सन २०१६....दहा टन ....२५ ते ३० रुपये प्रतिकिलो सन २०१७....दहा टन....२५ ते ३० रुपये प्रतिकिलो सन २०१८...सहा टन ....२५ ते ३० रुपये प्रतिकिलो (पाणीटंचाईमुळे उत्पादन कमी झाले.) पाण्यासाठी पाच गावे आली एकत्र पाण्याची कमतरता ही मोठीच समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी परिसरातील सावर्डे, आरवडे, चिंचणी, लोढे आणि कौलगे अशा पाच गावांनी एकत्र येत पाणी संस्था स्थापन केली आहे. लोढे तलावातून पाणी उचलून शेततळ्यात साठवतो. यासाठी आवश्यक ती पाणीपट्टी शेतकरी देतात. मात्र, गेल्यावर्षी पाऊस न झाल्याने पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे. पॅकिंगसाठी लागणाऱ्या बॉक्सची निर्मिती सन १९९० मध्ये सांगली शहरात पॅकिंग बॉक्स निर्मितीचा पहिला कारखाना उभारला. त्यानंतर इंगळे बंधूंचे बॉक्सनिर्मितीशी संबंधित लॅमिनेशन, प्रिटिंग सह एकूण पाच कारखाने सांगली परिसरात आहेत. यामध्ये द्राक्ष, पेरू अशा शेतीमालासह अन्य उद्योगांसाठी लागणारे सर्व प्रकारचे बॉक्स तयार केले जातात. मिनाक्षी यांचे शेतीकडे लक्ष

    इंगळे कुटुंबामध्ये आई श्रीमती लक्ष्मीबाई, पत्नी मिनाक्षी, मुलगा मयुर यांचा समावेश आहे. स्वतः मोहन यांचे शिक्षण अकरावी झाले असून, मयूर हा पुणे येथे स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करत आहे. सौ. मिनाक्षी यांचे शेतीमध्ये सतत लक्ष असते. बागेचा ताण, कळ्या येण्याची स्थिती, पाण्याचे नियोजन अशा अनेक बारकावे त्यांनी जाणले आहेत. पतीच्या अनुपस्थितीमध्येही शेतातील कोणतेही काम अडत नाही. मोहन परशुराम इरळे, ९९२१११५१६१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com