agricultural stories in Marathi, ginger plantation | Agrowon

आले लागवडीचे पूर्वनियोजन

अंकुश सोनावले
बुधवार, 12 जून 2019

आ ले लागवड करताना जमिनीची निवड, पूर्वमशागत, बियाणे निवड, बीजप्रकिया व पाणी व्यवस्थापन या बाबींचे योग्य शास्त्रीय पूर्वनियोजन केल्यास आले पिकाचे उत्पादन खर्च कमी करून जास्त उत्पादन घेता येते.

जमिनीची निवड

आ ले लागवड करताना जमिनीची निवड, पूर्वमशागत, बियाणे निवड, बीजप्रकिया व पाणी व्यवस्थापन या बाबींचे योग्य शास्त्रीय पूर्वनियोजन केल्यास आले पिकाचे उत्पादन खर्च कमी करून जास्त उत्पादन घेता येते.

जमिनीची निवड

 • पाण्याचा उत्तम निचरा होणारी, हलकी ते मध्यम भारी प्रकारची जमीन असावी.
 • जमिनीचा सामू ६ ते ८ दरम्यान, भुसभुशीत आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.६ ते १ टक्का एवढे असल्यास उत्तम समजावी.
 • पाणथळ, क्षारपड व चोपण जमीन आले पिकासाठी निवडू नये.
 • चुनखडीचे प्रमाण ४% पेक्षा जास्त असणारी जमीन आले पिकासाठी अयोग्य असते. यात आले पिवळे पडून वाढ खुंटते. अशा जमिनीमध्ये सुधारणा करण्यासाठी जुन्या बंधाऱ्यातील गाळ वापरावा.
 • गेल्या ३ ते ४ वर्षांत आले किंवा हळद लागवड न केलेल्या जमिनीची निवड करावी.
 • गेल्या हंगामात हरभरा, सोयाबीन, भुईमूग, कडधान्य यांसारखी द्विदल वर्गीय पिके घेतलेली असल्यास आले पिकाची वाढ जोमदार होते.
 • गेल्या हंगामात ऊस, गहू, ज्वारी, मका यांसारखी एकदल वर्गीय पिके घेतलेल्या जमिनीत आले लागवड केल्यास आले पिकाची वाढ मध्यम होते. अशा जमिनीत आले लागवडपूर्व एक ते दीड महिना आधी ताग, धैंचा, चवळी यांसारखी हिरवळीचे खतपिके घेऊन गाडून टाकावीत. अथवा सेंद्रिय खतांची मात्रा वाढवावी.

जमीन तयार करणे

 • जमिनीची खोल नांगरट शक्यतो सकाळी करावी. या वेळी पक्ष्यांचे प्रमाण अधिक असून, नांगरटीदरम्यान बाहेर पडणाऱ्या हुमणी व हानिकारक किडींच्या विविध अवस्थांचा ते फडशा पडतात.
 • नांगरटीनंतर १५ दिवस शेत तापू द्यावे. नंतर एकरी १० ट्रेलर चांगले कुजलेले शेणखत वापरून कुळवाच्या उभ्या आडव्या दोन पाळ्या द्याव्यात. पुन्हा शेत २१ ते ३० दिवस उन्हात तापू द्यावे.
 • लागवडीपूर्वी एक आठवडाभर आधी रोटॅव्हेटरने रान भुसभुशीत करून ४ फूट अंतरावर गादीवाफे ट्रॅक्‍टरच्या साह्याने तयार करावेत. गादीवाफ्याची तळाची रुंदी ४ फूट, माथा रुंदी ३.५ फूट व उंची १ फूट करून घ्यावी. त्यांची लांबी जमिनीच्या उतारानुसार १५० ते २०० फूट ठेवावी. सिंचन ठिबक किंवा सुक्ष्म तुषार पद्धतीने करणे सोपे होते.
 • लागवडीपूर्वीच १ ते २ दिवस आगोदर गादी वाफे किंवा दाताळ्याने एक फूट उंचीचे करून सावरून घ्यावेत. म्हणजे जादा पावसात पाणी साचून कंद कुज होत नाही. तसेच कंद चांगले पोसतात.

खत व्यवस्थापन

 • गादीवाफे सावरतानाच एकरी चांगले कुजलेले १ टन सेंद्रियखत किंवा गांडूळखत, २०० किलो निंबोळी पेंड वापरावे. कच्चे शेणखत गादीवाफ्यावर अजिबात वापरू नये. माती परीक्षणानुसार खताचे प्रमाण ठरवावे. हेक्टरी १२०:७५:७५ किलो अशी शिफारस असून, खतांची ५० टक्के मात्रा लागवडीवेळी, तर उर्वरित अर्धी मात्रा अडीच ते तीन महिन्यांनी मातीच्या भरणीवेळी द्यावी. नत्राची मात्रा उगवणीनंतर २ ते ३ समान हप्त्यात विभागून द्यावी.
 • माती परीक्षण अहवालानुसार विद्राव्य रासायनिक खताची मात्रा ठिबक सिंचन संचातून द्यावी.

बियाणे निवड

 • केरळ राज्यातील कालिकत येथील भारतीय मसाला पीक संशोधन केंद्राने आले पिकाच्या अधिक उत्पादनक्षम अशा काही जाती विकसित केल्या आहेत. आपल्या भागात चांगली वाढणारी जात निवडवावी.
 • ताजे आले विक्रीसाठी - यास माहिम किंवा सातारी, औरंगाबाद, छत्तीसगड, गोध्रा, उदयपुरी या अधिक तंतुमय व चवीला तिखट असणाऱ्या वाणांची लागवड करावी.
 • आले प्रकियाची असल्यास - वरदा, सुप्रभा, वायनाड, रिओ -डी- जानेरो, जमैका, मारण या सारख्या कमी तंतुमय व मांसल वाणाची लागवड करावी.
 • मागील वर्षी कंदकुज, कंदमाशीचा प्रादुर्भाव न झालेल्या क्षेत्रातील आले वेगळे काढून त्याचा बियाणे म्हणून वापर करावा.
 • बियाणे म्हणून आले निवडताना पीक सुप्तावस्थेत असताना म्हणजेच साधारणत: १ मार्च ते ३० एप्रिल दरम्यान पाने पूर्णपणे गळून गेलेली असताना व सुप्तावस्थेनंतर अंकुरण न झालेल्या क्षेत्रामधीलच आले बियाणे म्हणून निवड करावी.

: अंकुश सोनावले, ९४२०४८६५८७
(कृषी सहायक, नागठाणे, ता. जि. सातारा)


इतर कृषी सल्ला
एकात्मिक सेंद्रिय रासायनिक नियोजनाची...पन्नास वर्षांपूर्वी अन्नधान्यासाठी आयातीवर...
शेतीतंत्रामध्ये योग्य बदल आवश्यककोणत्याही पिकाच्या उत्पादनासाठी आवश्यक...
सुधारित पद्धतीने करावी बटाटा लागवडउत्तम उत्पादनासाठी बटाटा लागवडीमध्ये ठिबक किंवा...
हवामानबदलाच्या स्थितीत शेतीमध्ये बदल...सन १९५५ सालानंतर पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या...
पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी...हानिकारक पतंगवर्गीय किडींच्या बंदोबस्तासाठी...
कृषी सल्ला कोकण विभागभुईमूग    पेरणी अवस्था    भुईमुगाची लागवड...
विना नांगरण, तण व्यवस्थापनातून शेतीचे...सध्या रब्बी हंगामाला सुरुवात होत आहे. चालू वर्षी...
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
पीक व्यवस्थापन सल्ला सध्या मोठ्या प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे...
तंत्र कांदा बीजोत्पादनाचे...बीजोत्पादनासाठी निवडलेले कांदे गोल, मध्यम किंवा...
कृषी सल्ला (राहुरी विभाग)हवामान अंदाज ः पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहील....
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात - पक्व अवस्था  पुढील काही दिवस पावसाची...
फवारणीकर्त्यांची सुरक्षितता महत्त्वाचीअवजारांची निगा, फवारणी करीत असता घ्यावयाची काळजी...
रब्बी पिकांसाठी सुक्ष्मअन्नद्रव्ये...महाराष्ट्रातील जमिनींमध्ये प्रामुख्याने जस्त (३९...
बागेत डाऊनी, भुरी नियंत्रणावर लक्ष द्या...पुढील ६ ते ७ दिवस सर्वच द्राक्ष विभागांमध्ये...
द्राक्ष : रोगाच्या प्रादुर्भावाची...गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष विभागामध्ये...
रसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
तुरीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनमहाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक असलेल्या तुरीची...