मुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त
फळबाग
द्राक्षवेल अचानक सुकण्याच्या समस्येवर करा मात
सध्याच्या परिस्थितीत द्राक्षबागेतील सर्व भागात तापमानात वाढ होत आहे. बऱ्याच ठिकाणी तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले असून, आर्द्रतासुद्धा २५ टक्क्यांपर्यंत दिसून येत आहे. अशा या परिस्थितीत बागेत वाऱ्याचा वेगसुद्धा जास्त असेल, तर वेलीची पाण्याची गरज जास्त वाढते. विशेष म्हणजे नवीन द्राक्षबागेत जिथे खोड ओलांडे नुकतेच तयार झाले आहेत आणि आता मालकाडी तयार होत आहे, अशा बागेत द्राक्षवेल सुकत असल्याचे दिसून आले आहे. द्राक्षवेली सुकण्याची समस्या गंभीर असून, ही स्थिती खालील अवस्था आणि कारणांमध्ये अडचण दिसून येईल.

१) खोड ओलांडे तयार झालेले आहेत व आता मालकाडी तयार होत आहे, अशा परिस्थितीत वेल अचानक सुकताना दिसून येईल.
२) बागेमध्ये वेलीस जास्त प्रमाणात पाणी दिलेल्या बागांमध्ये वेली सुकण्याचे प्रमाण अधिक आहे. विशेषतः जिथे मोकळे पाणी दिले गेले किंवा बोद जास्त प्रमाणात भिजवला असल्यास अशा बागेत तिसऱ्या दिवशी अचानक वेल सुकायला सुरवात झाल्याचे दिसून आले.
३) हलक्या जमिनीमध्ये वेली सुकण्याचे प्रमाण हे काळ्या जमिनीच्या तुलनेमध्ये कमी आहे.
४) बागेत वेल सुकण्याचे प्रमाण ५-६ वेली पासून ५० वेली प्रति एकरपर्यंत दिसून येत आहेत.
५) अचानक सुकलेल्या वेलीची पाहणी केली असता वेलीची मुळे काळी पडलेली दिसतात. जमिनीलगत मुळीच्या कॉलर रिजनमध्ये साल काळी पडून तिथे पाणी जमा झालेले दिसले. त्या ठिकाणची साल लवकर बाहेर निघाली. यामुळे बुरशी असल्याचे निश्चित होते.
६) वेलीची काळी झालेली मुळी व पांढऱ्या मुळींचे फारच कमी किंवा नसणे यामुळे वाढत्या तापमानात वेलीमधून बाष्पोत्सर्जनाद्वारे निघून जाणारे पाणी भरून काढणे वेलींना शक्य होत नाही. एकूणच बाष्पीभवनाद्वारे जाणारे पाणी व गरज याचा ताळमेळ बसत नसल्याने सुरवातीस काही पाने सुकतात. पुढे २ ते ३ दिवसांत पूर्ण वेल सुकते.
उपाययोजना ः
१) कार्बेंडाझीम १.५ ग्रॅम अधिक इमिडाक्लोप्रीड (१७.५ एसएल) १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे वेलीभोवती ड्रेचिंग करावे. हे ड्रेचिंग हाताने खोडाच्या बुडावर विशेषतः कॉलर रिजन भागावर व्यवस्थितपणे करणे आवश्यक आहे. ड्रीपद्वारे दिलेले द्रावण खोडावरील बुरशीपर्यंत वाढत्या तापमानात पोचत नाही.
२) ज्या बागेत जास्त प्रमाणात मर आहे, अशा बागेत तिसऱ्या दिवशी पुन्हा ड्रेचिंग करावे. त्यासाठी हेक्झाकोनॅझोल १ मि.लि. प्रति लिटर हे द्रावण वापरावे. किंवा -
३) पुन्हा तिसऱ्या दिवशी टेब्युकोनॅझोल १ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे ड्रेचिंग करावे.
४) वाढत्या तापमानात काही दिवस शेंडा पिचिंग थांबवावे. झाडांची अन्नद्रव्याची गरज भागविण्यासाठी युरिया १ ते १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे सायंकाळी फवारणी करावी. सोबतच १.५ ते २.० किलो युरिया प्रति एकर प्रमाणे ड्रिपद्वारे द्यावे. असे केल्यास वेलीस ताण बसणार नाही. घडनिर्मितीकरिता संजीवकांचा वापर करता येईल.
५) सध्या वरील उपाययोजनांमुळे वेल सुकण्याच्या समस्येवर मात करता येईल, अशी अपेक्षा आहे.
६) यानंतर मात्र ठिबकद्वारे २.५ ते ३.० लिटर ट्रायकोडर्मा प्रति एकर याप्रमाणे द्यावे.
- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०- २६९५६०६०
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)
फोटो गॅलरी
- 1 of 14
- ››