agricultural stories in Marathi, grapes advice | Page 2 ||| Agrowon

द्राक्षबागेत नवीन फुटीवर किडींच्या प्रादुर्भावाकडे लक्ष ठेवा
डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. दिपेंद्र यादव
गुरुवार, 11 एप्रिल 2019

द्राक्ष बागेमध्ये सध्याच्या वातावरणाचा आढावा घेतल्यास असे दिसून येईल की, बऱ्याच भागात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. येत्या आठवड्यात काही भागात तापमान वाढून काही भागामध्ये ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता दिसून येत आहे. या आठवड्यामध्ये अधिक तापमान, दुपारी ढगाळ वातावरण व काही ठिकाणी वादळी वारे असा स्वरुपाचे वातावरण राहील. परिणामी आर्द्रता वाढून त्याचे नवीन फुटीवर चांगले परिणाम मिळण्याची संधी आहे. वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये असलेल्या बागांमध्ये करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेऊ.

१) नुकतीच खरडछाटणी झालेली द्राक्ष बाग -

द्राक्ष बागेमध्ये सध्याच्या वातावरणाचा आढावा घेतल्यास असे दिसून येईल की, बऱ्याच भागात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. येत्या आठवड्यात काही भागात तापमान वाढून काही भागामध्ये ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता दिसून येत आहे. या आठवड्यामध्ये अधिक तापमान, दुपारी ढगाळ वातावरण व काही ठिकाणी वादळी वारे असा स्वरुपाचे वातावरण राहील. परिणामी आर्द्रता वाढून त्याचे नवीन फुटीवर चांगले परिणाम मिळण्याची संधी आहे. वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये असलेल्या बागांमध्ये करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेऊ.

१) नुकतीच खरडछाटणी झालेली द्राक्ष बाग -

या बागेत सुरवातीच्या कालावधीमध्ये जास्त तापमान असल्यामुळे अडचणी कमी असतील. मात्र, जास्त तापमान व कमी आर्द्रता डोळे फुटण्याकरिती अडचणीची ठरू शकते. त्याकरिता या बागेमध्ये ओलांड्यावर पाण्याची फवारणी करणे, शेडनेटचा वापर करून वेलीवर सावली करणे या सारखी महत्त्वाची कार्यवाही फायद्याची ठरू शकेल.ज्या बागेत डोळे फुटायला सुरवात झाली आहे किंवा तीन ते चार पानांची अवस्था आहे, अशा ठिकाणी वाढत्या तापमानामध्ये मिलीबग, उडद्या व थ्रिप्स या किडींचा प्रादुर्भाव जाणवेल.

अ) मिलीबग वर नियंत्रण ठेवण्यासाठी बागेत खरडछाटणी होताच ब्युप्रोफेजीन १.२५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे संपूर्ण वेल धुतली जाईल, अशा प्रकारे फवारणी करावी. वेलीवर मिलीबगचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या परिस्थितीमध्ये पुन्हा सात दिवसांनी वरील फवारणीद्वारे झाडे धुवून घ्यावीत.मिलीबगचा जास्त प्रादुर्भाव असल्याच्या परिस्थितीमध्ये डोळे फुटल्यावर पाने एका ठिकाणी गोळा होताना दिसतील. याला मॉल फॉर्मेशन असे सुद्धा म्हटले जाते. या स्थितीमध्ये इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के एसएल) ०.४ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी घ्यावी. इमिडाक्लोप्रीडच्या फवारणीमुळे उडद्या, मिलीबग व थ्रिप्सचेही चांगले नियंत्रण मिळू शकेल.

ब) बागेत जास्त तापमान व वाढत्या आर्द्रतेच्या वेळी जेव्हा नवीन लुसलुशीत फुटी निघतात, अशा वेळी थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येतो. ही कीड पानांमधून रस शोषून घेते. परिणामी वेलींची पाने आकसल्याप्रमाणे दिसतात. या पानातील रस किंवा हरितद्रव्य कमी झाल्यामुळे वेलीमध्ये अन्नद्रव्यांचा साठ कमी होण्याची भीती असते.

थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी फवारणी

  • फिप्रोनील (८० डब्ल्यूजी) ०.६२५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी किंवा
  • इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ०.२२ ग्रॅम प्रति लिटर पाणी.

टीप ः
या बागेमध्ये लॅम्बडा सायहॅलोथ्रीनची फवारणी करणे टाळावे.

२) सबकेन होत असलेली द्राक्षबाग -

  • या बागेत मार्च महिन्यात खरड छाटणी झाली असेल. सध्या ८ ते ९ पानांच्या अवस्थेत असलेल्या या बागेत फुटींची विरळणी करणे महत्त्वाचे आहे. खरड छाटणीनंतर वेलीवरील डोळ्यावर चांगल्या तऱ्हेने सूक्ष्मघडनिर्मिती व्हावी, हा उद्देश असेल. या वेली प्रत्येक वेलीवर ७० ते ८० फुटी निघालेल्या दिसतील. या सर्वच फुटी तशाच ठेवल्यास एकही काडी आवश्यकतेप्रमाणे जाड होणार नाही. दाट कॅनोपीमुळे काडीच्या प्रत्येक डोळ्यावर आवश्यक तितका एकसारख्या तीव्रतेचा सूर्यप्रकाश न मिळाल्यास सूक्ष्मघडनिर्मितीमध्ये अडचणी येतील. ही गोष्ट लक्षात घेऊन फुटींची विरळणी महत्त्वाची असेल.
  • वेलीस मिळालेल्या प्रत्येक वर्गफूट अंतराकरिता अर्धी काडी या प्रमाणे नियोजन करून इतर काड्या किंवा फुटी कमी कराव्यात. वेलीवर ५ ते १० टक्के फुटी जास्त जोमात निघालेल्या दिसतील. या फुटी तशाच राखल्यास काडी जाड होईल व पुढील हंगामात घड मागेपुढे येतील. त्यानंतर ५ ते १० टक्के फुटी निघालेल्या उशिरा निघालेल्या व अशक्त दिसतील. इतर ७० ते ८० टक्के फुटी एकसारख्या वाढीच्या दिसतील. जास्त जोमातील व अशक्त अशा फुटी काढून टाकाव्यात. त्यानंतर एकसारख्या वाढीसाठी फुटींमधूनसुद्धा काही फुटी कमी करून घ्याव्यात. ओलांड्यावर प्रत्येक फूट ही अडीच ते तीन इंच अंतरावर राहील, याची काळजी घ्यावी.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६०६०
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

इतर फळबाग
सीताफळाचे अन्नद्रव्य, ओलीत व्यवस्थापनसीताफळाची मुळे खोलवर न जाता वरच्या थरात राहतात,...
लिची फळपिकाच्या जातीलालसर आकर्षक रंगाबरोबर आरोग्यासाठीचे फायदे लक्षात...
द्राक्षबागेत वाढीसाठी पोषक वातावरणगेल्या २-३ दिवसांपासून द्राक्ष विभागामध्ये...
द्राक्ष सल्ला : आर्द्रतापूर्ण...द्राक्षबागेतील तापमान सध्या कमी होत आहे. नाशिक,...
ढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...
डाळिंबबागेतील मररोगाची लक्षणे कसे ओळखाल...डाळिंबबागेमध्ये मररोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार...
द्राक्षवेल अचानक सुकण्याच्या समस्येवर...सध्याच्या परिस्थितीत द्राक्षबागेतील सर्व भागात...
द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशियम बारबॅटम...द्राक्षाच्या जुन्या बागांमध्ये खोडकिडीच्या...
भुरी नियंत्रणासह अन्नद्रव्य...सध्या बऱ्याच ठिकाणी तापमानामध्ये वाढ होताना दिसत...
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा...विविध संत्रा बागांमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
कॅनोपीमध्ये वाढू शकतो भुरीचा प्रादुर्भावहवामान अंदाजानुसार येत्या आठवड्यामध्ये कोणत्याही...
आंबा पिकावरील फळमाशीचे व्यवस्थापनआंबा पिकावर सुमारे १८५ किडी आढळत असल्या तरी...
द्राक्ष फुटीच्या विरळणीबरोबर कीड...येत्या आठवड्यामध्ये कोणत्याही विभागामध्ये पावसाची...
केसर आंबा व्यवस्थापन या वर्षी केसर आंबा कलमांना मोठ्या प्रमाणावर...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
फणस व्यवस्थापनफणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
कागदी लिंबू लागवडकागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड,...
द्राक्षबागेत नवीन फुटीवर किडींच्या...द्राक्ष बागेमध्ये सध्याच्या वातावरणाचा आढावा...