agricultural stories in Marathi, grapes advice | Agrowon

द्राक्षबागेत वाढीसाठी पोषक वातावरण

डॉ. आर. जी. सोमकुंवर
गुरुवार, 27 जून 2019

गेल्या २-३ दिवसांपासून द्राक्ष विभागामध्ये सर्वत्र पाऊस दिसत आहे. त्याचे प्रमाण कमी अधिक असले तरी ढगाळ वातावरण मात्र सर्वत्र दिसत आहे. यामुळे तापमानात मोठी घट झाली असून, आर्द्रतासुद्धा वाढली आहे. या सर्व वातावरणातील घटकांमुळे द्राक्षबागेत वेलीच्या वाढीकरिता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणाचे काही फायदे आणि तोटेही आहेत. तोटे कमी करताना अधिक फायदे कसे मिळवायचे, याविषयी लेखात माहिती घेऊ.

१. नवीन बाग ः-

गेल्या २-३ दिवसांपासून द्राक्ष विभागामध्ये सर्वत्र पाऊस दिसत आहे. त्याचे प्रमाण कमी अधिक असले तरी ढगाळ वातावरण मात्र सर्वत्र दिसत आहे. यामुळे तापमानात मोठी घट झाली असून, आर्द्रतासुद्धा वाढली आहे. या सर्व वातावरणातील घटकांमुळे द्राक्षबागेत वेलीच्या वाढीकरिता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणाचे काही फायदे आणि तोटेही आहेत. तोटे कमी करताना अधिक फायदे कसे मिळवायचे, याविषयी लेखात माहिती घेऊ.

१. नवीन बाग ः-

  • या बागेत वेलीवर फलधारीत काडीसुद्धा काही प्रमाणात तयार झाली असेल. यापूर्वी बागेत जास्त प्रमाणात तापमान व त्या सोबत पाण्याची कमतरता असल्यामुळे वेलींची वाढ समाधानकारक झालेली नाही. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता होती, अशा बागेत ओलांड्याचा पहिला टप्पा कसातरी पूर्ण झाला असेल. कशाबशा ४-५ काड्या त्यावर वाढवता आल्याचे चित्र आहे.
  • आता ओलांड्याचा दुसरा टप्पा तयार होण्याकरिता पोषक असे वातावरण बागेत तयार झाले आहे. पहिल्या वर्षीच्या बागेत फळ छाटणी ही ऑक्‍टोबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेता येते. अशा परिस्थितीत ओलांडा पुन्हा वाढवून तितक्‍याच काड्या तयार करता येतील. फळ छाटणीस बराच वेळ असल्यामुळे फलधारीत काडी तयार करता येईल. तेव्हा ओलांड्यावरील शेवटची फूट पुन्हा तारेवर बांधून घ्यावी. ओलांड्यावर तयार झालेल्या काड्यावर मात्र या वेळी फूट येणार नाही, याची काळजी घ्यावी. ओलांड्यावर बांधलेल्या फुटीवर निघालेल्या बगल फुटी ४-५ पाने अवस्थेत खुडून घ्याव्यात. या फुटीवर निघालेल्या बगलफुटी ३-४ पानांच्या अवस्थेत ६-बीए १० पीपीएम व युरासील २५ पीपीएम या प्रमाणात फवारणी करावी. पुढील काळात पाऊस किंवा पावसाळी वातावरण असेल, तर वेलीच्या वाढीचा जोम जास्त राहील. वाढीसाठी अशा फांदीवर मोनोपोटॅशिअम फॉस्फेट (०ः५२ः३४) किंवा सल्फेट ऑफ पोटॅश (०ः०ः५०) २-३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे अधूनमधून फवारणी करावी.

२. जुनी बाग ः

वाढीकरिता झालेल्या पोषक वातावरणामुळे जुन्या बागेतील आता वेलीचे शेंडे वाढायला सुरवात होईल. याच सोबत बगलफूटसुद्धा निघेल. म्हणजेच कॅनॉपीची दाटी या वेळी पहावयास मिळेल. ज्या बागेत सतत २-३ दिवस पाऊस झाला असेल, तिथे या दाट कॅनॉपी व कोवळ्या फुटींवर करपा, डाऊनी मिल्ड्यू व करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता असेल. यापूर्वी रोगांचा प्रादुर्भाव असल्यास त्यांचे जिवाणू/बिजाणू सुप्तावस्थेत राहिलेले असतात. ते आता कार्यान्वित होते. अशा बागेत खालील प्रकारे व्यवस्थापन करावे.

  • शेड पिंचिंग करणे.
  • बगलफुटी कमी करणे.
  • पावसानंतर नवीन व उशिरा निघत असलेल्या फुटी काढून टाकणे.
  • आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी करणे.
  •  रोगाची नुकतीच सुरुवात झालेल्या परिस्थितीत स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी करणे.
  • यावेळी काडी जुनी होत आहे. ज्या ठिकाणी काडी तळातून दुधाळ रंगाची झाली, अशा बागेत बोर्डो मिश्रणाची अर्धा टक्के प्रमाणे फवारणी सुरू करता येईल.
  • बऱ्याच बागेमध्ये यावेळी काडी परिपक्वतेची अवस्था असेल. अशा अवस्थेत काडीवर रिंग तयार झालेली असेल. काही परिस्थितीमध्ये काडीवरील एक पेरा तपकिरी रंगाचा दिसेल. तर दुसरा पांढरा व पुन्हा तिसरा पेरा तपकिरी दिसेल. यालाच इर्ग्यूलर केन मॅच्युरिटी (अनियमित काडी पक्वता) असे म्हटले जाते.
  • एप्रिल, मे महिन्यात वाढत्या तापमानात व कमी पाणी उपलब्ध असलेल्या अवस्थेत वेलीवर ताण पडतो. अशी ताणाची स्थिती असताना वेलीवर बोट्रीडिप्लोडिया नावाची बुरशी हल्ला करते. जिथे अशी स्थिती असेल तिथे शिफारशीनुसार कॉपरयुक्त बुरशीनाशकाची फवारणी करावी.

टीप ः
बुरशीनाशकांचा वापर करताना विविध देशांच्या मागणीनुसार त्यांचे एमआरएल व पीएचआय तपासावेत. त्यानंतरच शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा वापर एनआरसीच्या सल्ल्यानुसार करावा.

 


फोटो गॅलरी

इतर फळबाग
अशी करा पपईची लागवडपपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जून-जुलै, सप्टेंबर-...
नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकट घेण्याचा काळसध्या वातावरण कमी होत असून, काही ठिकाणी ढगाळ...
असे करा संत्रा बागेत आंबिया बहरासाठी खत...संत्रा-मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन...
फळबागेत आच्छादन कराफळपिकांमध्ये साधारणपणे १० अंश सेल्सिअसपेक्षा...
अशी करा नवीन द्राक्ष लागवडीची तयारीद्राक्ष लागवडीसाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे....
गारपीटग्रस्त संत्रा बागेसाठी उपाययोजनामराठवाड्यातील काही भागांसह विदर्भात पुन्हा पाऊस व...
भुरी, मिलिबग नियंत्रणासाठी उपाययोजना...सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये काही...
द्राक्ष घडांना पेपर लावतेवेळी घ्यावयाची...द्राक्ष पीक अन्य पिकांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या...
लिंबूवर्गीय फळपीक सल्लासंत्रा-मोसंबी आंबे बहराचे नियोजन या वर्षी अगदी...
असे करा नारळातील रोगांचे व्यवस्थापन कोकणसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये नारळाची...
द्राक्ष सल्लासध्याच्या स्थितीमध्ये अनेक द्राक्ष विभागामध्ये...
द्राक्ष : ढगाळ वातावरणासोबत...सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरण काही ठिकाणी ढगाळ...
लिंबूवर्गीय फळपीक सल्लाया वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस राहिला....
द्राक्षावरील स्पोडोप्टेरा, उडद्याचे असे...नाशिक आणि पुणे विभागांतील काही द्राक्ष बागांमध्ये...
जुन्या बागेमध्ये घडाच्या विकासाकडे लक्ष...द्राक्ष बागेमध्ये सध्या वातावरण चांगले असले, तरी...
कलम केलेल्या द्राक्ष बागेमध्ये करावयाची...द्राक्ष बागेमध्ये सध्या वाढीच्या विविध...
द्राक्षबागेमध्ये खतांचे व्यवस्थापनजुनी बाग ः जुन्या बागांमध्ये झालेल्या सतता आणि...
फळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....
केळी पीक सल्लामागील तीन ते चार आठवड्यांतील पावसामुळे केळी...
द्राक्षबागेत मुळांच्या विकासावर भर...द्राक्ष विभागामध्ये सध्या पाऊस संपल्याची स्थिती...