agricultural stories in Marathi, grapes advice, take advantage of humidity for vineyard | Agrowon

द्राक्ष सल्ला : आर्द्रतापूर्ण वातावरणाचा लाभ घेणे आवश्यक

डॉ. आर. जी. सोमकुंवर
रविवार, 23 जून 2019

द्राक्षबागेतील तापमान सध्या कमी होत आहे. नाशिक, पुणे येथील द्राक्षउत्पादक भागामध्ये येत्या आठवड्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होण्याची दाट शक्यता आहे. या सोबत सोलापूर, सांगली जिल्ह्यातही तापमान ३५ अंशापुढे जाणार नाही. बागेतील आर्द्रता सुमारे ६० ते ७० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. ढगाळ वातावरण किंवा पाऊस यामुळे बागेमध्ये वाढीकरिता व रोगांच्या प्रादुर्भावाकरिता पोषक वातावरण राहू शकेल. सध्या बागेमध्ये वाढीच्या विविध स्थिती असून, त्यामध्ये करावयाचे व्यवस्थापन पाहू.

द्राक्षबागेतील तापमान सध्या कमी होत आहे. नाशिक, पुणे येथील द्राक्षउत्पादक भागामध्ये येत्या आठवड्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होण्याची दाट शक्यता आहे. या सोबत सोलापूर, सांगली जिल्ह्यातही तापमान ३५ अंशापुढे जाणार नाही. बागेतील आर्द्रता सुमारे ६० ते ७० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. ढगाळ वातावरण किंवा पाऊस यामुळे बागेमध्ये वाढीकरिता व रोगांच्या प्रादुर्भावाकरिता पोषक वातावरण राहू शकेल. सध्या बागेमध्ये वाढीच्या विविध स्थिती असून, त्यामध्ये करावयाचे व्यवस्थापन पाहू.

१) खुंट व्यवस्थापन ः
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेल्या खुंटाची बऱ्याच बागेत वाढ अपेक्षेप्रमाणे झाली नाही. या वर्षी उद्भवलेला पाण्याचा तुटवडा व जास्त तापामन यामुळे खुंटकाडीची वाढ जास्त झाली नाही. वाढत असलेली काडी लवकरच परिपक्व झाली. ज्या ठिकाणी काडी परिपक्व झाली अशा ठिकाणी कलम करण्याकरीता आवश्यक असलेली जाडी मिळणे शक्य नाही. याच सोबत खुंट रोपाच्या फुटी जर वाढल्या नसतील तर त्याचाच परिणाम म्हणजे जमिनीत मुळाचा विस्तार होण्याकरिता बागेत पोषक असे वातावरण तयार झाले आहे. तेव्हा खुंटरोपांची यावेळी वाढ चांगली होण्याची अपेक्षा आहे. रिकट घेतला नसला तरी नविन फुटी निघून पुढे वाढ होईल. परंतू वाढ ज्या ठिकाणी थांबली आहे. अशा ठिकाणी निघालेली नवीन फूटसुद्धा तितकीच बारीक असेल. साधन काडीचे कलम करण्यासाठी कलम करतेवेळी खुंटकाडीची जाडी जवळपास ७-८ मि.लि. असावी. याकरिताच ज्या बागेत खुंटरोपांची वाढ अपेक्षेप्राणे झाली नसल्यास यावेळी रि-कट घेणे महत्त्वाचे समजावे.
रिकट घेतेवेळी जमिनीपासून वर दोन तीन डोळे राखून पूर्ण रोप कापून घ्यावे. बागेत हा रिकट एक पाऊस पडल्यानंतर घेतल्यास चांगले परिणाम मिळतील. कारण कलम करण्यासाठी काडीची योग्य जाडी ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात सहज मिळेल. एकदा पाऊस पडल्यानंतर मुळांच्या भोवती वातावरणात पाणी पोचल्यानंतर उपलब्ध अन्नद्रव्याचा पुरेपूर वापर होतो. मुळांची वाढ सहज होते. यामुळे फुटी लवकर निघण्यास मदत होते. त्यानंतर रोपांचा मुळे व फुटवे गुणोत्तर (रुट व शूट रेशो) संतुलित राहून आवश्यक वाढ मिळू शकते.

खत व्यवस्थापन ः
रिकट घेतल्यानंतर बागेत नवीन फुटी निघण्याकरीता व फुटींची चांगली वाढ होण्यासाठी नत्र आणि स्फुरदयुक्त खतांचा वापर महत्त्वाचा असेल. बागेमध्ये एकरी २५ किलो युरिया आणि २५ ते ३० किलो डिएपी जमिनीतून द्यावे. यामुळे खुंटरोपांच्या मुळींची व फुटींची वाढ या दोन्ही गोष्टी साध्य करून घेता येतील.

२) जुनी बाग ः
याबागेत ज्या ठिकाणी पाण्याअभावी सबकेन नंतरचा शेंडा थांबवा होता, अशा ठिकाणी आता नवीन वाढ होण्यास चांगली मदत मिळेल. म्हणजेच आवश्यक असलेली बगलफुटीची वाढ यावेळी सहज होईल. परंतू, ही वाढ होत असताना आपल्याया प्रत्येक काडीवर किती पाने आवश्यक आहेत, याचा गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. चांगल्या प्रतीचा घड तयार होण्यासाठी काडीची जाडी साधारणपणे ८ ते १० मि.मी. व त्या काडीवर १६ ते १७ पाने आवश्यक असतात. ही पाने अन्नद्रव्याचा साठा तयार करण्याच्या दृष्टीने पुरेशी असतात. या पेक्षा जास्त पानांची संख्या झाल्यास कॅनोपीमध्ये गर्दी होईल. येत्या आठवड्यातील वातावरणामध्ये बगलफुटीची वाढही जोमात राहू शकते. अशा स्थितीमध्ये बागेत भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असेल. या करिता मोकळी कॅनोपी करून घेणे ही महत्त्वाची उपाययोजना असेल. त्या सोबत भुरीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करून घ्यावी.
वेलीवर ०-०-५० (सल्फेट ऑफ पोटॅश) हे खत ३ ते ४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. यामुळे काडीची परिपक्वता लवकर येण्यास मदत होईल. अशा काडींवर भुरीचा रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२० - २६९५६०६०
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी जि. पुणे.)


इतर फळबाग
व्यवस्थापन केळी बागेचे...तीव्र सूर्यप्रकाशापासून घडाचे संरक्षण करण्यासाठी...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
सीताफळात योग्य परागसिंचन होणे आवश्यकसीताफळाची फळधारणा तापमानावर जास्त अवलंबून...
नारळाला द्या शिफारशीत खतमात्रानारळ झाडाच्या सभोवताली पहिले वर्ष १ फूट, दुसरे...
असे करा लिंबूवर्गीय फळपिकांचे व्यवस्थापनसध्या काही संत्रा बागांना पूर्ण ताण बसून आंबिया...
दीड वर्षात पपईसह पाच पिकांचा 'तनपुरे...पपईच्या दीर्घ कालावधीच्या पिकात कांदा, पपई...
जीवनसत्त्व, क्षार घटकांचा पुरवठा करणारे...अंजिरामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक मुबलक...
द्राक्ष रिकट पूर्व तयारीसह व्यवस्थापनसध्याच्या वातावरणाचा विचार करता किमान...
केळी सल्लासूत्रकृमीग्रस्त जमिनीस खोल नांगरट देऊन उन्हात २...
केळीवरील सोंडकिडीचे कामगंध...जागतिक पातळीवर केळीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या...
दर्जेदार केळी उत्पादनाचे तंत्रकेळी घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड...
द्राक्ष सल्ला : तापमानातील चढ-उताराचे...सध्याच्या तापमानाचा विचार करता द्राक्षबागेत...
पिवळ्या पर्णछत्राची समस्या, कारणे जाणून...पावसाळा सरल्यानंतर थंडी पडली की बऱ्याच बागांमध्ये...
लिंबूवर्गीय फळपीक सल्ला सद्य:स्थितीत शेतकऱ्यांनी आंबिया बहरासाठी ...
असे करा रुगोज चक्राकार पांढरी माशीचे...थंडी वाढू लागल्यानंतर कडाक्याच्या थंडीला सुरुवात...
अशी करा पपईची लागवडपपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जून-जुलै, सप्टेंबर-...
नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकट घेण्याचा काळसध्या वातावरण कमी होत असून, काही ठिकाणी ढगाळ...