शहरी सांडपाण्यातून मिळवता येतील खते

शहरी सांडपाण्यातून मिळवता येतील खते
शहरी सांडपाण्यातून मिळवता येतील खते

मानवी टाकाऊ घटकांचा समावेश असलेल्या सांडपाण्यामध्ये पोषणमूल्ये भरपूर असतात. त्यातील नत्र, स्फुरद आणि पालाश अशा पोषक घटकांचा पुनर्वापर खते म्हणून कृषी उत्पादकता वाढीसाठी करणे शक्य असल्याचे इल्लिनॉईज विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनात दिसून आले आहे. हे संशोधनाचे निष्कर्ष जर्नल नेचर सस्टेनेबिलिटीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे सांडपाण्याच्या प्रमाणामध्येही प्रचंड वाढ झाली आहे. सांडपाण्यामुळे पाण्याचे स्रोत खराब होत असून, प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. अर्बाना कॅम्पेन येथील इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधकांनी मानवी विष्ठेचा समावेश असलेल्या सांडपाण्याच्या पुनर्वापरासाठी नवे प्रारूप विकसित केले आहे. या पाण्यातील नायट्रोजन, पोटॅशिअम आणि फॉस्फरस वेगळे करून त्याचा वापर कृषी क्षेत्रामध्ये पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी करता येईल. स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकीचे प्रा. जेरेमी गेस्ट यांनी सांगितले, की पिकाच्या वाढीसाठी आपण खतांचा वापर करतो. त्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश अशा मूलद्रव्यांचा समावेश असतो. ही सारी मूलद्रव्ये मानवी विष्ठेसह सांडपाण्यामध्ये असतात. सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पामध्ये वेगळी करणे शक्य आहे. या एकरेषीय स्रोत प्रवासाचे अभियांत्रिकीद्वारे पोषक घटकांच्या चक्रामध्ये रूपांतर शक्य असून, त्यातून अनेक संधी तयार होतील. त्याचा पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि कृषीक्षेत्राला फायदा होईल.

  • संशोधकांच्या गटाने सहा खंडातील ५६ मोठ्या शहरांचा अभ्यास केला. तेथील सांडपाण्याच्या पुनर्वापरासंदर्भात विचार केला. त्यात वाहतुकीचे अंतर, लोकसंख्या, पिकाची घनता, पिकाची पोषक घटकांची गरज यांचा समावेश होता.
  • सांडपाण्याचा सरळ शेतीसाठी वापर करण्यामध्ये आरोग्याच्या सुरक्षिततेच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पाण्यावर योग्य प्रक्रिया करण्याची आवश्यकता असते. ज्या शहरांच्या शेजारी शेती आहे, अशा ठिकाणी प्रक्रिया केलेल्या पाण्यांचा वापर शक्य आहे. अशी ठिकाणी आफ्रिका, आशिया आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. ज्या ठिकाणी पाण्याची वाहतूक करण्याची गरज आहे, तिथे ते थोडेसे आव्हानात्मक ठरते. कारण, पाण्याच्या एकूण प्रमाणाच्या तुलनेमध्ये त्यात पोषक घटकांचे प्रमाण कमी असते.
  • काही शहरामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीव्र उत्पादनांची निर्मिती करावी लागते. त्यामुळे दीर्घ अंतरापर्यंत वाहतूक करणे परवडू शकेल. ही उत्पादने सध्याच्या स्फटिकरूपी खतांप्रमाणेच असतील.
  • सध्या अनेक विकसनशील देशांना खते आयात करावी लागतात. त्यासाठी त्यांच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग व्यापला जातो. या नव्या प्रकल्पांमुळे हा खर्च वाचून आर्थिक स्वयंपूर्णतेला चालना मिळू शकते.
  • ट्रीमर म्हणाले, की इजिप्त येथील कैरो शहराचे उदाहरण घेता येईल. येथील सांडपाण्यातील नत्र वेगळा करून वापरणे शक्य झाल्यास सध्या आयात केल्या जाणाऱ्या खतांमध्ये अर्ध्याने बचत होऊ शकते. हीच बाब सब सहारण आफ्रिकेतही शक्य आहे.
  • मात्र, अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि बोस्टनसारखी शहरे शेतीक्षेत्रापासून खूप दूर आहेत. त्याऐवजी मध्यपश्चिमेतील शिकागो शहरामध्ये हे प्रारूप चांगल्या प्रकारे कार्यरत होईल, असे वाटते.
  • गेस्ट यांनी सांगितले, की जागतिक पातळीवर अनेक देशांतील शहरांचे या संशोधनामध्ये विश्लेषण केले असले तरी प्रत्येक शहराचा पुन्हा वेगळेपणाने अभ्यास करावा लागेल. त्यातील सांडपाण्याचे प्रकल्प, त्यातून उपलब्ध होणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण याचे विश्लेषण करून रणनिती ठरवावी लागेल.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com