agricultural stories in Marathi, importance of Biodiesel | Page 2 ||| Agrowon

जैवइंधनावर चालणाऱ्या यंत्राची निर्मिती आवश्यक

अतुल घुले, सुश्मिता काळे
सोमवार, 13 मे 2019

सध्या पडिक आणि लागवडीखाली नसलेल्या जमिनीमध्ये जैवइंधन पिकांची लागवड करणे शक्य आहे. या जैवइंधनामध्ये भारताच्या खनिज तेलासाठी खर्ची पडणारे परकीय चलन वाचू शकते.

सध्या पडिक आणि लागवडीखाली नसलेल्या जमिनीमध्ये जैवइंधन पिकांची लागवड करणे शक्य आहे. या जैवइंधनामध्ये भारताच्या खनिज तेलासाठी खर्ची पडणारे परकीय चलन वाचू शकते.

  भारतीय साखरेच्या दरामध्ये जागतिक बाजारानुसार चढउतार होत असतात. या दरामध्ये स्थिरता येण्यास इथेनॉल निर्मितीमुळे मदत होऊ शकते. सध्या इथेनॉलच्या निर्मितीला चालना देण्यासाठी भारत सरकारने उसापासून निर्मित इथेनॉलच्या किमतीमध्ये २५ टक्क्यांनी वाढ केली आहे. याचा फायदा घेण्यासाठी गुंतवणुकीबरोबरच दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो, याची कल्पना साखर उद्योगामध्ये आहे. सध्या खनिज इंधनामध्ये इथेनॉलचे ५ टक्के मिश्रण करण्यास परवानगी आहे. ते प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत नेणे शक्य होईल. हा विचार करता इथेनॉलच्या निर्मितीला मोठा वाव आहे.

इथेनॉलनिर्मिती करण्यायोग्य पदार्थ

  • ऊस, बीट, ज्वारी, मका आणि कसावा यासारखी शर्करायुक्त पिके.
  • अखाद्य व खराब  झालेले धान्य, बटाटा, गहू आणि तुटलेले तांदूळ.

तसे पाहता उसाच्या रसात (मळीमध्ये) अधिक इथेनॉल निर्मितीची क्षमता आहे. राष्ट्रीय जैव इंधन धोरण २०१८ नुसार मळीव्यतिरिक्त अन्य कच्च्या मालांचे पर्याय शोधले जात आहेत. वरीलपैकी कोणत्याही घटकांपासून योग्य ती किंमत बाजारात उपलब्ध होत नाही, याचा अंदाज येताच त्यापासून इथेनॉलची निर्मिती करणे शक्य आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य तो दर मिळण्याची शाश्वती यातून होऊ शकते. याला राष्ट्रीय जैवइंधन समन्वय समितीची मान्यता आहे. याशिवाय शहरी घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दुसऱ्या समस्येवरही यातून उपाय मिळू शकतो. या कचऱ्याचे ड्रॉप-इन इंधनांमध्ये रूपांतरित करणाऱ्यासाठी धोरणात्मक यंत्रणा आवश्यक आहे. नव्या धोरणानुसार अत्याधुनिक २ जी बायोरिफानरीजसाठी ५ हजार कोटी रुपयांचा निधी येत्या सहा वर्षासाठी उपलब्ध होणार आहे.

पूर्वीच्या रिफायनरीजच्या तुलनेमध्ये यातून जैवइंधनाचा दर्जा व उपलब्धता वाढणार आहे. परिणामी चांगले दर मिळण्याच्या अपेक्षेने बहुतांश तेल विपननातील कंपन्यांद्वारे अत्याधुनिक रिफायनरीजच्या उभारणीला गती मिळाली आहे. येत्या काही वर्षामध्ये सुमारे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करत १२ अत्याधुनिक रिफायनरीज उभारण्याच्या प्रक्रियेत पुढे आल्या आहेत. जैवइंधन निर्मितीसाठी अखाद्य तेलबिया, कमी कालावधीत वाढणारी पिके यांची पुरवठा साखळी उभारणे गरजेचे आहे. यातून जैवइंधन निर्मितीला चालना मिळेल. परदेशामध्ये गॅस स्टेशनमध्ये गॅसोलीनचा वापर होतो. या इंधनवायू बाजारातही खुल्या स्पर्धेला वाव आहे. मात्र, आपल्या देशामध्ये गॅसोलीनच्या पलीकडे अन्य जैवइंधने, हायड्रोजन, वीज आणि सीएनजी उपलब्ध होणे खूप आवश्यक आहे. आयातीवर आधारीत जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणे, स्थानिक प्रदूषण आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी हा पर्याय उपयुक्त ठरणार आहे. खनिज इंधनांना पर्याय म्हणून कृषी आधारित कच्च्या मालाचा वापर सुरू झाल्यास शेतकऱ्यांच्या फायद्यामध्ये वाढ होऊ शकेल.

तंत्रज्ञान विकास गरजेचा
सध्याच्या स्थितीमध्ये ऑटोमोबाईल आणि ट्रॅक्टर उद्योगासाठी मोठी संधी आहे. जीवाश्म किंवा खनिज इंधनाऐवजी जैवइंधन, हायड्रोजन, सौरऊर्जा, वीज आणि सीएनजीकडे वाहने नेण्यासाठी योग्य ते संशोधन करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः ट्रॅक्टर उद्योगामध्ये शंभर टक्के वनस्पती तेल, जैवइंधन, सीएनजीवर चालणारे ट्रॅक्टर विकसित करणे हे नितांत गरजेचे आहे. अन्नधान्यापासून इंधन निर्मिती हा वाद विषय मानला जात असला तरी सध्या तरी जगाची इंधन आणि उर्जेची मागणी पुरवण्यासाठी या क्षेत्राकडेच पाहत असल्याचे स्पष्ट आहे. वाया जाणारे अन्नधान्य, पडिक जमिनीवर जैवइंधनाचे उत्पादन याचा विचार करावा लागणार आहे. या उदयोन्मुख जैव ऊर्जा उद्योगात शेतकरी केंद्रस्थानी राहू शकतो.

अतुल घुले, atul४१२५०@gmail.com
सुश्मिता काळे, ९९२२४२६८१८

(घुले हे चेन्नई येथील खासगी कंपनीच्या संशोधन केंद्रामध्ये, तर सुश्मिता काळे या के. के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक येथे सहायक प्राध्यापक आहेत.)


इतर टेक्नोवन
तिहेरी उपयोगाचे रिंग गार्डन!जागतिक पातळीवर शेती ही अन्नाची उपलब्धता...
पदार्थाची प्रत, रंग टिकविण्यासाठी...सौर वाळवणी संयंत्राच्या इनडायरेक्ट सोलर ड्रायर...
सौर ऊर्जेवर चालणारी ई-सायकल !सध्या दुचाकीचे प्रमाण वाढले असले तरी त्यासाठी...
अन्न शिजवण्यासाठी नावीन्यपूर्ण ‘...सरळ ज्वालेवर अन्नपदार्थ भाजण्यापासून माणसांच्या...
जमीन सुपीकता अन् तंत्रज्ञान; दर्जेदार...वडिलोपार्जित बागायती शेती असल्याने नोकरीच्या मागे...
कृषिक्षेत्रासाठी उपयुक्त ‘ब्लॉक चेन’...कृषिक्षेत्र हे अन्नसुरक्षेच्या दृष्टीने सर्वात...
प्रक्रिया उद्योगासाठी सोलर ड्रायरसौरऊर्जेचा वापर करून पदार्थ वाळवणे हा...
अचूक सिंचनासाठी स्वयंचलित यंत्रणास्वयंचलित सूक्ष्म सिंचन यंत्रणेद्वारे (ऑटोमेशन)...
इंधनबचतीसाठी पर्यावरणपूरक सौर चूलसौरऊर्जेच्या साह्याने रोजच्या जेवणातील सर्व...
तयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे...सध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार...
ऊस शेतीसाठी आवश्यक यंत्रेऊस उत्पादनात केवळ मजुरीवर ३५ ते ४० टक्के खर्च...
जलशुद्धीकरणासाठी सौर शुद्धजल संयंत्रदुर्गम भागांत तसेच समुद्रकिनाऱ्यावर पिण्यायोग्य...
शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षशून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात...
ऊर्जेशिवाय शीतकरणाचे तंत्रकोणत्याही ऊर्जेच्या वापराशिवाय शीतकरणाची एक...
जास्त अन्न शिजविण्यासाठी शेफलर सौरचूल...शेफलर सौर चूल पेटी सौरचूल आणि पॅराबोलिक...
...ही आहेत आंतरमशागतीसाठी अवजारेशेती मशागतीमध्ये आता ट्रॅक्टर, पॉवर टिलर अशी...
बटाटा प्रक्रिया उद्योगासाठी यंत्रेतळलेल्या पदार्थामध्ये बटाट्याचे चिप्स किंवा...
मेथी वाळवण्याचे तंत्रभारतामध्ये मेथी (शा. नाव - ट्रिगोनेला फीनम -...
फ्राइम्स प्रक्रिया उद्योगातील यंत्रेतळलेल्या पदार्थांच्या बाजारपेठेमध्ये फ्राइम्स...
..अशी आहे डाळनिर्मितीची प्रक्रियामागील भागात मिनी डाळ मिल व त्या माध्यमातून डाळ...