मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
अॅग्रो विशेष
अशक्तपणा, अतिसारावर मोह उपयुक्त
- स्थानिक नाव : मोह/मोहटी
- शास्त्रीय नाव : Madhuca indica Gmel
- कुळ : Sapotaceaea
- इंग्रजी नाव : Butter Tree, Madhuka, honey tree
- संस्कृत नाव : मधुका
- उपयोगी भाग : कोवळी फळ, फूल, बिया
- उपलब्धीचा काळ : कोवळी फळे: मार्च- एप्रिल, फुले: एप्रिल-मे, बिया: मे-जून
- झाडाचा प्रकार : झाड
- अभिवृद्धी : बिया
- वापर : शिजवून भाजी, बियांपासून खाद्यतेल.
आढळ ः
- स्थानिक नाव : मोह/मोहटी
- शास्त्रीय नाव : Madhuca indica Gmel
- कुळ : Sapotaceaea
- इंग्रजी नाव : Butter Tree, Madhuka, honey tree
- संस्कृत नाव : मधुका
- उपयोगी भाग : कोवळी फळ, फूल, बिया
- उपलब्धीचा काळ : कोवळी फळे: मार्च- एप्रिल, फुले: एप्रिल-मे, बिया: मे-जून
- झाडाचा प्रकार : झाड
- अभिवृद्धी : बिया
- वापर : शिजवून भाजी, बियांपासून खाद्यतेल.
आढळ ः
मोहाचे उंच डेरेदार झाड कोकणापासून गडचिरोलीपर्यंत सर्वत्र दिसते. जंगलात डोंगराळ भागात शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला तसेच माळरानावर मोहाची झाडे वाढलेली दिसतात.
वनस्पतीची ओळख
- मोह हा बहुवार्षिक, पानझडी वृक्ष असून साधारण १६ ते २० मीटर उंच व ८० सें.मी. घेरापर्यंत वाढतो.
- खोडाचा घेर मोठा, साल तपकिरी रंगाची असून सालीच्या खपल्या पडतात. आंतरसाल लाल असून पांढरा चिक येतो.
- झाड डेरेदार असून त्याला अनेक फांद्या असतात. पाने साधी, लंबवर्तुळी देठाजवळ वाटोळी, शेंड्याला एकत्र, एका आड एक येणारी, गडद हिरव्या रंगाची, ७ ते १२ सें.मी. लांब व ४ ते ६ से.मी. रुंद असतात. फुले फिक्कट पिवळी असतात. पिकल्यानंतर गडद तपकिरी होतात. शेंड्याला (साधारण १०-१२) एकवटलेली असतात. फुले मधुर, सुवासिक व झाडाला उलटी लटकलेली असतात. फुले फक्त एक रात्र टिकून नंतर खाली गळून पडतात.
- फळे फिक्कट हिरवी, बोरासारखी लांबट व पिकल्यावर पिवळी पडतात. बिया १ ते ४, चकाकणाऱ्या ३ ते ५ सें.मी. लांब असतात.
- औषधी गुणधर्म ः
- मोहाच्या फुलात ५० ते ६० टक्के साखर तर बियात ६० टक्के तेल व टॅनीन असते.
- अतिसरात साल पाण्यात उकळून दोन वेळेस पिण्यास देतात.
- हरभरा, मोहाची फुले आणि गूळ यांपासून अशक्तपणावर उपयुक्त असे पदार्थ तयार केले जातात.
टीप ः तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
पाककृती ः
कोवळ्या फळांची भाजी
साहित्य : २५० ग्रॅम मोहाची कोवळी फळे, २-३ बारीक चिरलेले कांदे, ५-६ ठेचलेल्या लसूण पाकळ्या, १ चमचा हळद, १-२ चमचा लाल मिरची पावडर,१ चमचा धने पावडर, फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, तेल, चवीपुरते मीठ व कोंथिबीर.
कृती ः प्रथम मोहाची कोवळी फळे स्वच्छ धुवून साल काढून घ्यावी. उभी चिरून बिया वेगळ्या करून उकळत्या पाण्यात मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावीत. थंड झाल्यावर कुस्करून घ्यावे. कढईत तेल गरम करून जिरे, हिंग, मोहरीची फोडणी तयार करावी. नंतर कांदा व लसूण तेलात चांगला शिजवून घ्यावा. त्यात हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर व कुस्करलेल्या फोडी टाकून चांगले परतवून घ्यावे. चवीप्रमाणे मीठ मिसळावे. बारीक चिरलेली कोंथिबीर घालावी.
टीप ः वाळलेल्या बिया गोळा करून त्यापासून जून जुलै महिन्यात तेल काढले जाते. २-३ वेळा चांगले उकळून घेतल्यावर खाण्यासाठी वापरले जाते.
- अश्विनी चोथे, ७७४३९९१२०६
(क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)
फोटो गॅलरी
- 1 of 657
- ››