agricultural stories in Marathi, Importance of clean water for good health | Agrowon

स्वच्छ पाणी प्या, आजारापासून दूर रहा
डॉ.क्षितिजा कुलकर्णी
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

खराब पाण्यामुळे अमिबाची लागणसुद्धा होऊ शकते. या मध्ये पोटात दुखणे, जुलाब, चिकट संडास होणे, संडास वाटे रक्त पडणे अशी लक्षणे दिसतात. या आजारातसुद्धा प्रतिजैविके घ्यावी लागतात. खराब पाण्यामुळे आतड्यात जंतसुद्धा होतात. यामध्ये पोटात दुखणे, भूक कमी होणे, अंगावरती पांढरे चट्टे येणे अशी लक्षणे दिसतात. उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची योग्य काळजी घेतल्यास आपल्याला बरेच आजार टाळता येतात.

खराब पाण्यामुळे अमिबाची लागणसुद्धा होऊ शकते. या मध्ये पोटात दुखणे, जुलाब, चिकट संडास होणे, संडास वाटे रक्त पडणे अशी लक्षणे दिसतात. या आजारातसुद्धा प्रतिजैविके घ्यावी लागतात. खराब पाण्यामुळे आतड्यात जंतसुद्धा होतात. यामध्ये पोटात दुखणे, भूक कमी होणे, अंगावरती पांढरे चट्टे येणे अशी लक्षणे दिसतात. उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची योग्य काळजी घेतल्यास आपल्याला बरेच आजार टाळता येतात.

उन्हाळ्यामध्ये पाण्याचे प्रदूषण व त्यामुळे होणारे आजार यांचे प्रमाण वाढते. पाण्यामुळे पसरणारे आजार एक तर दूषित पाणी पिण्याने होतात किंवा अन्नामध्ये वापरलेल्या दूषित पाण्यामुळे होतात. पाण्यामधील सूक्ष्मजीवांमुळे तर काही आजार होतातच याशिवाय काही आजार पाण्यामध्ये विरघळलेल्या रसायनांमुळे व विषारी पदार्थांमुळे सुद्धा होतात. आज आपण पाण्यामधून असणाऱ्या सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या आजारांची माहिती घेऊ. साधारणपणे पिण्याचे पाणी सांडपाण्यामुळे दूषित झाले, तर खालील प्रकारचे आजार पसरतात.

विषाणूजन्य आजार
विषाणूजन्य कावीळ उन्हाळ्यात व पावसाळ्यात हमखास येते. याचे दोन प्रकार आहेत. विषाणू A व विषाणू E. यामध्ये जुलाब, उलट्या ,पोटात दुखणे, भूक न लागणे अशी लक्षणे सुरवातीला दिसतात. साधारणपणे चार-पाच दिवसांनंतर कावीळ झालेली दिसते. हा आजार बहुतेक वेळा साधाच असतो व आपोआप बरा होतो. पण गरोदरपणात किंवा प्रतिकारशक्ती कमी असेल तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो. विषाणूजन्य काविळीच्या एका प्रकाराच्या विषाणू साठी (विषाणू A)लस उपलब्ध आहे.

पोलिओ
हा सुद्धा दूषित पाण्यामुळे पसरणारा आजार आहे. पूर्वी लहान मुलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसायचा. यामध्ये शरीराच्या एखाद्या भागाचे उदाहरणार्थ हाताचे किंवा पायाचे स्नायू कमजोर होऊन कायमचे अपंगत्व यायचे. लसीकरणामुळे आता या आजाराचे व पाण्यातूनच पसरण्याऱ्या नारू या आजाराचे सुद्धा जवळपास निर्मूलन झाले आहे.

रोटावायरस
या आजारांमुळे लहान मुलांमध्ये, तान्ह्या बाळांमध्ये जुलाब होतात. बहुतेक वेळा हा आजार आपोआप बरा होतो. काही वेळा गंभीर स्वरूप घेऊ शकतो. या आजारकरिता लस उपलब्ध आहे.

जिवाणूजन्य आजार
 टायफॉईड, पॅराटायफॉईड ( विषमज्वर) सालमोनेला टायफी नावाच्या जंतूमुळे हा आजार होतो. त्यामध्ये ताप येणे हे प्रमुख लक्षण असते. हा ताप हळूहळू वाढत जातो. त्याचबरोबर डोकेदुखी, अंगदुखी, अंगावरती लालसर पुरळ उठणे अशी लक्षणे दिसतात. या या आजाराला करता प्रतिजैवके (अँटिबायोटिक्स) घ्यावी लागतात. योग्य उपचार न केल्यास जवळपास २५ टक्के लोकांचा या आजारांमध्ये मृत्यूसुद्धा होऊ शकतो. या आजारकरितासुद्धा लस उपलब्ध आहे.

आरोग्याची काळजी घ्या
उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची योग्य काळजी घेतल्यास आपल्याला बरेच आजार टाळता येतात. तसेच खाण्याआधी जेवणाआधी हात साबणाने स्वच्छ धुणे, पाणी उकळून थंड करून घेणे किंवा अन्य कुठल्याही प्रकारे शुद्ध करून घेणे, ते पुन्हा दूषित होणार नाही असे साठवल्यामुळे आपल्याला बरेचसे आजार टाळता येतात.

खराब पाण्याचे परिणाम

  • आव, जुलाबाची साथ, कॉलराची साथ हेसुद्धा जिवाणूजन्य आजाराचे प्रकार आहेत. हे आजार दूषित पाण्यामुळे पसरतात.
  • खराब पाण्यामुळे अमिबाची लागणसुद्धा होऊ शकते. या मध्ये पोटात दुखणे, जुलाब, चिकट संडास होणे, संडास वाटे रक्त पडणे अशी लक्षणे दिसतात. या आजारात सुद्धा प्रतिजैविके घ्यावी लागतात.
  • खराब पाण्यामुळे आतड्यात जंत सुद्धा होतात. यामध्ये पोटात दुखणे, भूक कमी होणे, अंगावरती पांढरे चट्टे येणे अशी लक्षणे दिसतात. लहान मुलांमध्ये रक्त कमी होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.
  • लेप्टोस्पायरोसिस हा आजार सुद्धा दूषित पाण्यामुळे होतो. उंदरांच्या लघवीमध्ये या आजाराचे जंतू असतात. पायाला झालेल्या जखमा किंवा पायाच्या भेगांमधून आपल्या शरीरात हे जंतू शिरतात व पसरतात. यामध्ये ताप, कावीळ, शरीरात आतमध्ये रक्तस्त्राव होणे, त्वचेखाली रक्तस्राव होणे, डोळ्यामध्ये रक्तस्त्राव होणे अशी लक्षणे दिसतात. हा गंभीर आजार आहे. बहुतेक वेळा रुग्णाला रुग्णालयात दाखल करून उपचार करावे लागतात.

(लेखिका दौंड, जि. पुणे येथे अायसीयू तज्ज्ञ आहेत.)

 

 

इतर महिला
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
कन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...
मुखवासनिर्मितीतून अर्थकारणाला बळ बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन जळगावमधील अनिता दगा...
प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
नंदाताईंनी मिळवली प्रक्रिया उद्योगात...पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नंदा...
प्रयोगशील शेतीतून थांबविले कुटुंबांचे...देवगाव, आंबेवंगण (ता. अकोले, जि. नगर) ही आदिवासी...
नंदुरबारच्या दुर्गम भागात ‘सातपुडा भगर'...अक्कलकुवा तालुक्‍यातील आदिवासी महिला,...
आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...
आरोग्यदायी पुदिनापुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून,...
आळिंबी, गव्हांकुर उत्पादनातून बचत गटाची...गोद्रे (ता. जुन्नर, जि. पुणे) गावातील महिलांनी...
शेती, पूरक उद्योगातून महिला गट झाला...पुणे जिल्ह्यातील गोऱ्हे बु. (ता. हवेली) येथील ऋचा...
कडवंची : अर्थकारणाला मिळाली बचत गटांची...शेती आणि ग्रामविकासामध्ये महिलांचा महत्त्वपूर्ण...
कडवंची : संघर्षातून पेललंय आव्हानकडवंचीमधील महिलांनीदेखील द्राक्ष शेतीमध्ये...
स्वच्छ पाणी प्या, आजारापासून दूर रहाखराब पाण्यामुळे अमिबाची लागणसुद्धा होऊ शकते. या...
आरोग्यवर्धक नारळपाणी आयुर्वेदात नारळपाण्याला खूप महत्त्व आहे. नारळात...
अल्पभूधारक, भूमिहीन महिलांना बचतगटातून...बेल्हेकरवाडी (ता. नेवासा,जि.नगर) मधील तुकारामनगर...
आजारांच्या नियंत्रणासाठी लसीकरण आवश्यकलसीकरण हे लहान मुले, बाळांसाठी आणि आजारी...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...