राज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक आहे.
औषधी वनस्पती
अशक्तपणा, त्वचा रोगावर उंबर उपयुक्त
- स्थानिक नाव : उंबर, औदुंबर
- शास्त्रीय नाव : Ficus racemosa
- इंग्रजी नाव : Gular Country Fig, Cluster fig
- संस्कृत नाव : उदुंबर, हेमदुग्ध, पवित्रक
- कुळ : Moraceae
- उपयोगी भाग : कोवळी फळे
- उपलब्धीचा काळ : फेब्रुवारी – जून
- झाडाचा प्रकार : झाड
- अभिवृद्धी : पक्ष्यांच्या विष्टेतून
- वापर : भाजी
आढळ
- स्थानिक नाव : उंबर, औदुंबर
- शास्त्रीय नाव : Ficus racemosa
- इंग्रजी नाव : Gular Country Fig, Cluster fig
- संस्कृत नाव : उदुंबर, हेमदुग्ध, पवित्रक
- कुळ : Moraceae
- उपयोगी भाग : कोवळी फळे
- उपलब्धीचा काळ : फेब्रुवारी – जून
- झाडाचा प्रकार : झाड
- अभिवृद्धी : पक्ष्यांच्या विष्टेतून
- वापर : भाजी
आढळ
- उंबराचे वृक्ष महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात. जंगलात, नदीच्या किनारी, डोंगरकपारीला रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधावर वाढलेले आढळतात. मंदिर व देवळच्या परिसरात धार्मिकस्थळी उंबराची लागवडही केली जाते.
- वनस्पतीची ओळख
- उंबराचे वृक्ष १० ते १५ मीटर उंचीपर्यंत वाढतात. खोड मोठे, मजबूत असून, फांद्या अनेक पसरलेल्या पांढरट करड्या रंगाच्या, गुळगुळीत असतात.
- पाने साधी, एका आड एक, सदाहरित, लंबवर्तुळाकार-अंडाकृती असतात.
- पाने ७ ते १५ सें.मी. लांब व ३ ते ६ सें.मी. रुंद, टोकाकडे साधारण निमुळती दोन्ही पृष्ठभाग गुळगुळीत, वरचा भाग चकाकणारा असतो.
- फुले सूक्ष्म, गोल आकाराच्या फळासारख्या पुष्पमंजिरीत येतात. ही फुले झाडाच्या मुख्य खोडावर, तसेच फांद्यावर येतात. तयार झालेली फळे हिरव्या रंगाची पिकल्यावर लालसर रंगाचे बनतात.
- फुले एकलिंगी गोलाकार फुलाच्या आतील भागात सूक्ष्म नर मादी व वांझ फुले असतात. नरफुले टोकाकडील वरील बाजूस असतात, तर मादी फुले टोकाकडील बाजूस असतात.
- नर व मादी फुलांच्यामध्ये वांझ फुले असतात. फळाच्या वरच्या बाजूस देठाच्या खालच्या बाजूस लहानसे छिद्र असते. या छिद्रातून परागीभवन करणारे लहान कीटक आत शिरतात व परागीभवन करतात. त्यानंतर फळ वाढू लागते.
- फळे गोलाकार, वरील बाजूस नाजूक लव असणारी असतात. पिकल्यावर लाल होतात. बिया अनेक, लहान, पिवळ्या रंगाच्या असतात.
औषधी उपयोग
- उंबराचे मूळ, साल, पाने, फळ व चीक औषधात वापरतात.
- उंबराची पिकलेली फळे रक्त वाहणाऱ्या सर्व रोगात वापरतात.
- कफाबरोबर नाकांतून रक्त वाहत असेल, लघवीतून रक्त जात असेल, तर ह्याचे फळ खायला देतात.
- लहान मुलांना उलट्या, जुलाब, अशक्तपणावर चिकाचे १० थेंब दुधातून दिले जातात.
- उंबरच्या मुळातून जे पाणी निघते ते अतिशय पौष्टिक असते. गोवर व मधुमेहात हे पाणी गुणकारी आहे.
- साल आंघोळीच्या पाण्यासोबत त्वचारोगासाठी वापरली जाते. याच्या कोवळ्या पानाचे चूर्ण मधात मिसळून पित्तावर दिले जाते.
टीप ः तज्ज्ञांच्या सल्याने औषधोपचार करावेत.
कच्च्या उंबराच्या फळांची भाजी
साहित्य : २५० ग्रॅम उंबराची फळे, १-२ बारीक चिरलेले कांदे, ६-७ ठेचलेल्या लसूण पाकळ्या, १-२ चमचे लाल मिरची पावडर, १ चमचा हळद, १ चमचा धने पूड, फोडणीसाठी हिंग, जिरे, मोहरी, तेल, मीठ चवीप्रमाणे.
कृती:
प्रथम उंबराची कच्ची फळे स्वछ धुऊन उभी चिरून घ्यावीत. नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी करून घ्यावी. तेलात कांदा, लसूण चांगला परतून लाल मिरची पावडर, हळद, धने पूड व कापलेले फळे टाकून चांगले परतून घ्यावे. चवीप्रमाणे मीठ घालावे. १० ते १५ मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यावे.
टीपः काही भागांत पिकलेले फळेही खाल्ली जातात.
- अश्विनी चोथे, ७७४३९९१२०६
(क. का. वाघ उद्यानविद्या, महाविद्यालय, नाशिक)
- 1 of 2
- ››