agricultural stories in Marathi, importance weather infomation | Page 2 ||| Agrowon

शेती नियोजनामध्ये हवामान सल्‍ला उपयुक्‍त

डॉ. कैलास डाखोरे
मंगळवार, 21 मे 2019

कृषी हवामान सल्‍ल्‍याचा उपयोग शेतकऱ्यांच्याबरोबरीने पर्यटन, पाणी व्‍यवस्‍थापन, जलविद्युतनिर्मिती प्रकल्‍प, दळणवळण, संरक्षण आणि आपत्ती व्‍यवस्‍थापन या क्षेत्राबरोबरच, क्रीडा, सांस्‍कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रमांना होत आहे.

कृषी हवामान सल्‍ल्‍याचा उपयोग शेतकऱ्यांच्याबरोबरीने पर्यटन, पाणी व्‍यवस्‍थापन, जलविद्युतनिर्मिती प्रकल्‍प, दळणवळण, संरक्षण आणि आपत्ती व्‍यवस्‍थापन या क्षेत्राबरोबरच, क्रीडा, सांस्‍कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रमांना होत आहे.

भारतामध्‍ये १९३२ साली भारतीय हवामान विभागांतर्गत कृषी हवामानशास्‍त्र हा विभाग स्‍थापन झाला. भारत सरकारने विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्‍या अंतर्गत सन १९८८ मध्‍ये ‘मध्‍यम हवामान अनुमान केंद्राची’ स्‍थापना केली. या केंद्राची सुरवात करण्‍यामागे प्रामुख्‍याने मध्‍यम स्‍वरूपाचा (३-१० दिवस अगोदर) हवामान अंदाज देता यावा हा उद्देश होता. यामध्‍ये राष्‍ट्रीय कृषी आयोगाने सन १९७१ मध्‍ये निश्चित केलेल्‍या १२७ कृषी विभागातील शेतकऱ्यांसाठी ‘हवामान आधारित कृषी सल्‍ला सेवा’ सुरू करणे हे प्रमुख उद्दीष्‍ट आखले. या उपक्रमामध्‍ये राज्‍यातील कृषी विद्यापीठे, भारतीय हवामान विभाग, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि संलग्‍न संस्‍था इत्‍यादी संस्‍था प्रारंभी एकत्रितपणे काम करत होत्‍या.

 • राज्यातील कृषी हवामान सल्‍ला सेवा  
 • प्रथमत: ही योजना प्रायोगिक तत्त्वावर काही कृषी हवामान विभागासाठी सुरू करून नंतर टप्‍याटप्‍याने १३० केंद्रामार्फत संपूर्ण देशामध्‍ये ही योजना राबविली जाते.
 • महाराष्‍ट्रात या योजनेअंतर्गत महात्‍मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत चार केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत दोन केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाअंतर्गत दोन केंद्र आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीअंतर्गत एका केंद्रामार्फत कृषी हवामान सल्‍ला सेवा देण्याचे काम चालते.
 • प्रकल्‍पांतर्गत प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर राज्‍य कृषी विद्यापीठे येथे कृषी हवामान सल्‍ला सेवा योजना कार्यान्वित करण्‍यात आली. या योजनेमार्फत संबंधित केंद्राआखत्‍यारित असणाऱ्या भागासाठी आठवड्याच्‍या प्रत्‍येक मंगळवारी आणि शुक्रवारी कृषी हवामान सल्‍ला पत्रिका आकाशवाणी आणि विविध प्रसार माध्‍यमे यांच्‍यामार्फत प्रसारित करण्‍यात येत होती. यानंतर २००७ मध्‍ये या योजनेचे नाव बदलून ‘‘एकात्मिक कृषी हवामान सल्‍ला सेवा’’ असे करण्‍यात आले.
 • सन २००८ पासून या योजनेमार्फत कृषी हवामान विभाग याप्रमाणे कृषी हवामान सल्‍ला पत्रिका काढणे बंद करून प्रत्‍येक जिल्ह्यासाठी स्‍वतंत्र जिल्‍हा हवामानावर आधारित कृषी सल्‍ला पत्रिका तयार करून ती सर्व प्रसार माध्‍यम आणि माहिती तत्रंज्ञान सुविधाच्‍या आधारे शेतकऱ्यांपर्यंत पोचवली जाऊ लागली. सन २०१३ मध्‍ये या योजनेचे नाव बदलून ‘ग्रामीण कृषी मौसम सेवा’ असे करण्‍यात आले.
 • योजनेमधून दिल्‍या जाणाऱ्या कृषी हवामान सल्‍ल्‍याचा उपयोग शेतकऱ्यांच्याबरोबरीने पर्यटन, पाणी व्‍यवस्‍थापन, जलविद्युतनिर्मिती प्रकल्‍प, दळणवळण, संरक्षण आणि आपत्ती व्‍यवस्‍थापन या क्षेत्राबरोबरच, क्रीडा, सांस्‍कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रमांना होतो.
 • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांमध्‍ये संपूर्ण मराठवाड्यासाठी प्रथमपासून एकच केंद्र कार्यरत आहे. १ जून २००८ पासून या केंद्रामार्फत मराठवाड्यातील आठही जिल्‍ह्यांकरिता प्रत्‍येक जिल्‍ह्याच्‍या हवामान आधारित आठवड्याच्‍या प्रत्‍येक मंगळवारी आणि शुक्रवार रोजी स्‍वतंत्रपणे ‘कृषी हवामान सल्‍ला पत्रिका’ तयार केली जाते.
 • कृषी हवामान सल्‍ला पत्रिकेत पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज व त्‍यानुसार शेतातील पिके, पिकाची अवस्‍था आणि हवामानानुसार करावयाची शेतातील कामे (उदा. जमिनीची निवड, पूर्वमशागत, जमीन व प्रकारानुसार वाणांची निवड, बियाणे प्रमाण व आंतर, बीजप्रक्रीया, पिकांची पेरणीची वेळ, आंतरमशागत, खत देणे, पाणी देणे, तण नियंत्रण, कीड नियंत्रण, रोग नियंत्रण, पिकांची काढणी अथवा तोडणी करणे, कृषी माल वाहतूक, साठवण आणि विपणन) याची माहिती दिली जाते. या बरोबरच फळबाग, फूलशेती, भाजीपाला, पशुधन, रेशीम उद्योग, कृषी अभियांत्रिकी, मृ‍द व जलसंधारण आणि शेती अवजारांचा वापर व देखभाल आणि निगा याची माहिती दिली असते. विविध संस्था तसेच आकाशवाणीच्या माध्यमातून हा सल्ला दिला जातो.
 • कृषी हवामान सल्‍ल्‍याचे लाभधारक दरवर्षी वाढत आहेत. गेल्‍या वर्षांत (२०१८-२०१९) विविध माध्‍यमांद्वारे या केंद्रामार्फत एकूण लाभधारक शेतकऱ्यांची संख्‍या सुमारे पन्नास लाखांवर पोचली
 • आहे.

मोबाईल आणि संकेतस्थळावर कृषी सल्ला
 मराठवाड्यातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांच्‍या सहकार्याने शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश स्‍वरूपामध्‍ये (एसएमएस) सल्ला दिला जातो. याबरोबरच मोबाईलवर भ्रमणध्‍वनी संदेशामार्फत कृषी हवामान सल्‍ला शेतकऱ्यांपर्यंत पोचविला जातो.

संकेतस्‍थळे

 • वनामकृवि, परभणी www.vnmkv.ac.in
 • भारतीय हवामान विभाग, नवी दिल्‍ली www.imd.gov.in
 • कृषी हवामान विभाग, भारतीय हवामान विभाग, पुणे www.imdagrimet.gov.in
 • जनसंपर्क अधिकारी, वनामकृवि, परभणी promkvparbhani.blogspot.com

- डॉ. कैलास डाखोरे,९४०९५४८२०२ 
- प्रमोद शिंदे, ७५८८५६६६१५

(ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर टेक्नोवन
तिहेरी उपयोगाचे रिंग गार्डन!जागतिक पातळीवर शेती ही अन्नाची उपलब्धता...
पदार्थाची प्रत, रंग टिकविण्यासाठी...सौर वाळवणी संयंत्राच्या इनडायरेक्ट सोलर ड्रायर...
सौर ऊर्जेवर चालणारी ई-सायकल !सध्या दुचाकीचे प्रमाण वाढले असले तरी त्यासाठी...
अन्न शिजवण्यासाठी नावीन्यपूर्ण ‘...सरळ ज्वालेवर अन्नपदार्थ भाजण्यापासून माणसांच्या...
जमीन सुपीकता अन् तंत्रज्ञान; दर्जेदार...वडिलोपार्जित बागायती शेती असल्याने नोकरीच्या मागे...
कृषिक्षेत्रासाठी उपयुक्त ‘ब्लॉक चेन’...कृषिक्षेत्र हे अन्नसुरक्षेच्या दृष्टीने सर्वात...
प्रक्रिया उद्योगासाठी सोलर ड्रायरसौरऊर्जेचा वापर करून पदार्थ वाळवणे हा...
अचूक सिंचनासाठी स्वयंचलित यंत्रणास्वयंचलित सूक्ष्म सिंचन यंत्रणेद्वारे (ऑटोमेशन)...
इंधनबचतीसाठी पर्यावरणपूरक सौर चूलसौरऊर्जेच्या साह्याने रोजच्या जेवणातील सर्व...
तयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे...सध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार...
ऊस शेतीसाठी आवश्यक यंत्रेऊस उत्पादनात केवळ मजुरीवर ३५ ते ४० टक्के खर्च...
जलशुद्धीकरणासाठी सौर शुद्धजल संयंत्रदुर्गम भागांत तसेच समुद्रकिनाऱ्यावर पिण्यायोग्य...
शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षशून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात...
ऊर्जेशिवाय शीतकरणाचे तंत्रकोणत्याही ऊर्जेच्या वापराशिवाय शीतकरणाची एक...
जास्त अन्न शिजविण्यासाठी शेफलर सौरचूल...शेफलर सौर चूल पेटी सौरचूल आणि पॅराबोलिक...
...ही आहेत आंतरमशागतीसाठी अवजारेशेती मशागतीमध्ये आता ट्रॅक्टर, पॉवर टिलर अशी...
बटाटा प्रक्रिया उद्योगासाठी यंत्रेतळलेल्या पदार्थामध्ये बटाट्याचे चिप्स किंवा...
मेथी वाळवण्याचे तंत्रभारतामध्ये मेथी (शा. नाव - ट्रिगोनेला फीनम -...
फ्राइम्स प्रक्रिया उद्योगातील यंत्रेतळलेल्या पदार्थांच्या बाजारपेठेमध्ये फ्राइम्स...
..अशी आहे डाळनिर्मितीची प्रक्रियामागील भागात मिनी डाळ मिल व त्या माध्यमातून डाळ...