पीक लागवडीसाठी इन्कलाइंड प्लेट प्लांटर

पावर टिलरचलित इन्कलाइंड प्लेट प्लांटर
पावर टिलरचलित इन्कलाइंड प्लेट प्लांटर

पारंपरिक पद्धतीच्या पेरणीमुळे रोपांच्या विरळणीचा खर्च वाढतो. पेरणीनंतरच्या मशागतीमध्येदेखील बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे पिकाचे उत्पादन कमी येते. हे लक्षात घेऊन भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेतील तज्ज्ञांनी कोदो, कुटकी, सावा, चिमा, कंगणी आणि रागी या पिकांच्या अचूक पेरणीसाठी पॉवर टिलरचलित इन्कलाइंड प्लेट प्लांटर या यंत्राची निर्मिती केली आहे.

कोदो, कुटकी, सावा, चिमा, कंगणी आणि रागी या पिकांची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्यात केली जाते. या पिकांतील पोषक घटक लक्षात घेता सध्याच्या काळात कुपोषण आणि मधुमेह रोगींच्या आहारात या पिकांचा समावेश महत्त्वाचा आहे.  सध्याच्या काळात कोदो, सावा, रागी या पिकांची लागवड पारंपरिक पद्धतीने केली जाते. त्यामुळे बियाणे एक समान अंतर आणि खोलीवर पेरले जात नाहीत, तसेच एकरी बियाणे जास्त लागते. पारंपरिक पद्धतीच्या पेरणीमुळे रोपांच्या विरळणीचा खर्च वाढतो. पेरणीनंतरच्या मशागतीमध्येदेखील बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे पिकाचे उत्पादन कमी येते. हे लक्षात घेऊन भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेतील तज्ज्ञांनी कोदो, कुटकी, सावा, चिमा, कंगणी आणि रागी या पिकांच्या अचूक पेरणीसाठी पॉवर टिलरचलित इन्कलाइंड प्लेट प्लांटर या यंत्राची निर्मिती केली आहे.

पावर टिलरचलित इन्कलाइंड प्लेट प्लांटर एका वेळी सहा ओळींमध्ये बियाण्यांची अचूक पेरणी. यंत्राचे घटक मुख्य सांगाड्याला जोडलेले असतात.      यंत्रामध्ये २४ खाचा असणारी इन्कलाइंड मीटरिंग प्लेट (६ नग), बियाणे पेटी (६ नग), बियाणे नलिका (६ नग), फण (६ नग), चेन-स्प्रॉकेट मीटरिंग (२ नग), चाके (२ नग) हे मुख्य भाग आहेत.

यंत्राची कार्यप्रणाली

  • यंत्राच्या सर्व मीटरिंग प्लेट एकाच ड्राइव्ह शाफ्टवरती लावलेल्या असतात. हा शाफ्ट यंत्राच्या दोन्ही बाजूला असलेल्या चाकांद्वारे चेन-स्प्रॉकेट मीटरिंगच्या साहाय्याने फिरवला जातो.
  • चेन-स्प्रॉकेट आणि ड्राइव्ह शाफ्टमधील गेअर रेशो (१:२) असतो.
  • यंत्र चालत असताना या प्रणालीमुळे मीटरिंग प्लेट फिरते. पेटीमधून बियाणे उचलून नलिकामध्ये टाकले जातात.
  • नलिकामधील बियाणे फणाने उकरलेल्या मातीच्या सरीमध्ये पेरले जातात.
  • यंत्राचे फायदे

  • बियाणे ७.५ ते १० सें. मी. अंतर आणि १.५ ते २ सें. मी. खोलीवर पेरले जाते.
  • यंत्राद्वारे पेरणी केली असता पारंपरिक पद्धतीच्या ८० ते ९० टक्के तर ड्रिलिंग पद्धतीच्या ६० ते ७० टक्के बियाण्यांची बचत होते.
  • पॉवर टिलरद्वारे हे यंत्र २ ते ३ किमी वेगाने चालवले असता ८० टक्के बियाणे एकसमान अंतरावर पेरले जाते.
  • यंत्राची कार्यक्षमता ०.३२ हेक्टर प्रति तास आणि कार्यक्षमता ७२ ते ८२ टक्के आहे.
  • हे यंत्र लहान बियाण्यांच्या पेरणीकरिता अत्यंत उपयुक्त.
  •   - महेश जाधव, ८५५२००८२११ (बालाजी नांदेडे हे केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ आणि महेश जाधव भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com