बांधावरच प्रयोगशाळा उभारण्याचे कौशल्यपूर्ण तंत्रज्ञान

पुणे येथील डॉ. संतोष चव्हाण यांनी बांधावरील प्रयोगशाळा ही संकल्पना शेतकऱ्यांपुढे सादर केली. राज्यात विविध ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रयोगशाळा उभारल्यादेखील आहेत. आपल्या शेती पद्धतीला लागणाऱ्या सेंद्रिय वा जैविक निविष्ठा आपल्याच शेतात बनविणे, शेतीतील उत्पादन खर्च कमी करणे आता शक्य होणार आहे. या अनुषंगाने आजपासून दर मंगळवारी ही मालिका सुरू करीत आहोत.
बांधावरच प्रयोगशाळा  उभारण्याचे कौशल्यपूर्ण तंत्रज्ञान
बांधावरच प्रयोगशाळा उभारण्याचे कौशल्यपूर्ण तंत्रज्ञान

शेतीत कधी अस्मानी संकट, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ, त्यातूनही शेतीमाल पिकेलच तर हमी भाव मिळत नाही. शेतकरी हा जगाच्या पाठीवरील एकमेव असा उत्पादक आहे जो शेतीमाल पिकविताना लागणाऱ्या वस्तू सर्वांत जास्त किंमत देऊन विकत घेतो. मात्र तोच उत्पादित माल त्याला सर्वांत कमी दरांतही विकावा लागतो. ही परिस्थिती सुधारायची असेल तर शेतकऱ्यांना शेतीतील सर्व घटकांची सविस्तर शास्त्रीय माहिती देऊन प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. उत्पादन खर्चही कमी होणे आवश्यक आहे. आजच्या शेती पद्धतीत बहुतांश शेती रासायनिक पद्धतीनेच सुरू आहे. नैसर्गिक किंवा जैविक- सेंद्रिय निविष्ठांचा जो वापर होतो तो निर्यातक्षम पिकांपुरता मर्यादित आहे. रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करून त्यास नैसर्गिक निविष्ठांची जोड दिली तर ‘रेसिड्यू फ्री’ शेती करणे शक्य होईल.

प्रदूषित घटकांची समस्या शेतीतील पाण्याची प्रत (क्वालिटी) दिवसेंदिवस खालावत चालली आहे. सन २००० मध्ये गंगा नदीतील पाण्यामध्ये उपलब्ध ‘इनऑरगॅनिक’ नत्राची पातळी ३.७७ पीपीएम होती. कमाल मर्यादित ातळी एक पीपीएम एवढीच आहे. वीस वर्षांपूर्वी ही परिस्थिती होती तर आजची परिस्थिती काय असेल याचा अंदाज येऊ शकतो. शहरे, औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषित घटकांमुळे नद्यांतील प्रदूषण पातळी खालावत आहे. ही पातळी ‘बीओडी’ वरून ठरते. ती पाच पीपीएमपेक्षा कमी असली पाहिजे. भारतातील काही नद्यांची ती ५ ते २० पीपीएमच्या दरम्यान पोहोचली आहे. जगातील वेगवेगळ्या नद्यांमधील जड धातूंचे प्रमाण तपासण्यात आले. सन १९७० च्या काळात  कॅडमियम या जड धातूचे पाण्यातील प्रमाण ०.८ मायक्रोग्रॅम प्रति लिटर होते. तेच प्रमाण २०१० मध्ये २५.३३ झाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार हे प्रमाण ३ पेक्षा कमी पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मानवी पिण्यायोग्य पाण्याचा टीडीएस १५० पीपीएमपेक्षा कमी पाहिजे. शेतजमिनीसाठी हे प्रमाण ५०० पीपीएमपेक्षा कमी असले पाहिजे. पुण्याजवळील काही भागात शेतीसाठी उपलब्ध पाण्याचा टीडीएस २००० पीपीएमपेक्षा जास्त आहे. बहुतांश ठिकाणी तो १००० पीपीएमच्या जवळ पोहोचला आहे. एक हजार पीपीएम म्हणजे प्रति लिटर पाण्यात एक ग्रॅम क्षार म्हणजेच मीठ आहे. सिंचनातील समस्या पाट पद्धतीने एक एकरास एका वेळेस किमान ३.५ लाख ते ४ लाख लिटर पाणी दिले जाते. पाण्यातील क्षारांचे प्रमाण १००० पीपीएम असेल तर ३.५ ते ४ लाख लिटर पाणी म्हणजे ३५० किलो ते ४०० किलो क्षार उपलब्ध होतात. या सर्व दाखल्यांवरून लक्षात येते, की पाणी प्रदूषणाची गंभीरता लक्षात येते. पाणी व रासायनिक खतांचा अति वापर केल्याने जमिनी खारवट किंवा क्षारपड होणे, पिकांची उत्पादकता कमी होण्याच्या समस्या तयार झाल्या आहेत. प्रामुख्याने जमिनीचा ईसी वाढतो. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होते. अशा जमिनीतील सूक्ष्मजीव ताणात राहून कार्य करतात. रासायनिक निविष्ठांच्या वापराबद्दल अडचणी आज जैविक व सेंद्रिय निविष्ठांची बाजारपेठ अत्यंत कमी असून रासायनिक कीडनाशकांचा वापर ९५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. शेतीमाल पिकविण्यासाठी रसायनांचा अति वापर होत असेल तर सुरक्षित अन्नपदार्थ मिळणार कसे? जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरात २०१५ मध्ये ४१ लक्ष टन रासायनिक कीडनाशकांचा वापर झाला. सन २००० पेक्षा तो ३५ टक्के जास्त झाला पालेभाज्या, कंदमुळे वर्गीय पिके, दुधात विविध रासायनिक अंश मिळत आहेत. मासोळी किंवा समुद्री खाद्यपदार्थांत जड धातूंचे प्रमाण मिळत आहेत. आईच्या दुधातही रासायनिक कीडनाशकांचे अंश मिळत आहेत.  युरोपिय महासंघाने उपलब्ध केलेल्या रासायनिक कीडनाशकांच्या वापराविषयीचे प्रातिनिधिक उदाहरण. (फेब्रुवारी २०२२)

  •   मान्यताप्राप्त रसायनांची संख्या    ४४८
  •   वापरावर निर्बंध असलेली रसायने    ९३४
  •   प्रलंबित    ६७
  •   बंदी घातलेल्या रसायनांची संख्या    ०
  •   अन्य रसायने    १७
  •   एकूण    १४६६
  •   मान्यता असलेल्या रसायनांची संख्या    ४४८
  •   वापरावर निर्बंध असलेल्या रसायनांची संख्या     ९३४
  • रसायनांच्या अति वापराचे दुष्परिणाम पाहता शेतकऱ्यांनी हळू हळू एकात्मिक शेती, ‘रेसिड्यू फ्री’ शेती, नैसर्गिक (जैविक/सेंद्रिय) शेतीकडे वळावे लागेल.
  • बांधावरची प्रयोगशाळा सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सेंद्रिय वा जैविक निविष्ठा बनविण्यासाठी प्रशिक्षित करायला हवे. त्यासाठी बांधावरील प्रयोगशाळेची संकल्पना हा चांगला पर्याय होऊ शकतो. यातील काही घटक शेतकऱ्यांच्या शेतात उपलब्ध आहेत. तर काही विशिष्ट उद्योगातून मिळणाऱ्या उप-उत्पादनांपासून बनविण्यात येऊ शकतात. काही घटक शहरी भागातून उपलब्ध होऊ शकतात. अशा पद्धतीचे शास्त्रीय प्रयोग महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत (पुणे, वाशीम, नगर, यवतमाळ) यशस्वी रित्या राबविण्यात येत आहेत. स्वतः शिकून हे शेतकरी अन्य शेतकऱ्यांना त्याचे प्रशिक्षण देत आहेत.  (मास्टर ट्रेनर). बांधावरील प्रयोगशाळेचे फायदे

  •   उत्पादनावरील खर्च कमी होतो.
  •   ताज्या वापरणे शक्य होते. त्यामुळे त्याचे ‘रिझल्ट’ चांगले मिळतात.
  •   जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते.
  •   रासायनिक निविष्ठांचा वापर कमी होतो.
  •   घरातील आरोग्य सुधारण्यात मदत होते.
  • तयार प्रयोगशाळा पुणे (३), वाशीम (३), नगर (१), यवतमाळ (१) उदाहरणे   श्री. चोंधे फार्मलॅब्स, वडू खुर्द (हवेली), पुणे   जय किसान शेतकरी गट, एरंडा, मालेगाव (वाशीम)   राहुल रसाळ फार्म, निघोज, जि. नगर   पुण्यधाम आश्रम, कोंढवा, पुणे प्रयोगशाळेचे प्रकार   ‘मास्टर लॅब’- विविध यंत्रांचा किंवा घटकांचा वापर करून निविष्ठा बनविण्यात येतात. खर्च ७५ हजार रुपयांपर्यंत. १०० एकरांसाठीच्या निविष्ठा निर्मिती शक्य.   ‘बेसिक लॅब’- इडली कुकर, घरगुती गॅस शेगडी व सिलिंडरचा वापर करून निविष्ठा निर्मिती. बनविण्यात येतात. खर्च २५ हजार रुपयांपर्यंत. ५ ते १० एकरांसाठीच्या निविष्ठा बनविता येतात. प्रयोगशाळा उभारणी प्रशिक्षण यामध्ये ग्रामीण भागात जाऊन ५० ते १०० शेतकऱ्यांना प्रयोगशाळेची संकल्पना समजाविण्यात येते. त्यासाठी आवश्‍यक जे वेगवेगळे घटक सहज उपलब्ध होऊ शकतात त्यापासून निविष्ठा कशा बनवाव्यात याबाबत प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर उत्कृष्ट पद्धतीने हे घटक बनविणाऱ्या शेतकऱ्यांची निवड करून ते ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून निवडले जातात. त्यांना गावातील प्रयोगशाळेचा प्रमुख म्हणून नेमण्यात येते. ते अन्य शेतकऱ्यांना प्रशिक्षित करतात. - डॉ. संतोष चव्हाण,  ८७६७३१९४९२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com