agricultural stories in Marathi, Lichi varieties for plantation | Agrowon

लिची फळपिकाच्या जाती
उत्तम सहाणे
गुरुवार, 27 जून 2019

लालसर आकर्षक रंगाबरोबर आरोग्यासाठीचे फायदे लक्षात घेता लिची फळाची मागणी वाढत आहे. लिचीची लागवड डहाणू भागात होत असून, नवीन लागवड करण्याविषयी माहिती घेऊ.

लिचीचे शास्त्रीय नाव लिची चायनेन्सिस असे असून, मूळ स्थान चीन आहे. सतराव्या शतकात हे फळझाड भारतात आले. जागतिक पातळीवर प्रमुख उत्पादक देशांमध्ये भारत आणि चीन आघाडीवर आहेत. भारतामध्ये बिहार राज्यात लिचीची लागवड सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात लिची लागवड प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आढळते. घोलवड येथील दारबशा कावसजी पटेल या शेतकऱ्याने १९२६ च्या सुमारास कोलकत्याहून लिची कलमे आणून प्रायोगिक लागवड केली होती.

लालसर आकर्षक रंगाबरोबर आरोग्यासाठीचे फायदे लक्षात घेता लिची फळाची मागणी वाढत आहे. लिचीची लागवड डहाणू भागात होत असून, नवीन लागवड करण्याविषयी माहिती घेऊ.

लिचीचे शास्त्रीय नाव लिची चायनेन्सिस असे असून, मूळ स्थान चीन आहे. सतराव्या शतकात हे फळझाड भारतात आले. जागतिक पातळीवर प्रमुख उत्पादक देशांमध्ये भारत आणि चीन आघाडीवर आहेत. भारतामध्ये बिहार राज्यात लिचीची लागवड सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात लिची लागवड प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आढळते. घोलवड येथील दारबशा कावसजी पटेल या शेतकऱ्याने १९२६ च्या सुमारास कोलकत्याहून लिची कलमे आणून प्रायोगिक लागवड केली होती.

लिची हे सदाहरित प्रकारातील झाड असून, वर्षभर नवीन वाढीसह फांद्या येतात. झाडाची उंची १० ते १२ मीटर व विस्तार ८ मीटर असतो.

लिची फळाचे पोषणमूल्य :

लिची फळात ७६ ते ८७ टक्के पाणी, साखर ७ ते १२ टक्के, प्रथिने ०.७ टक्के, स्निग्धांश ०.३ ते ०.५ टक्के व खनिजे ०.७ टक्के असतात. लिची फळामध्ये उष्मांक ६५ कॅलरी असून, जीवनसत्त्व ‘क’ हे ६४ मि.ग्रॅ. प्रति १०० ग्रॅम आहे.

हवामान व जमीन :

हिवाळ्यात थंड व उन्हाळ्यात उष्ण तापमान तसेच हवेतील आर्द्रता असलेले हवामान लिचीला मानवते. लिची लागवडीच्या प्रदेशात सर्वसाधारण जानेवारी महिन्यात तापमान कमाल १९ आणि किमान ९ अंश सेल्सिअस असते. जुलै महिन्यात तापमान कमाल ३३ आणि किमान २५ अंश सेल्सिअस असते. झाडाला मोहर येतेवेळी जानेवारी महिन्यात सतत पाच सहा दिवस १० अंश सें.ग्रे. च्या आसपास तापमान असावे. वार्षिक पर्जन्यमान १२०० ते १७०० मिमी असावे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जूनमध्ये सर्वसाधारण ८३ टक्के आणि जानेवारीत ६० टक्के असावे. वालुकामय व निचरा होणारी तसेच जलधारण शक्ती अधिक असलेल्या जमिनीत लिचीची लागवड यशस्वी होते. जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ असावा. जास्त सामू असलेली जमीन लिचीला चालत नाही.

जाती :

लिचीच्या आवश्यक गुणधर्म असलेल्या जाती निर्मितीसाठी फारसे संशोधन झालेले नाही. हवामान आणि जमिनीनुसार रोपांमध्ये निरनिराळे गुणधर्म असलेल्या ८ ते १० जाती आपल्याकडे प्रचलित आहेत.
घोलवड लिची : यामध्ये अर्ली व लेट अशा दोन जाती आहेत.
अर्ली जात :
फळे गुलाबी छटा असलेली हिरवट रंगाची गोल
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तयार होतात
झाडाची उंची १० मी. विस्तार ८ मी.
एका झाडाचे उत्पादन ८० ते ९० किलो

लेट जात :
फळे हृदयाकृती, गर्द लालसर रंगाची असून, मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात तयार होतात.
बी लहान, गराचे प्रमाण जास्त व गोड
फळांच्या झुपक्यात ३५ ते ४० फळे
उत्पन्न अर्लीपेक्षा जास्त, परंतु पावसात सापडल्यास नुकसान
एका झाडाचे उत्पादन ११५ किलो

अभिवृद्धी :

पूर्वी बियांपासून अभिवृद्धी केली जाई. मात्र अशा झाडाला फळे उशिरा म्हणजे १५ वर्षांनंतर येतात. त्यामुळे आता गुटी कलमापासून लिचीची अभिवृद्धी करतात. अशा रोपांपासून ७ ते ८ वर्षांत उत्पादन सुरू होते. गुटी कलमासाठी पावसाळा सुरू झाल्यावर जूनच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा जुलैमध्ये गुटी कलम बांधतात. याशिवाय लिचीमध्ये दाब कलम पद्धतही वापरतात.

इतर फळबाग
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
अजैविक ताणाविरोधी लढाईत जैवसंप्रेरके...पुणे येथे द्राक्ष बागायतदार संघ महाअधिवेशन ३ ते ५...
पाणी साचलेल्या द्राक्षबागांसाठी...द्राक्ष लागवडीखाली असलेल्या क्षेत्रात गेल्या...
फळगळचे नेमके कारण जाणून करा योग्य... एकूण फळागळीमध्ये ७० ते ८० टक्के फळे ही...
नारळ बागेत मसाला पिकांची लागवड    नारळ बागेमध्ये नारळाच्या...
अधिक पाऊस, ढगाळ वातावरणात करावयाच्या...द्राक्ष विभागातील बहुतांश भागांमध्ये सध्या सतत...
द्राक्षाच्या विविध अवस्थेत घ्यावयाची...द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात पावसाची फारशी...
पावसाळी वातावरणात द्राक्षबागेचे...गेल्या आठवड्यात द्राक्षबागेत सर्वत्र पाऊस सुरू...
व्यवस्थापन लिंबू फळबागेचेलिंबू फळबाग लागवडीसाठी योग्य जमीन, जात यांची निवड...
सीताफळाचे अन्नद्रव्य, ओलीत व्यवस्थापनसीताफळाची मुळे खोलवर न जाता वरच्या थरात राहतात,...
लिची फळपिकाच्या जातीलालसर आकर्षक रंगाबरोबर आरोग्यासाठीचे फायदे लक्षात...
द्राक्षबागेत वाढीसाठी पोषक वातावरणगेल्या २-३ दिवसांपासून द्राक्ष विभागामध्ये...
द्राक्ष सल्ला : आर्द्रतापूर्ण...द्राक्षबागेतील तापमान सध्या कमी होत आहे. नाशिक,...
ढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...
डाळिंबबागेतील मररोगाची लक्षणे कसे ओळखाल...डाळिंबबागेमध्ये मररोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार...
द्राक्षवेल अचानक सुकण्याच्या समस्येवर...सध्याच्या परिस्थितीत द्राक्षबागेतील सर्व भागात...
द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशियम बारबॅटम...द्राक्षाच्या जुन्या बागांमध्ये खोडकिडीच्या...
भुरी नियंत्रणासह अन्नद्रव्य...सध्या बऱ्याच ठिकाणी तापमानामध्ये वाढ होताना दिसत...
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा...विविध संत्रा बागांमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळा...