agricultural stories in Marathi, making of organic inputs at home level | Agrowon

सेंद्रिय निविष्ठांची घरगुती निर्मिती

एस. बी. झाडे, एम. एस. तायडे
शनिवार, 27 एप्रिल 2019

सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त निविष्ठा या शेतीवरच तयार केल्यास अधिक स्वस्त पडतात. आजच्या लेखात विविध अर्क, जीवामृत, बीजामृत तयार करण्याच्या पद्धती जाणून घेऊ.

निंबोळी अर्क
निंबोळी अर्काचा उपयोग हा विविध किडींच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी केला जातो. उदा. पांढरी माशी, मावा, तुडतुडे इ.

सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त निविष्ठा या शेतीवरच तयार केल्यास अधिक स्वस्त पडतात. आजच्या लेखात विविध अर्क, जीवामृत, बीजामृत तयार करण्याच्या पद्धती जाणून घेऊ.

निंबोळी अर्क
निंबोळी अर्काचा उपयोग हा विविध किडींच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी केला जातो. उदा. पांढरी माशी, मावा, तुडतुडे इ.

  ५ टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत
 उन्हाळ्यात (पावसाच्या सुरवातीस) निंबोळ्या उपलब्ध असताना त्या जमा कराव्यात. त्या चांगल्या वाळवून साफ करून त्यांची साठवण करावी. फवारणीच्या आदल्या दिवशी आवश्यक तेवढ्या निंबोळ्या बारीक कराव्यात. असा पाच किलो चुरा नऊ लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी भिजत टाकावा. एक लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत ठेवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी निंबोळीचा अर्क पातळ फडक्यातून चांगला गाळून घ्यावा. त्या अर्कात एक लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे. अर्क एकूण दहा लिटर होईल एवढे पाणी मिसळावे. वरीलप्रमाणे तयार केलेला एक लिटर अर्क पाण्यात मिसळून ढवळावा. त्वरित फवारणीसाठी वापरावा. निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशीच तयार करून वापरल्यास चांगले निष्कर्ष दिसतात.

दशपर्णी अर्क (दहा पानांचा अर्क)
आपल्या शेतीच्या परिसरामध्ये उपलब्ध अशा १० वेगवेगळ्या झाडांच्या पानांपासून हा अर्क तयार करता येतो. दशपर्णी अर्काचा उपयोग बहुतांश किडी व काही प्रमाणात रोगांच्या नियंत्रणासाठी होऊ शकतो. दशपर्णी अर्कासाठी लागणाऱ्या वनस्पती व त्याचे प्रमाण ः  १) कडुनिबांचा पाला – ५ किलो २) घाणेरी (टणटणी) पाला – २ किलो ३) निरगुडी पाला – २ किलो ४) पपई पाला – २ किलो ५) गुळवेल/पांढरा धोतरा पाला – २ किलो ६) रुई पाला – २ किलो ७) लाल कण्हेर पाला – २ किलो ८) वन एरंडी पाला – २ किलो ९) करंज पाला – २ किलो १०) सीताफळ पाला – २ किलो
यासोबत २ किलो हिरव्या मिरचीचा ठेचा, पाव किलो लसूण ठेचा, ३ किलो गावरान गाईचे शेण, ५ लिटर गोमूत्र यांचे मिश्रण करून २०० लिटर पाण्यात सावलीत ठेवावे. वरून गोणपाटाने झाकावे. दिवसातून ३ वेळा काठीने ढवळून पुन्हा झाकण ठेवावे. अशाप्रकारे हे मिश्रण तीस दिवस आंबवावे. हा अर्क गाळून घ्यावा. उपलब्धतेनुसार प्लॅस्टिक डब्यामध्ये साठवून ठेवावा. हा अर्क सहा महिन्यांपर्यंत वापरता येतो.
वापरण्याची मात्रा – ५ लिटर अर्क प्रती ५०० लिटर पाणी या प्रमाणे प्रतिहेक्टरी फवारणीसाठी वापरावा.

   बीजामृत
 बीजामृताच्या बीजप्रक्रियेमुळे उगवणशक्ती वाढते. पिकाची वाढ जोमदार होत असल्याचा अनुभव आहे.
 साहित्य : २० लिटर पाणी, १ किलो देशी गाईचे शेण, १ लिटर गोमूत्र, १०० मिली दूध, जिवाणू माती मूठभर व ५० ग्रॅम चुना मिसळून हे मिश्रण २० लिटर पाण्यामध्ये चांगले ढवळून घ्यावे. पेरणीपूर्वी या मिश्रणाची बियाणांवर प्रक्रिया करावी.  

   अमृत पाणी
साहित्य : पावशेर देशी गाईचे तूप, १० किलो शेण, अर्धा किलो मध, २०० लिटर पाणी.
पद्धत ः १० किलो शेणामध्ये पावशेर तूप व अर्धा किलो मध मिसळून हे मिश्रण २०० लिटर पाण्यामध्ये चांगले ढवळून घ्यावे. जमीन वाफशावर असताना जमिनीवर शिंपडावे किंवा पाटाच्या पाण्यातून योग्य प्रमाणात सोडावे.

  जीवामृत
जीवामृत हे एक प्रकारचे जीवाणूचे  विरजन आहे. सोबतच ते अत्यंत चांगले बुरशीनाशक, विषाणू नाशक असल्याने त्याच्या फवारणीने बुरशी, विषाणू यांचा प्रादुर्भाव आटोक्यात येतो.
 साहित्य : २०० लिटर पाणी + १० किलो देशी गाईचे शेण + ५ ते १० लिटर देशी गाईचे गोमूत्र + १ किलो गूळ किंवा ४ लिटर उसाचा रस + १ किलो बेसन + १ मुठ बांधावरची जीवाणूयुक्त माती.
हे मिश्रण एका प्लॅस्टिक ड्रम किंवा टाकीमध्ये टाकून काठीने किंवा हाताने चांगले मिसळून घ्यावे. ड्रमच्या तोंडावर गोणपाट झाका व ते ४८ ते ७२ तासांकरिता सावलीत ठेवावे. दिवसातून दोनदा सकाळ व संध्याकाळ काठीने ढवळावे.
वरील द्रावण हे एक एकर फवारणीसाठी आहे.  
महिन्यातून १ ते २ वेळा पिकांना  २०० ते ४०० ली. जीवामृत द्यावे.
द्रावण तयार केल्यानंतर ते ७ दिवसांच्या आत वापरावे.  

 ः एस. बी. झाडे, ८८५५८२३५४६
(कृषी महाविद्यालय, रिसोड)


इतर सेंद्रिय शेती
सेंद्रीय द्रवरूप जैविक खत तयार करण्याची...पिकांच्या वाढीसाठी जमिनीमध्ये सूक्ष्मजिवाणू...
शाश्वत उत्पादनासाठी सेंद्रिय खतांचे...जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता टिकवून ठेवायची असेल...
निंबोळी अर्काची निर्मिती, वापरसध्या पावसाळ्याच्या सुरुवातीला कडुनिंबाच्या...
गांडूळखत व्यवसाय विस्तारातून अर्थकारण...लोहगाव (जि. परभणी) येथील अल्पभूधारक सीताराम ऊर्फ...
ऊस पाचटातून वाढवा सेंद्रिय घटकऊस पाचटापासून कंपोस्ट खत तयार करता येते. ऊस तुटून...
जमीन सुपीकता, उत्पादकतावाढीसाठी...जमिनीतून एकापाठोपाठ विविध अन्नधान्ये पिके...
मशागतीद्वारे पीक अवशेषाचे व्यवस्थापनपीक अवशेष कुजून त्याद्वारेदेखील जमिनीमध्ये कर्ब...
गांडूळखत अर्क निर्मितीसेंद्रिय शेतीमध्ये गांडुळे व गाडूळखताचे मोठे...
जमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...
कंपोस्ट खते बनविण्याच्या पद्धतीजमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा...
कंपोस्ट खते बनवण्याच्या पद्धतीबदलते हवामान आणि जमिनीचा कमी झालेला कस हे दोन्ही...
सेंद्रिय पद्धतीने पीक पोषण सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीची सुपीकता जपण्याचा विचार...
जमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचा अतूट...वॉक्समन यांच्या सॉईल अॅण्ड मायक्रोब्स या...
जमीन अन् सूक्ष्मजीवपूर्वीच्या रासायनिक शेतीमध्ये...
जमिनी सुपीकता, उत्पादकता वाढीसाठी शेणखत...कृषी विद्यापीठ किंवा संशोधन केंद्रांद्वारे सर्व...
आरोग्यकार्डानुसार शेतात, व्यवस्थापनात...केवळ आरोग्यकार्डाचे वाटप झाले म्हणून...
दृश्य जीवशास्त्रांचाही विचार महत्त्वाचा...गेल्या काही भागांतून आपण आपल्या दृष्टिआड असणाऱ्या...
समजावून घ्या सेंद्रिय कर्बाचे स्थिरीकरणशाश्‍वत सुपीकतेसाठी टिकून राहणारा सेंद्रिय कर्ब...
जमिनीतील ओलावा मोजण्याच्या पद्धतीओलाव्याचे प्रमाण नेमके असल्यास पिकांची वाढ योग्य...
वाढवूया जमिनीतील सेंद्रिय कर्बसेंद्रिय कर्बांचे प्रमाण जमिनीच्या आरोग्यासाठी...