agricultural stories in Marathi, management of dairy business | Page 2 ||| Agrowon

सक्षम करा दुग्धव्यवसाय

डॉ. विवेक क्षीरसागर
शनिवार, 1 जून 2019

डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही संबंधित व्यक्तीने समजून घ्यावे. आपला व्यवसाय हा नफ्यात सुरू असल्याची खात्री नियमितपणे करून घ्यावी.

जागतिक पातळीवर दूध, दुग्धजन्य पदार्थ, डेअरी उद्योग याबाबतची चर्चा होण्यासाठी जागतिक दूध दिवस साजरा करण्यास सुरवात झाली. दूध उत्पादनात भारत हा जगातील एक नंबरचा देश आहे. २०१६-१७ मध्ये भारताचे दूध उत्पादन हे १६५.४ दशलक्ष टन एवढे होते. पण, दुधाच्या उत्पादन क्षमतेत आपण जगाच्या खूपच मागे आहोत. तेव्हा आपले लक्ष हे उत्पादन क्षमता वाढविण्यावर असणे गरजेचे आहे. प्रतिमाणसी दुधाचा वापर हादेखील जगाच्या तुलनेत कमी आहे.

डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही संबंधित व्यक्तीने समजून घ्यावे. आपला व्यवसाय हा नफ्यात सुरू असल्याची खात्री नियमितपणे करून घ्यावी.

जागतिक पातळीवर दूध, दुग्धजन्य पदार्थ, डेअरी उद्योग याबाबतची चर्चा होण्यासाठी जागतिक दूध दिवस साजरा करण्यास सुरवात झाली. दूध उत्पादनात भारत हा जगातील एक नंबरचा देश आहे. २०१६-१७ मध्ये भारताचे दूध उत्पादन हे १६५.४ दशलक्ष टन एवढे होते. पण, दुधाच्या उत्पादन क्षमतेत आपण जगाच्या खूपच मागे आहोत. तेव्हा आपले लक्ष हे उत्पादन क्षमता वाढविण्यावर असणे गरजेचे आहे. प्रतिमाणसी दुधाचा वापर हादेखील जगाच्या तुलनेत कमी आहे.

   दुग्धोत्पादनात गाईंच्या दुधाचा मोठा वाटा आहे. शासनाने दूध उत्पादनासाठी बऱ्याचशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. उदा. अल्प व्याजदराने बॅंक कर्ज, पशुवैद्यकीय सेवा अगदी खेड्यापाड्यात उपलब्ध आहेत. उत्पादित केलेले दूध एकत्र करून ते प्रक्रिया करून बाजारात पाठविणे व दूध आणि त्यापासून बनणाऱ्या विविध पदार्थांची विक्री करून देण्यासाठी गावोगावी दूध सोसायटी, तालुका व जिल्हा संघ यांचे जाळे विणलेले आहे. या सोसायट्यांमार्फत शेतकऱ्याला दुधाची बिले दर पंधरा दिवसाला मिळतात आणि रोख पैशाची गरज भागते. हे या व्यवसायाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या व्यवसायाची एक आणखी एक उल्लेखनीय व महत्त्वाची बाब म्हणजे या दुभत्या जनावरांच्या पालनपोषणाची व नियमित व्यवस्थापनाची ८० टक्के जबाबदारी महिलांवर असते. त्यामुळे त्यांचा आपणही घरासाठी अर्थार्जन करू शकतो, हा आत्मविश्‍वास वाढलेला आहे.

पशुपालन व्यवसायातील महत्त्वाचे मुद्दे

वैयक्तिक स्तर
 

 •  डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही संबंधित व्यक्तीने समजून घ्यावे. व्यवसाय म्हणजे जमाखर्च नियमित लिहिणे. आपला व्यवसाय हा नफ्यात सुरू असल्याची खात्री नियमित करून घ्यावी.
 •  बहुतांश उत्पादक हे हिशेब लिहिण्यात टाळाटाळ करतात. त्यामुळे जेव्हा काही अडचणी निर्माण होतात.
 •   एकंदर वाढणाऱ्या खर्चाचा आलेख पाहिला, तर या व्यवसायातला नफा आटत चालला आहे, हे लक्षात येईल. त्यासाठी कोणत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्‍य आहे, याचा विचार करून योग्य ती कृती करावी.
 •  गाय/ म्हैस खरेदी करताना नुकतीच व्यालेली गाय खरेदी करावी. शक्‍यतो दुसऱ्या/ तिसऱ्या वेताची व जिचे तीन वेळा दूध काढून पाहणे व पुढच्या वेतामध्ये ती गाय, म्हैस निर्मितीक्षम असणे गरजेचे आहे. शक्‍यतो व्याल्यानंतर १५ दिवसांच्या आतील गाय खरेदी करावी म्हणजे दूध मिळण्याचा कालावधी जास्त मिळतो.

गायीची गर्भधारणा व आरोग्य व्यवस्थापन

 •  तांत्रिक ज्ञानाचा अभाव आणि त्याच्या नोंदीकडे दुर्लक्ष करणे धोक्‍याला आमंत्रण देणारे ठरते.
 •  उत्तम जातीच्या वळूची रेतमात्रा वापरून गर्भधारणा करण्यावर दूध उत्पादनाचे गणित अवलंबून असते.
 •  पशुपालकाने कृत्रिम रेतनाच्या गुणवत्तेबाबत जागरूक राहावे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.

गोठ्याचे व्यवस्थापन

 •   गोठा हा जंतूसंसर्ग होण्याचा मोठा स्रोत आहे.  गोठ्यात भरपूर प्रकाश आणि खेळती हवा असावी.
 •  गोठ्याची जमीन कोरडी असावी. जेथे धारा काढल्या जातात ती जागा निर्जंतुक असावी. त्यासाठी विशेष काळजी घ्यावी. कास स्वच्छ असावी. दूध साठवण्याची भांडी स्वच्छ असावीत.
 •  धार काढणाऱ्याचे हात स्वच्छ धुतलेले असावेत. जेणेकरून जंतुसंसर्ग होणार नाही.

जनावराचे संगोपन, आरोग्याची काळजी  

 •  आजारी गायीचे दूध स्वतंत्र ठेवून त्याची विल्हेवाट लावावी. ज्या गाई, म्हशीला संसर्गजन्य रोग झाला आहे अशांना निरोगी जनावरासोबत बांधू नये.
 •  जनावरांना नियमित धुवावे. केस आणि धुळीपासून आजार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
 •  प्रत्येक वेळी धार काढताना कास स्वच्छ पाण्याने धुवून कपड्याने कोरडी करून घ्यावी.

वासराची काळजी  

 •  वासरू त्याच्या आईपाशी असावे. धार काढण्यापूर्वी व काढून झाल्यावर वासराला त्याच्या आईपाशी दूध पिण्यासाठी सोडावे. ही नैसर्गिक अन्न घेण्याची प्रक्रिया आहे. यामुळे वासराला कोणताही जंतू संसर्ग न झालेले दूध मिळते.
 •  दूध पीत असताना वेगळी काळजी घ्यावी लागत नाही. गाय आणि तिचे वासरू यांच्यात नैसर्गिक आपलेपणा वाढतो. यातले धोके म्हणजे जर वासराचा मृत्यू झाला, तर गायीचे दूध देणे बंद होते. वासराने पोटभर दूध घेतले की नाही हे समजत नाही. जर दूध दूषित असेल, तर त्याचा वासरावर परिणाम होतो. गायीने प्रत्यक्षात किती दूध दिले व त्याच्या गुणवत्तेचे मोजमाप करता येत नाही.

गावपातळीवरील डेअरी

 •  दूध संकलन करण्याची व्यवस्था उत्तम असावी. दूध संघापर्यंतची वाहतूक व्यवस्था योग्य असावी.
 •  दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंद व्यवस्थित असावी. दूध उत्पादकास ठरल्याप्रमाणे वेळेवर दुधाचे बिल देण्याची काळजी घ्यावी.
 •  दूध उत्पादकांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन गुणवत्ता व दूध संकलन वाढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.

शेणाचा उपयोग

 •  पशुपालकांनी दूध उत्पादनापासून मिळणारे अन्य दुय्यम उत्पन्नाचे स्रोत वापरावेत.
 •  शेणापासून उत्तम सेंद्रिय खत होते. जनावरे जास्त असतील, तर गोबर गॅस बांधावा. जेणेकरून गॅसबरोबरच वीज वापरता येते. गोबर गॅससाठी सुलभ दराने, मध्यम मुदतीची कर्जे बॅंका देतात, शासनाचे अनुदानही काही प्रमाणात मिळते.

दूध सोसायटीचे उपक्रम

 •  ज्या दूध सोसायट्यांचे व्यवस्थापन उत्तम रीतीने सुरू आहे, अशा सोसायटींनी स्वतःचा पशुखाद्य निर्मिती उद्योग उभारावा. कमी दरात चांगल्या दर्जाचे पशुखाद्य सभासदांना पुरवावे.
 •  एका सोसायटीला हे शक्‍य नसेल तेथे जवळच्या तीन-चार सोसायट्यांनी एकत्र येऊन पशुखाद्य उद्योग उभारावा. यामुळे उत्तम प्रतीच्या पशुखाद्याबरोबरच ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होईल.

दुधाची साठवणूक, वाहतूक आणि पुरवठा

 •   दूध ज्यात साठवायचे आहे ते भांडे स्वच्छ असावे. सध्याच्या कायदेशीर तरतुदीनुसार ज्या भांड्यात दूध साठवायचे ते स्टेनलेस स्टीलचे असावे.
 •   साठवणूक करताना दूध गाळून घ्यावे.
 •  ज्या भांड्यात दूध साठविले जाते त्या भांड्याला झाकण असावे. दूध हे थंड जागी ठेवावे. दुधावर माशा, किडे, धूळ बसणार नाही याची काळजी घ्यावी.

धार काढताना घ्यावयाची काळजी  

 •  दुभत्या जनावरांना धार काढणाऱ्या व्यक्तीकडून होणारा संसर्गाचा धोका हा यांत्रिक पद्धतीने धार काढण्यापेक्षा जास्त असतो.
 •  धार काढणाऱ्याने वेळोवेळी आपली नखे कापली पाहिजेत, स्वच्छ कपडे वापरले पाहिजेत. साबणाने हात स्वच्छ धुतले पाहिजेत, कोरड्या कपड्याने ते कोरडे करावेत.
 •  धार काढल्यानंतर ती जागा प्रत्येक वेळी स्वच्छ करावी. धार झाल्यानंतर सड नेहमी निर्जंतुकीकरण करावेत.

दुभत्या जनावराचा विमा

 •  आपल्याकडे दुभत्या जनावराचा विमा उतरविण्याची सोय आहे. तथापि, बहुतांश पशुपालक जनावराचा विमा उतरवत नाहीत.
 •  काही वेळा महाराष्ट्र शासन विम्यासाठी अनुदानही देते. अनुदान मिळो अथवा व मिळो दूध उत्पादकाने जनावराचा विमा उतरवावा. तो न उतरवता धोका पत्करू नये. याबाबत विमा कंपन्या, डेअरी सोसायटी, जिल्हा स्तरावरील दूध संघ यांनी एकत्रितरीत्या याबाबतची जागृती करावी.

- डॉ. विवेक क्षीरसागर९९७००६६७८६
(व्यवस्थापकीय संचालक,  पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज डेअरी) पुणे)


इतर कृषिपूरक
शेळीपालनासाठी महत्वाचे मुद्दे...शेळीपालन व्यवसाय सुरू करताना पूर्वतयारी करावी....
व्यवस्थापन दुधाळ जनावरांचे...गाई, म्हशींच्या आहारात पशुखाद्याचा योग्य प्रमाणात...
जनावरांतील ताण कमी करा... उन्हाळयात अनेकवेळा तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा...
शेतकऱ्यांसाठी क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्डमुळे कर्जाचे पैसे घेण्यासाठी...
असे बनवा घरच्या घरी पशुखाद्यउन्हाळ्यात गाई, म्हशी आणि इतर जनावरांची भूक कमी...
जनावरांच्या जैवसुरक्षेबाबत जागरूक रहाजनावरांना आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपचाराचा...
गाई, म्हशींच्या तपासणीसाठी...पशूपालनातील प्रमुख अडचण म्हणजे गाई, म्हशी माजावर...
ब्रुसेलोसिसकडे नको दुर्लक्षएखाद्या संक्रमित जनावराचे  रक्त, द्रव किंवा...
जनावरांतील उष्माघाताचे नियंत्रणउन्हाच्या संपर्कात आल्यामुळे जनावरांच्या शरीराचे...
पशुपालनात सुरक्षितता महत्त्वाची...पशू सांभाळ, दैनंदिन निगा, चारा-पाण्याची सोय, दूध...
अनुदानाचा योग्य विनियोगअनुदानासाठीची बहुतांश प्रक्रिया बॅंकेमार्फतच...
आजारांपासून कोंबड्यांचे संरक्षणकोंबड्यांना होणाऱ्या आजारांचे वेळीच व्यवस्थापन...
बदलत्या हवामानानुसार जनावरांचे...बदलत्या हवामानानुसार जनावरांच्या आहार, गोठा,...
उत्पादन धिंगरी अळिंबीचेअळिंबीमध्ये भाजीपाला व फळे यांच्या तुलनेत प्रथिने...
फायदेशीर पशुपालनाचे तंत्रगाई,म्हशींची उत्पादकता वाढवायची असेल तर आपल्याकडे...
गाय, म्हशींच्या आहारात बायपास फॅटचा वापरआपल्याला सुरुवातीच्या १०० ते १२० दिवसांत नफा...
स्वच्छतेतून वाढते दुधाची गुणवत्तादुधाची गुणवत्ता कमी होते. अयोग्य दुधामुळे आर्थिक...
अॅझोलाः एक आरोग्यदायी पशुखाद्य जनावरांचे दूध उत्पादन, प्रजनन, वाढ आणि...
दुधातील फॅट कमी राहण्याची कारणे,...दुधातील स्निग्धांश (फॅट) हा प्रतवारीच्या दृष्टीने...
चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छ दूध उत्पादन...स्वच्छ दूध उत्पादनासाठी स्वच्छ वातावरण आणि...