नागपूर ः एकीकडे जनुकीय सुधारित (जीएम) पिकांच्या संशोधनासाठी वार्षिक दोन हजार कोटी रुपयांच
ताज्या घडामोडी
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील व्यवस्थापन
नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता येत्या आठवड्यामध्ये उपलब्ध वातावरणाचा आढावा घेऊन नियोजन करणे फायद्याचे ठरू शकते. पुढील आठ दिवसांमध्ये सर्व भागामध्ये थोडे अधिक ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. या काळात बागेतील तापमान ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. सर्वच भागामध्ये १० ते ११ तास सूर्यप्रकाश उपलब्ध असेल. सांगली, सोलापूर, उस्मानाबाद या भागामध्ये ढगाळ वातावरण अधिक राहण्याची शक्यता असून, त्यामुळे तापमान कमी होऊ शकेल. थोडक्यात या भागामध्ये खरड छाटणी झालेल्या बागेमध्ये डोळे फुटण्याकरिता अडचणी येणार नाही. जत, मिरज व अथणी भागामध्ये सोमवार, मंगळवार (ता.
नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता येत्या आठवड्यामध्ये उपलब्ध वातावरणाचा आढावा घेऊन नियोजन करणे फायद्याचे ठरू शकते. पुढील आठ दिवसांमध्ये सर्व भागामध्ये थोडे अधिक ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. या काळात बागेतील तापमान ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. सर्वच भागामध्ये १० ते ११ तास सूर्यप्रकाश उपलब्ध असेल. सांगली, सोलापूर, उस्मानाबाद या भागामध्ये ढगाळ वातावरण अधिक राहण्याची शक्यता असून, त्यामुळे तापमान कमी होऊ शकेल. थोडक्यात या भागामध्ये खरड छाटणी झालेल्या बागेमध्ये डोळे फुटण्याकरिता अडचणी येणार नाही. जत, मिरज व अथणी भागामध्ये सोमवार, मंगळवार (ता. २९, ३०) रोजी अल्प प्रमाणात पावसाची शक्यता असेल किंवा पावसाळी वातावरण होईल. अशा स्थितीमध्ये या पूर्वी छाटणी केलेल्या बागेमध्ये आता सबकेन तयार झाले असल्यास पाने जुने होण्याची स्थिती असेल. या वेळी कॅनोपीमध्ये भुरी रोगाची समस्या वाढू शकते.
जास्त तापमान वाढत असलेल्या भागामध्ये आर्द्रतेचे प्रमाण फारच कमी राहील. उदा. नाशिक भागात ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान वाढण्याची शक्यता दिसते. या वेळी वातावरणातील आर्द्रता २५ ते ३० टक्क्यांपर्यंतच असेल. या भागामध्ये खरड छाटणीनंतर डोळे फुटणे अडचणीचे होईल. अशा वेळी ओलांड्यावर पाण्याची फवारणी करणे, बागेत शेडनेटचा वापरणे अशा गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. ज्या बागेमध्ये पाणी कमी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी ७ ते ८ पाने अवस्थेपासून ताणरोधकांची फवारणी महत्त्वाची असेल. वाढलेल्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग (१० ते ११.३ मि.लि.) जास्त असेल. बागेतील पाण्याची गरज वाढेल. ही परिस्थिती सोलापूर, जालना, लातूर भागामध्ये दिसून येण्याची शक्यता असून, बागेचे उन्हापासून संरक्षणासाठी प्रयत्न करावेत.
नवीन रिकट घेतलेल्या बागेमध्ये काही ठिकाणी झाडे अचानक सुकताना दिसून येतील. पाने सुकणे किंवा पूर्ण वेल अचानक सुकण्याची समस्याही दिसून येईल. हलक्या जमिनी किंवा पाणी कमी असलेल्या ठिकाणी ही समस्या आढळेल. पाणी कमी असल्याच्या स्थितीमध्ये वाढ नियंत्रणात राहते. याचा अर्थ वेलीमध्ये सायटोकायनीनचे प्रमाण जिब्रलीन्सपेक्षा जास्त असते. वेलीवर ओलांडा तयार होत असताना त्यात सूक्ष्म घडनिर्मिती व्हावी, या उद्देशाने आपण ६ बीए व युरासीलची फवारणी जास्त प्रमाणात करतो. यासोबत बाजारातील उपलब्ध पोषक घटकांचाही वापर केला जातो. परिणामी वेलीमध्ये आधीच वाढलेल्या सायटोकायनीनमध्ये पुन्हा भर पडते. त्याचे परिणाम काडीवर गाठी दिसतील. काडी काही ठिकाणी फुगलेली दिसेल, तर काही ठिकाणी पाने अचानक सुकताना दिसून येतील. जास्त तापमान वाढत असलेल्या बागेमध्ये हे प्रमाण जास्त दिसेल.
या समस्येवरील उपाययोजना
- बागेमध्ये पाणी एकतर सकाळी किंवा सायंकाळी देणे.
- संजीवकांची फवारणी जास्त प्रमाणात टाळणे. सूर्यप्रकाश पुरेसा असल्यामुळे या वेळी संजीवकाची फारशी गरज नाही.
- काडीची वाढ कमी प्रमाणात होत आहे. अशा बागेमध्ये नत्राचा पुरवठा थोड्या फार जास्त प्रमाणात वाढवावा. यासोबत १ ते २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे सायंकाळच्या वेळी युरियाची फवारणी करावी.
- 1 of 1027
- ››